रशियन राजकुमारीने इंग्लंडमध्ये प्रवेश केला आणि भारतातल्या लोकप्रिय बिस्किटाचा प्रवास सुरू झाला
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
असं म्हणतात की ब्रिटिशांनी भारताला सर्वात उत्तम कोणती गोष्ट दिली असेल तर ती बिस्किटं. चहासोबत आजकाल सर्रास खाल्ली जाणारी ही बिस्किटाची पद्धत इंग्रजांनी भारतात आणली, आणि हळू हळू ती आपल्या आयुष्याचा एक घटक बनली.
आपण सर्वजणच आज-काल बिस्किटांचा आस्वाद मोठ्या प्रमाणात घेत आहोत. बिस्किटं आपल्या दैनंदिन जीवनाचा फार मोठा भाग झालेली आहेत. चहा कॉफीपासून ते अगदी सहज तोंडात टाकण्यासाठी वेगवेगळी बिस्किटं आपल्या घरात असतात.
–
हे ही वाचा – वेळेला चहा लागतो हे मान्यच पण ही गोष्ट देखील त्यासोबत करत जा….
–
कोणा पेशंटला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाताना शहाळ्याचं पाणी किंवा बिस्किटाचा पुडा आपण हमखास नेतो. यापैकीच सर्वात जास्त खप होणाऱ्या मारी बिस्किटविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे की बिस्किट, पाव, कुकीज, केक, ब्रेड ही सर्व बेकरीची उत्पादनं मूळ भारतीय उत्पादनं नाहीत.
भारतात मागील शतकात या सर्व बेकरी उत्पादनांचा वापर अत्यल्प प्रमाणात केला जात होता परंतु मागील दहा पंधरा वर्षात बेकरी उत्पादनच नव्हे तर इतरही अनेक प्रकारची नावीन्यपूर्ण उत्पादनं भारतीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाली त्यातीलच एक प्रसिद्ध उत्पादन म्हणजे मारीगोल्ड बिस्कीट.
अत्यंत चविष्ट परंतु त्याबरोबरच साखरेचं प्रमाण कमी असलेली आणि सहसा कपात न मावणारी अशी या बिस्किटांची ख्याती आहे! परंतु तुम्हाला कधी प्रश्न पडला नाही का, की या बिस्किटांचा आकार इतर बिस्कीटापेक्षा वेगळा कशामुळे? काय आहे, या बिस्किटांच्या नावामागील इतिहास…
मारीगोल्ड या बिस्किटांचा शोध इंग्लंडमध्ये लागला होता. इंग्लंडमध्ये सायंकाळी पाच वाजता चहासोबत बिस्किट घेण्याची प्रथा आहे. मारीगोल्ड बिस्किटांची निर्मिती होण्याआधी इंग्लंडमध्ये कुकिजचं मोठ्या प्रमाणात सेवन केलं जात होतं.
मारी हे नाव रशियाची राजकुमारी मारियाच्या नावावरून बिस्किटाला देण्यात आलं आहे. रशियाच्या या प्रसिद्ध राजकुमारीने इंग्लंडच्या राजमुकाराशी लग्न केलं होतं. आज ती गेल्यानंतरदेखील या बिस्किटांमुळे तिचे नाव आज देखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
मारियाच्या लग्नात इंग्लंडमधील एका प्रसिद्ध बेकरी हाऊसने तिच्या नावाने ही बिस्कीट काढण्यास सुरुवात केली सुरुवातीला काही दिवस या बिस्किटांना मारिया, मेरिबोन अशी नाव देखील देण्यात आली होती.
या बिस्किटाची मूळ निर्मिती १८७४ ला लंडनमधील प्रसिद्ध पिक प्रिन्स या बेकरीने केली. बिस्किटांचा आकार त्या काळातील इतर बिस्किटांपेक्षा वेगळा होता गोलाकार होता बिस्किट गव्हापासून तयार केलेली असत.
–
हे ही वाचा – घराघरात चहासोबत खाण्यात येणाऱ्या पदार्थाच्या जन्माची रंजक कथा!
–
यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्यामुळे अगदी आजारी मनुष्यदेखील याचा आनंद घेऊ शकत होता आणि यामुळेच निर्मिती झाल्यानंतर अगदी काहीच काळात ही बिस्कीटं प्रसिद्ध झाली अगदी युरोपच्या बाहेरूनदेखील या बिस्कीटांना मागणी वाढू लागली.
स्पेन, डेन्मार्क, ब्राझील, फिलिपाईन्स, नॉर्वे, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि भारतातून देखील या बिस्कीटांना मोठी मागणी येऊ लागली.
ही बिस्किटे एवढी चविष्ट होती, की अगदी काही काळातच या मारी बिस्किटने जागतिक बाजारपेठेत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.
त्या काळात इतरही अनेक प्रकारची बिस्किटं उपलब्ध होती परंतु त्यांचा आकार साचेबद्ध होता. इतर बिस्किटांमध्ये साखरेचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असत आणि ही बिस्कीट चहात किंवा दुधात बुडवल्यानंतर खूपच लवकर विरघळून जायची.
मारीगोल्ड एकमेव असं बिस्किट होतं ज्यामध्ये साखरेचे प्रमाण खूप कमी होतं साखरेचे प्रमाण कमी असल्यामुळे अगदी आजारी माणूस देखील या बिस्किटांचा आनंद घेऊ शकत होता आणि महत्त्वाचा भाग म्हणजे ही बिस्कीट दुधात बुडवल्यानंतर लवकर तुटत नसे किंवा विरघळून जात नसे.
अर्थात खूप वेळ जर दुधात ठेवली तर ती नक्कीच तुटत असतील. समकालीन बिस्किटांपेक्षा वेगळेपणा जपल्यामुळेच मारीगोल्ड प्रसिद्ध झालं. या बिस्किटाची सेवन करण्याची पद्धत प्रदेशानुसार बदलत जाते.
म्हणजे भारतात बिस्किट साध्या पद्धतीने खाल्ली जातात तर काही देशांमध्ये याच्या वरती चॉकलेट आणि नारळाचा कीस टाकून याचा आनंद उपभोगला जातो ब्राझीलमध्ये ही बिस्कीट चॉकलेटमध्ये बुडवून ठेवतात आणि त्यानंतर त्यांचा आनंद घेतला जातो.
===
हे ही वाचा – या २५ गोष्टी तुम्हाला आत्ताच्या आत्ता तुमच्या सोनेरी बालपणात घेऊन जातील
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.