आता चायनीज रॉकेटचं संकट! कोसळणार रॉकेटचा २३ टन वजनाचा भाग…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सध्या संपूर्ण जग आधीच चीनने दिलेल्या कोरोना महामारीचा सामना करत आहे. जगभरात अनेक लोकं कोरोनाने मरत असतांना चीनने जगाला दुसऱ्या एका संकटात टाकले आहे.
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. तज्ञ तर आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही संकेत देऊन आपल्याला सावध करत आहे. भारतात साध्या खूपच बिकट परिस्थिति आहे.
इतर देश जरी हळू हळू सावरत असले तरी भारताला अजून आणखीन किती काळ या व्हायरसच्या भीतीच्या सानिध्यात राहायला लागणार आहे हे देवच जाणे!
हे सगळं सुरू असताना चीनकडून येणारी संकटं काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. कोरोना व्हायरस आला, लडाखच्या सीमेवरील कुरापत्या झाल्या, आता आणखीन एक चीनी संकट अवकाशातून येऊ घातलंय.
चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने २९ एप्रिलला तब्बल २१ टन वजनाचे ‘लाँग मार्च ५ ब’ हे रॉकेट अवकाशात सोडले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हे रॉकेट एका महासागरात पडणे अपेक्षित होते.
मात्र, आता त्या रॉकेटवरील चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेचे नियंत्रण तुटले आहेत. त्यामुळे आता ते रॉकेट पृथ्वीवर पडणार आहे. पण दुर्दैवाने ते पृथ्वीच्या कोणत्या भागात पडेल यावर कोणतीही ठोस माहिती मिळत नाहीये.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते माइक हावर्ड यांनी माहिती दिली आहे की, “चीनेचे रॉकेट ‘लाँग मार्च 5ब’ वर अमेरिकेची नजर आहे.अद्याप या रॉकेटने वातावरणात प्रवेश केला नसला तरी, जेव्हा हे रॉकेट पृथ्वीच्या वातावरणात शिरेन त्यावेळी ते पृथ्वीच्या कोणत्या ठिकाणी पडेल याबद्दल निश्चित माहिती सांगू शकत नाही.”
चीनच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमांचे वृत्तांकन करणारे पत्रकार ‘अँण्ड्रू जोन्स’ यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार हे रॉकेट न्यूयॉर्क, मद्रिद बीजिंग, दक्षिण चिली, वेलिंग्टन, न्यूझीलंड या भागात कोसळू शकते.
या आठवड्याअखेर हे रॉकेट पृथ्वीवर धडकण्याची शक्यता असून नागरी भागात कोसळल्यास मोठी जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. याबाबत इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी वृत्त दिले आहे!
===
हे ही वाचा – चायनीज “नसलेला” फोन हवाय? ही आहे बेस्ट नॉन-चायनीज स्मार्टफोन्सची यादी…
===
कोरोना ही चीनची देण असली तरी अवकाशातल्या गोष्टी मानवाच्या हातात नसतात, पण या रॉकेटमुळे चीन पुन्हा एकदा सगळ्या देशांच्या हीटलिस्टवर आला आहे. आता नेमकं हे रॉकेट काय घात करणार आहे ते येणारा काळच ठरवेल, तोवर सगळ्यांनी काळजी घ्या!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.