' आयफोन १३ आलाय, पण खिशाला सहज परवडणाऱ्या या ५ स्मार्टफोन्सविषयी जाणून घ्या – InMarathi

आयफोन १३ आलाय, पण खिशाला सहज परवडणाऱ्या या ५ स्मार्टफोन्सविषयी जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

मनी हससिस्ट या वेबसीरिजचे चाहते जसे त्याच्या पुढच्या सीजनची वाट बघत असतात तसे आयफोन प्रेमी नव्या आयफोनची वाट बघत असतात. नुकतंच आयफोनने आयफोन १३ वी सिरीज लाँच केली आहे. ज्याची किंमत १,५१,००० पर्यंत असेल. या फोनच सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यात ५जी कनेक्टिव्हिटी आहे. तसेच इतर धमाकेदार फीचर्स देखील आहेत 

 

iphone inmarathi

 

हे झालं आयफोनच पण अगदी सर्वसामान्यांना हा फोन परवडेलच असं नाही. स्मार्टफोन ही सध्याच्या जगात एक अत्यावश्यक वस्तू आहे. आपण फोन शिवाय राहूच शकत नाही असं नाहीये. पण, लोकेशन, कॉन्टॅक्ट, फोटो पाठवणे, वाचन करणे या गोष्टी स्मार्टफोनने इतक्या सहजरित्या करता येतात, की आता आपल्याला या जगण्याची सवय झाली आहे.

भारतात असलेल्या स्वस्त इंटरनेटमुळे मोबाईलचे जास्तीत जास्त फायदे करून घेणं सहज शक्य आहे.

५ वर्षांपूर्वी जेव्हा लोक स्मार्टफोन विकत घ्यायचे, तेव्हा फोटो काढणे, इतरांशी संपर्कात राहणं इतकाच उद्देश असायचा. सुरुवातीला ग्राहक हे दुकानदाराच्या सांगण्यानुसार मोबाईल निवडायचे.

स्मार्टफोनमुळे आज मात्र सगळेच स्मार्ट झाले आहेत. सर्व मोबाईल्सची माहिती, तुलना ही आज एका क्लिकवर तुमच्यासाठी उपलब्ध आहे.

 

click inmarathi

 

‘जितके फीचर्स जास्त तितका मोबाईल महाग’ असा सर्वसाधारण समज असतो. ते काही प्रमाणात बरोबर सुद्धा आहे. पण, भारताचा मोठा ग्राहक वर्ग आणि स्पर्धा लक्षात घेऊन सर्व मोबाईल कंपन्यांनी कमीत कमी किमतीत चांगला मोबाईल देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

अवघ्या ६,००० रुपयांपासून ते २०,००० पर्यंत असे अनेक कंपन्यांचे फोन आज बाजारात उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊयात त्या स्मार्टफोनबद्दल…

===

हे ही वाचा – चायनीज “नसलेला” फोन हवाय? ही आहे बेस्ट नॉन-चायनीज स्मार्टफोन्सची यादी…

===

१. सॅमसंग गॅलेक्सी M31

दीर्घ काळासाठी चालणारी बॅटरी हे सॅमसंगच्या फोनचं आधीपासून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या फोनमध्ये देखील 6000mah इतकी क्षमता असलेली बॅटरीआहे. सॅमसंगच्या या फोनला ६.४ AMOLED इन्फिनिटी डिस्प्ले आहे जो FHD+ रिजोल्यूशनला सपोर्ट करते. ऑक्टकोर प्रोसेसर असलेल्या उभा फोनमध्ये ८आहे तर १२८जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. कॅमेरा बघायला गेलो तर यात क्वाड कॅमेरा सेटअप आहे.

 

samsun inmarathi

 

 

अँड्रॉईड १० वर चालणारा हा फोन सॅमसंगने  निळ्या  रंगात ऑनलाईन बाजारात उपलब्ध करून देण्यात आला आहे. याची किंमत आहे फक्त १६,९९९ इतकी आहे.

२. रेडमी 10 प्रो मॅक्स

अल्पावधीतच भारतातील लोकप्रिय स्मार्टफोनपैकी एक असलेल्या रेडमीने आपल्या नंबरच्या सिरीजमधला आणखीन एक नवा फोन बाजरात आणला आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या या फोनला ६.६७ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. तसेच यात रेडमीने ५०२०mAH इतकी क्षमता असलेली बॅटरी दिली आहे. यात कॅमेरादेखील क्वाड पद्धतीचा आहे. या फोनची किंमत १९,९९९ पर्यंत आहे.

 

redmi inmarathi

 

===

हे ही वाचा – स्मार्टफोन्सचा ‘स्मार्ट’ वापर करण्यासाठी त्यातली ही लपलेली फीचर्स नक्की जाणून घ्या!

===

३. रिअलमी ८

तुम्हाला जर गेमिंगची आवड आहे तर फोन नक्की तुमच्या फायद्याचा आहे. यात मीडिया टेक हेलीयो G ९५ हा प्रोसेसर वापरला आहे ज्यामुळे तुम्हाला फोनवर गेम खेळणं सोपं होईल. ६.४ इंचीचा AMOLEDडिस्प्ले या फोनला दिला आहे. यात सुद्धा क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या फोन ची किंमत १८,९९९ पर्यंत आहे. महत्वाचे म्हणजे या फोनला ५जी कनेक्टिव्हिटी आहे.

 

realme inmarathi

 

४. पोको M3 pro 5G

चायनीज कंपन्यांच्या गर्दीत आणखीन एक कंपनी चर्चेत आली ती म्हणजे पोको. स्पर्धेबरोबर टिकण्यासाठी कंपनीने देखील फोनमध्ये ५जी  तंत्रज्ञान आणले आहे तसेच या फोनमध्ये ऑक्टा प्रोसेसर असून ६ जीबी रॅम असून १२८ जीबी स्टोरेज आहे. यात 48mp प्रायमरी कॅमेरा असून २ mp मॅक्रो कॅमेरा आणि २ mp डेप्थ सेन्सर असे ट्रिपल कॅमेरा आहे. या फोनला ५०००mAH इतकी क्षमता असलेली बॅटरी आहे. या फोनची किंमत १४,४९९ इतकी आहे.

 

poco inmarathi

 

५. जीओनी मॅक्स

ज्यांना दहा हजारच्या आतले फोन परवडतात त्यांना  जिओनी मॅक्स या कंपनीने सुद्धा चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ६.१ इंच इतकी मोठी स्क्रीन असलेल्या या मोबाईलची २ GB रॅम आहे.

३२ GB इतकी स्टोरेजची जागा असलेल्या या फोनमध्ये याशिवाय मेमरी कार्डचा स्लॉट सुद्धा आहे. फ्रंट कॅमेरा हा ५ मेगा पिक्सेल इतका आहे तर मागचा कॅमेरा हा १३ मेगा पिक्सेल इतका आहे.

अँड्रॉईड १० वर चालणाऱ्या या फोनमध्ये ५००० mAH इतकी मोठी बॅटरी देण्यात आली आहे. एकदा चार्जिंग केल्यावर तुम्हाला २ दिवस फोनच्या चार्जिंग कडे बघायची गरज नाही असं कंपनीने त्यांच्या जाहिरातीत म्हटलं आहे.

 

gionee max inmarathi

 

इतके खासमखास फीचर्स देणाऱ्या या फोनची किंमत मात्र अगदीच खिशाला परवडणारी आहे. अवघ्या ५,४९९ रुपयात हा मोबाईल विकत घेता येऊ शकतो.

सतत स्मार्टफोन वापरायची ज्या लोकांना गरज नसते अशा घरातील वरिष्ठ व्यक्तींना विडिओ कॉलिंग, व्हाट्सअप साठी हे फोन उपयुक्त ठरू शकतात.

===

हे ही वाचा – स्मार्टफोनच्या कॅमेरावर धूळ जमलीये? या ६ अफलातून युक्त्या वापरुन लेन्स करा स्वच्छ!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?