आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आली असताना दुसरीकडे कोरोनाचे लसीकरण सुरु आहे. कोरोनाला हरवण्यासाठी लस हे आपले सर्वात मोठे शस्त्र आहे. मात्र आता याच लसीवरून लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होऊन लस परिणामकारक ठरण्यासाठी तिचे दोन डोस घ्यावे लागत आहे. तसेच लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर सहा ते आठ आठवड्यांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे असे केंद्रीय आरोग्य विभागाने यापूर्वीच सांगितले.
==
हे ही वाचा : ज्या लसीमुळे कोरोनाचं संकट दूर होणार, ती लस शरीरात नेमकी काय जादू करते? वाचा
==
लसीकरण चालू असताना आता लसीचा देखील मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. अशा वेळेस अनेकांनी पहिला डोस तर घेतला मात्र दुसऱ्या डोसच्यावेळी लस उपलब्ध नसल्याने अनेकांना दुसरा डोस घेण्यासाठी वेळ लागत आहे.
त्यामुळे दोन लसींमध्ये असलेले अंतर सरकारने दिलेल्या वेळेपेक्षा अधिक होत असल्याने जनतेच्या मनात महत्वाचा आणि मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, की जर दुसरी लस घ्यायला वेळ झाला तर? सोबतच दोन वेगवेगळ्या कंपनीची लस घेऊ शकतो का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाले आपण या लेखातून याच प्रश्नांचे उत्तरं जाणून घेणार आहोत.
==
हे ही वाचा : कोरोनाची लस वाया जाते म्हणजे नेमकं काय? ही कारणं आहेत भविष्यातील धोक्याची घंटा
==
सहा ते आठ आठवड्यांच्या कालावधीत लोकांना लसीचा दुसरा डोस उपलब्ध झाला नाही किंवा कोणत्याही कारणांमुळे त्यांना तो घेता आला नाही तर त्याचा आरोग्यावर कोणताच चुकीचा परिणाम होत नाही. मात्र कोरोनाशी लढण्यासाठी आपल्याला दोन लसी घेणे खूपच महत्वाचे आहे.
जर दुसरी लस घेतली नाही तर, शरीरात आवश्यक तेवढ्या अँटीबॉडीज तयार होणार नाही. त्यामुळे कोरोनासोबत लढण्यासाठी आपल्या शरीरात लसींचा पाहिजे तेवढा प्रभाव राहणार नाही. एक लस कोरोनाला हरवण्यासाठी उपयुक्त नाही.
कोरोनासोबत सध्या आपल्या देशात कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लसींचे लसीकरण चालू आहे. कोरोनासोबत लढण्यासाठी आपल्याला दोन लसी घेण्याची गरज असल्याचे सर्वानाच माहित आहे. मात्र या लसीकरणामध्ये जनतेला पहिला डोस ज्या कंपनीचा लसीचा घेतला होता त्याच कंपनीच्या लसीचा दुसरा डोस घ्यायचा आहे.
म्हणजेच जर कोणी कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला असेल तर दुसरा डोस देखील कोव्हॅक्सीनचाच घ्यावा लागेल. लसीचे डोस दोन वेगवेगळ्या कंपनीचे घेता येणार नाहीत. कोव्हिशील्ड लस कोरोनापासून ७१ टक्के सुरक्षा देते. पण ही सुरक्षा लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर मिळते.
===
हे ही वाचा : कोरोनाची लस दंडातच का दिली जाते? हे कारण तुम्हाला ठाऊक असायलाच हवं
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.