' करोनामुक्तीसाठी भारताला जगभरातून मिळणारी मदत मोदींच्या परराष्ट्रनितीचा करिष्मा! – InMarathi

करोनामुक्तीसाठी भारताला जगभरातून मिळणारी मदत मोदींच्या परराष्ट्रनितीचा करिष्मा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

==

लेखक : मल्हार पांडे

==

सध्या भारताला प्राणवायू ऑक्सिजनची नितांत गरज आहे. पण दिवसागणिक लाखोंच्या संख्येने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे वैद्यकीय उपचारासाठी ऑक्सिजनचा वापर वाढत जात आहे.

खरं तर भारतामध्ये निर्माण होणाऱ्या सगळ्या ऑक्सिजनपैकी केवळ १५ टक्के ऑक्सिजन हा वैद्यकीय क्षेत्रासाठी वापरला जातो आणि इतर औद्योगिक क्षेत्रासाठी म्हणून वापरला जातो. सध्याची परिस्थिती पाहता, सरकारने सगळा ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्राकडे वळवला आहे.

सध्या राज्यातील वैद्यकीय परिस्थिती कोलमडलेली आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांमध्ये व्यवस्थित संवाद नाही. यावरूनच सध्याच्या परिस्थितीचे कारण समजू शकते. पण या विषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. ही वेळ फक्त माणूस वाचवण्याची आहे.

==

हे ही वाचा

आपण लस आयात करत बसलो आणि हे काय होऊन बसलं…!!

http://sh007.global.temp.domains/~udyojakl/inmarathi/121283/a-blog-about-indian-vaccine-diplomacy/

पालघरचे साधू, हिंदूंचा थंडपणा आणि खोटा सर्वधर्मसमभाव!

http://sh007.global.temp.domains/~udyojakl/inmarathi/120376/malhar-pande-blog-on-palghar-hindu-sadhu-incident/

==

आपल्या देशामध्ये निर्माण झालेली परिस्थिती पाहून अनेक देश आपल्या मदतीसाठी पुढे आले आहेत. यात केवळ मैत्री, माणुसकी हा हेतू नसून त्या मागे राजकीय कारणं सुद्धा आहेत.

oxygen cylinder

इंग्लंडने आपल्याला ६०० वैद्यकीय उपकरणं द्यायचे ठरवले आहेत. ज्यामध्ये ४९५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, १२० नॉन-इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटर आणि २० मॅन्युअल व्हेंटिलेटर आहेत.

तर सिंगापूरने भारताला ४ क्रायोजेनिक ऑक्सिजन सिलेंडर दिले आहेत. भारताचे मित्रराष्ट्र असलेल्या ऑस्ट्रेलियाने भारताच्या मदतीसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि PPE किट पाठवणार असल्याचे जाहीर केले आहे.

सौदी अरेबियाने ८० मेट्रिक टन ऑक्सिजन भारताला देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यु.ए.इ. भारताला हाय कपॅसिटी ऑक्सिजन टँकर पाठवून देत आहे.

फ्रान्स आणि जर्मनीची सुद्धा भारतीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरु आहे. या सगळ्यात रशिया ने भारताला सर्वात जास्त मदत केली आहे.

रशियाने भारताला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, जनरेटर आणि करोनासाठी उपयुक्त म्हणून वापरली जाणारी औषधं पाठवून देणार असल्याचे, जाहीर केले आहे. शिवाय तब्बल चार लाख रेमडेसीवीर इंजेक्शन्स पाठवून देण्याचे सुद्धा जाहीर केले आहे.

आता काही लोकांच्या मते, आपल्याला बाहेरून मदत घ्यावी लागत आहे म्हणजे सरकार कमकुवत आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, सरकारने मदत मागितलेली नाही, इतर देश आपल्या देशाला मदत करण्यासाठी म्हणून पुढे येत आहेत.

modi foreign tour

या सगळ्यात हे सगळे जरी माणुसकीच्या दृष्टीने भारताला मदत करत असले, तरी या सगळ्या मागे त्यांचा राजकीय आणि औद्योगिक हेतू आहे यात दुमत नाही आणि ज्याला कोणाला हे समजत नसेल त्याने राजकारणावर भाष्य करणं सोडून द्यावं.

गेल्या सात वर्षात पंतप्रधान मोदींनी अनेक देशांचे दौरे केले. अनेक देशांसोबत आपले हितसंबंध वाढले. जगातील महासत्ता असलेल्या देशांसोबत आपला संवाद चांगला झाला.

सन २०१४ पूर्वी विविध समिटमध्ये जेथे भारत फक्त श्रोत्याची भूमिका निभवात होता, तेथे आज त्याच समिटमध्ये जागतिक निर्णय घेताना भारताचे मत ऐकून घेतले जाते आणि त्यावर गांभीर्याने विचार करून बहुतेकदा ते अंमलातसुद्धा आणले जाते.

vaccine maitri

आपला भारत देश हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. त्यामुळे आपल्या देशाकडे संपूर्ण जग एक नवीन औद्योगिक क्षेत्र म्हणून पाहत आहे. हेच भारताला जगभरातून मिळत असलेल्या मदतीच्या मागील खरे कारण आहे.

आज सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांनी आपल्याला मदत केली आहे याचे कौतुक होत आहे. पण आपण हे विसरत आहोत कि VACCINE MAITRI च्या अंतर्गत भारताने याच आखाती देशांना लाखो लसी दिल्या आहेत. त्यांच्या देशातील बहुतांश लोकांचे लसीकरण झाले आहे.

यु.के. आणि ऑस्ट्रेलियामध्ये भारतीयांचे संख्या जास्त आहे आणि तेथील भारतीयांनी या देशांच्या प्रगतीमध्ये हातभार लावला आहे. त्यांच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये भारतीयांमुळे प्रगती होत आहे. हे दोन्ही देशांच्या प्रमुखांनी या आधी सांगितले आहे.

या गोष्टीसाठी म्हणून हे देखील देश आपल्या मदतीसाठी पुढे आले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये VACCINE MAITRI च्या अंतर्गत आपण जवळपास ६ कोटी लसी अनेक देशांना भेट म्हणून दिल्या. परिणामी,

modi with australia pm

भारताची प्रतिमा आंतराष्ट्रीय पटलावर प्रचंड शक्तिशाली असल्याचे समजले. तसेच भारताचा मूलमंत्र ‘वसुधैव कुटुंबकम’ हा संपूर्ण जगाला काळाला.

भारताला जगाचे WORLD PHARMACHY HUB म्हटले जाते. आपल्या देशातून अनेक देशांना विविध लसी, औषधं वेळोवेळी निर्यात केली जातात. काही लोकांना जग भारताला करुणेच्या नजरेने पाहत असून त्यामुळेच मदत करत असल्याचे दिसत आहे. त्यांनी खरंच वाचन वाढवणं गरजेचं आहे. अनेक देशांना भारतासोबत चांगले संबंध ठेवणं हे त्यांच्या भविष्यासाठी चांगले आहे हे माहित आहे.

सध्या घडत असलेल्या गोष्टींवर राजकारण न करता, विरोधाला विरोध न करता, जसे इतर देश भारताला या संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढे सरसावत आहेत त्याचप्रमाणे स्वतःचा फायदा बघून तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या देशाला यातून बाहेर कसे काढता येईल यासाठी विचार केला पाहिजे!

जय हिंद!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?