आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
इंदिरा गांधींचे पुत्र संजय गांधी यांचं नाव ऐकल्यावर काय आठवतं? मुंबई मधलं नॅशनल पार्क? नसबंदी? आणीबाणी?
ऑटोमोबाईल क्षेत्रात इंटरेस्ट असेल तर एखाद दुसरा सांगेल मारुती-सुझुकी, होय मारुती सुझुकी!
जपानच्या सुझुकी कंपनी सोबत टायअप व्हायच्या आधी मारुती वेगळी कार निर्माती कंपनी म्हणून कार्यरत होती आणि या मारुतीचा पाया घातला संजय गांधी यांनी!
तर बघूया मारुती सुझुकीच्या उदयात संजय गांधी यांच्या असलेल्या सहभागाबद्दल. देशातली सगळ्यात महागडी शाळा डुन स्कुलमधून बाहेर पडल्यानंतर १९६४ साली संजय गांधी लंडनला गेले.
तिथेच स्थानिक रोल्स रॉईसच्या फॅक्टरीमध्ये त्यांना इंटर्नशिप मिळाली. लॅविश आणि श्रीमंत लोकांची पहिली पसंती असलेल्या रोल्स रॉईस मध्ये गाडी बनवायची एकूण प्रक्रिया समजल्यानंतर १९६६ साली संजय गांधी भारतात परतले.
भारतीयांना स्वस्तात चार चाकी गाडी उपलब्ध करून द्यायच्या हेतूने! भारतात आल्या नंतर त्यांनी आपल्या या प्रोजेक्टवर आल्या आल्या लागलीच कामाला सुरुवात केली.
===
हे ही वाचा – आणीबाणी आणि “एका चित्रपटामुळे” संजय गांधीं गेले थेट तुरुंगात!
===
राजकीय पाठबळ मजबूत असल्याने त्यांना दिल्लीच्या प्रसिद्ध गुलाबी बाग भागात वर्कशॉपसाठी जागा उपलब्ध झाली आणि त्याच वर्कशॉपमध्ये संजय गांधी यांनी आपल्या गाडीचं बेस मॉडेल तयार केलं. पुढील तीन वर्षात त्यांनी अजून तीन गाड्यांच्या मॉडेलचे प्रोटो टाईप तयार केले.
आपल्या कल्पनांवर बऱ्यापैकी काम झाले आहे असे वाटल्यानंतर त्यांनी आपली कार बनवायची कल्पना तत्कालीन पंतप्रधान आणि त्यांच्या आई इंदिरा गांधी यांना सांगितली.
भारतीयांना स्वस्तात मिळणाऱ्या गाडीबद्दलची आपल्या मुलाची कल्पना इंदिरा गांधी यांना प्रचंड आवडली. संजय गांधी यांच्या सुचनेनुसार इंदिरा गांधी यांनी आपल्या कॅबिनेट समोर गाडी निर्मितीसाठी एका सरकारी कंपनीच्या स्थापनेचा प्रस्ताव ठेवला.
कॅबिनेट मध्ये झालेल्या चर्चेत आणि बैठकीत आलेल्या सूचनेनुसार शेवटी ४ जून १९७१ रोजी ‘मारुती मोटर्स लिमिटेड’ या कार निर्मिती करणाऱ्या सरकारी आस्थापनाचे गठन केले गेले आणि मॅनेजिंग डायरेक्टर पदाची जबाबदारी संजय गांधी यांना दिली गेली.
गाडीनिर्मिती मध्ये संजय गांधी यांना अनुभव हा शून्य होता त्यामुळे संजय गांधी यांच्या या नियुक्तीवर तेव्हा असे भरपूर प्रश्न निर्माण केले गेले.
पण सगळ्या विरोधाला बाजूला ठेवून इंदिरा गांधी आपल्या निर्णयावर ठाम होत्या आणि कॉन्ट्रॅक्ट नुसार मारुतीला दर वर्षी ५० हजार गाड्या निर्मितीसाठी मंजुरी दिली गेली.
कार बनवण्याचा आपला अनुभव कमी पडत असल्याचे लक्षात येताच संजय गांधी यांनी पार्टनर शिपसाठी प्रसिद्ध जर्मन कंपनी फॉक्स वॅगन सोबत चर्चा सुरू केली.
टेक्नॉलॉजी मध्ये असलेली फारकत, पार्टनरशिप मधली टक्केवारी सारख्या गोष्टींमुळे मारुती आणि फॉक्स वॅगन मध्ये समझौता नाही होऊ शकला.
संजय गांधी यांच्या मारुती कंपनीला तत्कालीन विरोधी पक्षाने लायसन्स देण्यावरून खूप विरोध केला केला, पण त्याचा एवढा काही फरक पडला नाही.
संजय गांधी यांच्यावर पुस्तक लिहिणाऱ्या विनोद मेहता यांनी आपल्या पुस्तकात-‘द संजय गांधी स्टोरी’ मध्ये लिहिले आहे, १९७१ च्या पाकिस्तान युद्ध आणि बांगलादेश निर्मितीच्या काळात मारुतीला लायसेन्स द्यायची गोष्ट मागे राहून गेली आणि लागलीच आणीबाणी लावली गेली!
===
हे ही वाचा – इंदिरा सरकारच्या काळात झालेल्या एका खटल्यामुळे आज भारतात हुकूमशाही नाहीये!
===
आणीबाणी गेल्यानंतर मात्र जनता दलाचे सरकार आले आणि त्यांनी मारुती प्रोजेक्ट बंद करून टाकला, शिवाय मारुतीमध्ये गांधी परिवाराचा असलेला हस्तक्षेप पाहता मोरारजी देसाई यांनी मारुती प्रोजेक्टवर चौकशी समिती गठीत केली, हीच ती प्रसिद्ध ‘शाह कमिशन’.
जनता दलाचे सरकार काय जास्त काळ टिकले नाही अन इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या.
पण, इंदिरा सत्तेत पुन्हा आरूढ झाल्यानंतर काही महिन्यातच संजय गांधी यांचा अपघातात मृत्यू झाला आणि संजय गांधी यांचं स्वस्त गाडीचे स्वप्न अधुरेच राहणार असे दिसू लागले.
सत्तेत आल्यानंतर इंदिरा गांधींनी मारुतीवर असलेले सगळे निर्बंध दूर केले आणि जपानच्या सुझुकी सोबत पार्टनरशिप करून मारुती-सुझुकी कंपनीचा पाया घातला आणि डिसेंम्बर १९८३ मध्ये मारुती सुझुकीची पहिली गाडी लॉन्च झाली-मारुती ८००.
ही तीच मारुती ८०० आहे जिचा सर्वाधिक विक्रीचा एकेकाळी रेकॉर्ड होता. मारुती सुझुकीची आयकॉन म्हणून आजही ही गाडी प्रसिद्ध आहे.
तर, अशा प्रकारे इंदिरा गांधी यांनी आपल्या मुलाचे स्वप्न सत्यात उतरवले.
गाडीच्या लॉन्चच्या वेळेस त्या स्वतः राजीव गांधी सोबत जातीने हजर होत्या. शिवाय मारुती ८०० घेणाऱ्या ग्राहकाला इंदिरा गांधी यांनी स्वतः गाडीच्या चाव्या सुपूर्त केल्या होत्या.
संजय गांधी यांनी स्वप्न पाहिले पण ते पूर्ण व्हायच्या आधीच ते निघू गेले. पण भारतीयांना स्वस्त गाडी मिळण्याचा त्यांचा हेतू हा सफल झाला!
===
हे ही वाचा – “मेक इन इंडिया” चा नारा सर्वप्रथम दिला होता नेहरूंनी, भारतीय आर्मीसाठी, वाचा!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.