आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दिल्लीतला सफदरजंग मार्ग जसा तिथल्या राजकीय इतिहासाचा साक्षी आहे, तसंच महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय घटनांचा साक्षी असलेला वर्षा बंगलादेखील तितकाच लोकप्रिय आहे!
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वर्षा बंगल्याचं असलेलं अनन्यसाधारण महत्त्व हे नुकत्याच झालेल्या सत्ताबदलाच्या वेळी समजलं असेल.
जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा हा प्रश्न कित्येकांनी उचलून धरला की “राज्याचे मुख्यमंत्री आपलं घर सोडून वर्षावर जाणार का?”
असो तो एक वेगळा मुद्दा झाला पण सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे निवासस्थान म्हणून ओळखला जाणाऱ्या वर्षा बंगल्याचा इतिहास तुम्हाला ठाऊक आहे का? या बंगल्याचं नाव वर्षा कसं पडलं आणि तो मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून का ओळखला जाऊ लागला याविषयी आपण जाणून घेणार आहोत!
१९६३ ते १९७५ असा कार्यकाल असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यामुळेच वर्षा बंगल्याचं वर्चस्व प्रस्थापित झालं, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळख असणाऱ्या नाईक आणि वर्षा बंगल्याचा हा इतिहास बराच जुना असून तो खूप लोकांना ठाऊक नाही!
प्रसिद्ध साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी लिहिलेल्या चरित्रात नाईक आणि वर्षा बंगल्याचे लागे बंधु तुम्हाला सापडतील, त्या पुस्तकात त्यांनी याबद्दल विस्तृतपणे माहिती दिलीच आहे!
===
हे ही वाचा – जेव्हा शिवसेना “फारच” वादग्रस्त आहे म्हणून भाजपने साधली होती पवारांशी जवळीक…!
===
वसंतराव मुख्यमंत्री होईपर्यंत किंवा ते द्विभाषिक राज्याचे मंत्री होईपर्यंतदेखील वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांचं निवास नव्हता!
वसंतराव नाईक जेव्हा कृषिमंत्री झाले तेव्हा सरकारने त्यांना ब्रिटिश काळातील डग बिगन नावाचा बंगला राहण्यासाठी दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. वसंतराव आणि त्यांच्या पत्नी वत्सलाबाई हे दोघेही खूप हौशी होते आणि त्यांना टापटीपीची प्रचंड आवड होती.
सुरुवातीला वत्सलाबाई यांना हा बंगला फारसा काही आवडला नाही, काहीही खासगीपण बंगल्याला नसल्याने इतरांनी नाकारलेला बंगला आपल्याला दिला अशी त्यांची समजूत झाली.
आपल्या मुलाच्या वाढदिवशी नाईक आपल्याला कुटुंबाला घेऊन डग बीगनवर वास्तव्यास आले. वसंतराव यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पाऊस शिवाय ‘शेतकऱ्याचे गाणे’ ही त्यांचे आवडती कविता.
त्यामुळे त्याच दिवशी त्यांनी डग बीगनचे नामांतर करून वर्षा हे नाव ठेवले. वर्षा बंगल्याच्या परिसरात त्यांनी आंबा, लिंबू, सुपारी अशी विविध प्रकारची झाडं लावली, आणि ते तिथल्या माळ्याला सांगायचे की ही झाडं इथे भविष्यात राहायला येणाऱ्या लोकांसाठी लावली आहेत.
मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या अचानक निधनानंतर राज्याची जवाबदारी वसंतराव यांच्यावर आली आणि ५ डिसेंबर १९६३ या दिवशी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला!
मंत्रिमंडळाची बैठक आटोपून वसंतराव जेंव्हा वर्षा बंगल्यावर गेले तेव्हा त्यांच्या मोठ्या भावाने उद्गार काढले ते म्हणजे “या वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून नावलौकिक मिळणार असंच दिसतं!” आणि तेंव्हापासून वर्षा बंगला आणि मुख्यमंत्री हे नातं तयार झालं ते आजतागायत अबाधित आहे!
वसंतराव यांच्या पत्नी वत्सलाबाई यांना वर्षा बंगल्यात बऱ्याच सुधारणा करायच्या होत्या पण अत्यंत संयमीपणे वसंतराव यांनी त्यांना विरोध केला.
त्यांच्यामते आपण आज मंत्री आहोत उद्या नसू त्यामुळे आपल्याखातर सरकारवर अतिरिक्त खर्चाचा बोजा नको या कारणास्तव त्यांनी त्या बंगल्यात काही बदल करू दिले नाहीत!
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर वसंतराव यांनी वर्षावरचं वास्तव्य हलवलं, पण त्यांच्यामुळे आणि त्यांच्या कुटुंबामुळे आज या बंगल्याला मुख्यमंत्री निवास म्हणून जी ओळख मिळाली आहे ते फारसं कुणाला ठाऊक नाही!
===
हे ही वाचा – “यवतमाळ”: इंग्रजांचं ‘हिलस्टेशन’ आणि महाराष्ट्राच्या ‘कॉटन सिटी’ बद्दल जाणून घ्या!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.