Site icon InMarathi

४०० सिनेमांचा अनुभव गाठीशी असूनही सुरमा भोपाली लोकांसमोर यायला २५ वर्षे लागली

jagdeep featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

शोले सिनेमा म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर ते रामगढ गाव, तिथले गावकरी, गब्बर सिंग, ठाकूर, जय-विरू यांची जोडी, बसंती-धांनोची जोडी असं सगळं एकंदर चित्र उभं राहतं!

नुकत्याच होऊन गेलेल्या होळीच्या दिवशीसुद्धा कित्येक जण यातल्या त्या डायलॉगची आणि त्यातल्या सदाबहार गाण्यांची आठवण काढतात!

या पात्रांसोबत आणखीनही अशी काही पात्र आहेत जी फक्त सिनेमात थोड्याच वेळासाठी येतात पण त्यांचं ते पात्र आणि त्यांनी वठवलेली भूमिका आपल्या डोक्यात अगदी फिट्ट बसते, कदाचित यासाठीच शोले हा अजरामर सिनेमा मानतात!

कारण यातली पात्र, घटना सगळं काल्पनिक असलं तरी त्यातल्या प्रत्येक गोष्टीशी प्रेक्षकांचं नातं जोडण्यात सलीम जावेद यांना जे यश लाभलं आहे तसं कोणत्याच लेखक दिग्दर्शकाला शक्य नाही!

 

 

शोले मधला मॅकमोहन यांनी साकारलेला सांभा, असरानी यांनी साकारलेल्या जेलर पासून गावातल्या कापूस पिंजणाऱ्या माणसापर्यंत प्रत्येक पात्राला काय महत्व आहे हे लोकांना चांगलंच ठाऊक आहे!

===

हे ही वाचा “शोले”बद्दल खूप चर्चा होतात – पण शोलेबद्दलच्या या पडद्यामागील १५ गोष्टी फार कमी जणांना माहिती असतील!

===

यापैकीच एक पात्र म्हणजे जय-विरू यांना पोलिसांच्या ताब्यात देणारा आणि इनामाचे पैसे घेऊन स्वतःबद्दल बरंच काही मिर्च मसाला लावून सांगणारा लाकडाचा व्यापारी सुरमा भोपाली!

 

 

हे अफलातून पात्र साकारून आपल्या सगळ्यांच्या मनात कायमची जागा निर्माण करणारे अभिनेते जगदीप यांच्याविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत!

२९ मार्च १९३९ साली दतीया सेंट्रल प्रोविन्स (आत्ताच्या मध्य प्रदेश) मध्ये जगदीप यांचा जन्म झाला. सैयद इश्तियाक अहमद जाफरी हे त्यांचं मूळ नाव, जगदीप हे त्यांचं स्टेजवरचं नाव आणि पुढे त्याच नावाने ते नावारूपाला आले!

वडिलांचं निधन आणि १९४७ मधली फाळणी यामुळे जगदीप यांच्या डोक्यावरचं छत हरवलं, आणि पोटाची खळगी भरण्यासाठी ते त्यांच्या आईबरोबर मुंबईला आले!

एका अनाथ आश्रमात स्वयंपाक करून त्यांच्या आईने त्यांना शाळेत शिक्षणासाठी घातलं खरं पण त्यांच्यातला कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता, आईचे कष्ट बघून त्यांनी शाळा सोडून काम करून आईला हातभार लावायचे जगदीप यांनी ठरवले आणि ते रस्त्यावर वेगवेगळ्या गोष्टींची विक्री करू लागले!

१९५१ सालच्या अफसाना या सिनेमात जगदीप यांना प्रथम एका बालकलाकार म्हणून ब्रेक मिळाला, तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि वेगवेगळ्या सिनेमातून त्यांनी कामं करायला सुरुवात केली!

 

 

तब्बल ४०० सिनेमांमध्ये काम केल्यानंतर जगदीप यांना खरी ओळख मिळाली ती रमेश सिप्पी यांच्या १९७५ सालच्या शोले सिनेमात! शोले मधलं सुरमा भोपाली हे पात्र आजही लोकांच्या स्मरणात आहे.

===

हे ही वाचा भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘उपेक्षित’ अभिनय सम्राट!

===

भोपाळमधल्या खऱ्या फॉरेस्ट ऑफिसरशी मिळतं जुळतं हे पात्र लिहिलं गेलं होतं आणि जगदीप यांनीदेखील ते पात्र इतक्या खुबीने वठवलं. साडे तीन तासाच्या सिनेमात निव्वळ काही सेकंदासाठी दिसणारा हा सुरमा भोपाली आजही तुमच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आणतं.

४०० सिनेमे करूनसुद्धा प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी जगदीप यांना इतका संघर्ष करावा लागला याची कल्पनादेखील आपण करू शकणार नाही. शोलेमधल्या रोलनंतर मात्र जगदीप वरचेवर मोठमोठ्या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येऊ लागले.

 

 

राजकुमार संतोषी यांचा अंदाज अपना अपना, बच्चन आणि टिनू आनंद यांचा शहनशहा अशा वेगवेगळ्या सिनेमातून जगदीप यांनी अव्वल अभिनय काय असतो ते दाखवून दिलं!

जगदीप यांनी ३ लग्न केली, आणि त्यांना ३ मुलंदेखील आहेत. त्यातली नावेद आणि जावेद ही जोडी आपल्याला ठाऊक आहेच. टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध डान्सशो सुरू करणाऱ्या नावेद आणि जावेद यांची त्या काळात चांगलीच चलती होती!

जावेद जाफरी हा उत्तम डान्सर आहे शिवाय अभिनयातही त्याने त्यांचं नशीब आजमावलं, तो उत्कृष्ट नट म्हणून आजही ओळखला जातो पण त्या क्षेत्रात म्हणावं तसं यश काही त्याला लाभलं नाही!

 

 

भूमिकेची लांबी कितीही असो, सिनेमात भाव कसा खाऊन जायचा हे जगदीप यांच्या कित्येक भूमिकांमधून शिकण्यासारखं आहे, २० जुलै २०२० साली जगदीप यांचं निधन झालं!

कधीही स्वतःच्या ग्लॅमरसाठी कोणाचीही हांजी हांजी न करणाऱ्या, केवळ आणि केवळ कलेवर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या, आणि तब्बल ४०० हून अधिक सिनेमे करूनही लोकप्रिय होण्यासाठी कित्येक वर्ष मेहनत करणाऱ्या या अवलिया कलाकाराला मानाचा मुजरा!

===

हे ही वाचा बॉलिवूडमधील रंगभेदामुळे अनेक वर्षे अंधारात राहूनही स्वबळावर उजळलेला तारा आपल्यालाही प्रेरणा देतो!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version