Site icon InMarathi

स्वातंत्र्यपूर्व काळातही “लिव्ह इन रिलेशनशिप” मध्ये राहणारा बेधडक भारतीय नेता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रेम ही संकल्पनाच सध्या इतकी संकुचित झाली आहे की लोकांना सध्या प्रेमसुद्धा फास्टफूड सारखं हवंय. आजच प्रपोज केलं आजच त्याचं उत्तर हवं आहे आणि आजच सगळी मजा अशी सध्या प्रेमाची व्याख्या आहे.

लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये सुद्धा आजकाल तुम्हाला बराच फरक जाणवेल. सध्याची लग्नं झालेली जोडपी ही त्यांच्या करियरवर इतकी लक्ष केंद्रित करून असतात, की कुटुंबाकडे ते कायम दुय्यम नजरेने बघत असतात.

सध्याच्या तरुणाईत तर आणखी एक कन्सेप्ट वाढीस लागलेली दिसते ती म्हणजे DINK (Double Income No Kid)! काळ बदलला तसं प्रेमाचं स्वरूप बदलतं हे यावरुन स्पष्ट होतं!

 

 

त्याप्रमाणेच काही वर्षांपूर्वी एका गोष्टीचा इतका सुळसुळाट झालेला की प्रत्येक समाजमाध्यमात तसेच घरातसुद्धा यावर चर्चा व्हायची ती गोष्ट म्हणजे लीव्ह इन रिलेशनशिप!

सध्याच्या काळात लीव्ह इन ही गोष्ट भारतात अगदी कॉमन झाली असली तरी ती फक्त मुंबई, पुणे, बेंगलोर अशा मोठ्या मेट्रो सिटीजमध्येच! आजही भारताच्या बहुतांश भागात या गोष्टीला विदेशी चाळे याच दृष्टिकोनातून पाहिलं जातं!

आपली लोकं आजही ‘लीव्ह इन’मध्ये राहायचं म्हटल्यावर कोणतीही जवाबदारी नको असाच विचार सगळे करतात. लीव्ह इन म्हणजे फक्त स्वैराचार हेच आपल्या लोकांच्या डोक्यात फिट्ट असतं!

पण तुम्हाला माहितीये का ६० आणि ७० च्या दशकात देशातला एक मोठा राजकीय नेतासुद्धा लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये आयुष्य व्यतीत करायचा, होय आणि त्या नेत्याचं नाव होतं राम मनोहर लोहिया!

===

हे ही वाचा मुस्लीम कट्टरवादाचा चलाख वापर करून राम मनोहर लोहियांना हरवण्यासाठी काँग्रेसनं रचलेला डाव

===

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतलं सर्वात महत्वाचं नाव म्हणजे राम मनोहर लोहिया! ब्रिटिशकाळात लोहिया हे कॉँग्रेसच्या रेडियोसाठी काम करायचे!

१९१२ साली उत्तरप्रदेश इथल्या अकबरपुर इथल्या गावी जन्म घेतलेल्या राम मनोहर यांनी मुंबईतून शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि कलकत्ता युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पदवी मिळवली!

 

 

कॉँग्रेस सोशलीस्ट पार्टीचे ते संस्थापक सदस्य होते तसेच १९३६ मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी त्यांची नियुक्ती कॉँग्रेसच्या कमिटीवर केली होती, पण १९३८ मध्ये त्यांनी त्या कामातून काढता पाय घेऊन स्वतंत्रपणे राजकारणात काम करायचं ठरवलं!

भारत छोडो आंदोलनातसुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग होता! जर्मन भाषेवर प्रभुत्व असलेल्या लोहिया यांना हिंदी, बंगाली, मराठी, इंग्रजी आणि फ्रेंच या भाषाही अवगत होत्या!

राम मनोहर लोहिया यांना असं राष्ट्र हवं होतं जिथे कोणत्याही सीमा नाहीत, कोणतीही बंधनं नाहीत आणि त्यांच्या याच स्वभावाचं दर्शन घडवणाऱ्या एका घटनेविषयी आपण जाणून घेणार आहोत!

स्त्री पुरुष यांच्यात कसलाच भेदभाव नसावा प्रत्येकाला सारखेच स्वातंत्र्य हवे या विचारांचे राम मनोहर लोहिया हे एकमेव राजकारणी त्याकाळी होते, शिवाय त्यांच्या कित्येक महिला सहकारी आणि मैत्रिणी देखील होत्या आणि त्यांच्याशी त्यांचा व्यवहार हा कायम चांगलाच असायचा!

त्यामुळेच कधीच कोणत्याही वादात त्यांचे नाव आले नाही फक्त बंगालच्या रोमा या महिलेशी त्यांचे नाव जोडले गेले आणि आज या लेखातून त्याबद्दलच जाणून घेणार आहोत!

रोमा ही बंगाली वामपंथी परिवारातली एक सुशिक्षित महिला होती, आणि जेंव्हा लोहिया युरोपमध्ये त्यांचं उर्वरित शिक्षण आणि पीएचडी करायला गेले तेव्हा त्यांची गाठभेट होत असे!

५० ते ६० च्या दशकात रोमा आणि लोहिया हे दोघे चक्क लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकमेकांसोबत राहत होते, काळाच्या मानाने हे एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल होतं, पण या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा या दोघांनी कधीच घेतला नाही!

रकाबगंज इथल्या सरकारी निवासस्थानी लोहिया आणि रोमा एकत्र राहत होते! याच निवासस्थानी लेखक आयउब सैयद यांनी लोहिया यांची एक मुलाखत घेतली आणि तिथे त्यांनी या दोघांना एकत्र राहताना बघितलं!

 

 

रोमा देखील सगळ्या मर्यादा पाळून लोहिया यांच्यासोबत जीवन व्यतीत करायची हे त्यांनी देखील पुढे सांगितले! दिल्ली विश्वविद्यालयाच्या प्रख्यात मीरांडा हाऊस मध्ये लेक्चरर म्हणून काम करायच्या!

१९६७ मध्ये लोहिया स्वर्गवासी झाले, रोमा यांनी १९८३ मध्ये त्यांनी “लोहिया थ्रू लेटर्स” हे पुस्तक प्रकाशित केलं, ज्यात लोहिया यांनी लिहिलेल्या लव्हलेटर्सचा समावेश करण्यात आला होता!

रोमा यांना १९८५ मध्ये देवाज्ञा झाली. आयुष्यभर स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करणाऱ्या आणि त्याप्रमाणेच बेधडक आणि मर्यादा ओळखून वागणाऱ्या राममनोहर लोहिया यांच्या या गोष्टी त्यांच्या पार्टीने आणि अनुयायांनी कधीच वर येऊ दिल्या नाहीत याचा खेद आहे!

 

 

अटलबिहारी वाजपेयी यांनी एकदा वक्तव्य केलं होतं की “मैं अविवाहित हूं लेकिन कुँवारा नहीं” या एका वाक्यावरून आणि राम मनोहर लोहिया यांच्या जीवनप्रवासावरुन एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे जाणवते की नात्याला नाव देताही प्रेम करता येतं आणि ते टिकवताही येतं!

===

हे ही वाचा पंडित नेहरू आणि एडविना माउंटबटन : अनैतिक म्हणून हिणवलं गेलेलं मैत्रीचं हृद्य नातं

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version