Site icon InMarathi

भारताचा कर्णधार कपिलदेव जेव्हा थेट ‘दुबईवाल्याला’ भिडला होता…!!

kapil dev vs dawood inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शारजामध्ये भारतीय क्रिकेट संघ असा विषय निघाला की काय आठवतं? सच्चे क्रिकेट प्रेमी असाल तर पहिली घटना लक्षात येईल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कोकाकोला कप आणि त्या स्पर्धेत आलेलं सचिन तेंडुलकर नावाचं ‘डेझर्ट स्टॉर्म’!

क्रिकेटचे अजून थोडे मोठे चाहते असाल, तर अजून दशकभर मागे जाल आणि न आवडणारी घटना सांगाल. कोणती बरं? तर जावेद मियादादने शेवटच्या बॉलवर षट्कार मारून भारताच्या हातून खेचून नेलेली मॅच. राईट.?

 

 

मियाँदादने षट्कार मारुन मॅच तर जिंकलीच, पण त्याच सिरीजदरम्यान एक अनपेक्षित घटना घडली. त्यावेळी या गोष्टीची फारच चर्चा झाली होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा देताना दिलीप वेंगसरकर यांनी या घटनेबद्दल सांगितले होते. आज त्याच घटनेबद्दल आपण विस्तारात पाहूया.

१९८५-८६ मध्ये भारताचा क्रिकेट संघ अरब देशामध्ये ऑस्ट्रो-एशिया कप स्पर्धेसाठी गेला होता. सेमी फायनलमध्ये लंकेला धूळ चारून भारत स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. फायनलमध्ये भारताची स्पर्धा होती, ती रेग्युलर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी!

असं असताना फायनलच्या आधी घडला होता ‘ड्रेसिंग रूम कांड’.! क्रिकेट संघांच्या ड्रेसिंग रूममध्ये, खेळाडूंव्यतिरिक्त इतर कोणीही येणे हे मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंग सुरु होण्याआधी सामान्य गोष्ट होती.

फायनलच्या आधी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला मुंबईच्या बदनाम गल्लीचा बादशाह अंडरवर्ल्ड डॉन ‘दाऊद इब्राहिम’!

===

हे ही वाचा – हा पत्रकार नसता तर दाऊदचा ‘तो’ फोटो कधीच आपल्यासमोर आला नसता!

===

साखळी बॉम्बस्फोट अंमलात आणायच्या आधीपासूनच तो डॉन होता, तरीही दाऊदचं भारतात आणि भारतातून इतर देशात विना अटकाव येणं जाणं सुरू असायचं.

डॉन म्हणून जरी दाऊद बदनाम असला, तरी त्याच्या नावाची दहशत होती. लोक तेव्हा त्याला घाबरत सुद्धा असत आणि त्याच्याविषयी काहींच्या मनात भीतीयुक्त इज्जत होती.

 

 

प्रसारमाध्यमे तेव्हा फारशी प्रगत नव्हती. दाऊद काळा की गोरा हे अनेकांना ठाऊक नव्हतं. जेव्हा भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये दाऊद पोहोचला तेव्हा लहानपणापासून मुंबईकर असलेल्या दिलीप वेंगसरकर व्यतिरिक्त कुणीही दाऊदला ओळखलेलं नव्हतं.

ड्रेसिंग रूममध्ये आलेल्या दाऊदने भारतीय संघाने फायनल जिंकली, तर प्रत्येक खेळाडूला टोयोटाची कोरोला भेट देणार असं जाहीर केलं.

मुळात दाऊदची हे अमिश देण्याची हिंमत झाली किंवा दाऊद हे बोलू शकला कारण त्यावेळेस ड्रेसिंग रूममध्ये भारतीय संघाचा कर्णधार ‘कपिल देव’ हा अनुपस्थित होता.

खरंतर कपिलच्या समोर आमिष दाखवणे ही अनेकांसाठी न परवडणारी गोष्ट ठरली आहे. मात्र कपिल तेव्हा पत्रकार परिषदेत व्यस्त होता.

पत्रकार परिषद आटपून जेव्हा कपिल ड्रेसिंग रूममध्ये परतला, तेव्हा संघ सहकाऱ्यासोबत चर्चा करण्याच्या हेतूने त्याने इतरांना बाहेर जाण्यास सांगितले.

 

 

भारतीय संघासोबत असलेल्या महमूद यांच्यासोबत दाऊद ड्रेसिंग रूममध्ये आलेला होता. ‘मेहमूद साहेब,आप बाहर निकलिये।’ म्हणत कपिलने मेहमूदला बाहेर काढलं.

अनोळखी असलेल्या दाऊदकडे आपला मोर्चा वळवत कपिल म्हणाला, ‘और तू, तू कौन है बे? चल चल बाहर निकल।’ असं म्हणत त्याला हटकून ड्रेसिंग रूमच्या बाहेर काढले.

अपमानित होऊन बाहेर गेलेला दाऊद ‘कार कॅन्सल’ ओरडत तावातावाने तिथून निघून गेला.

मेहमूद यांनी एक मोठा बिझनेसमन अशी दाऊदची ओळख करून दिली होती. त्यांनी त्याचं नाव मात्र सांगितलं नाही. पण मुंबईत असताना त्याला बघितले होते, त्यामुळे वेंगसरकर यांना माहीत होते, की तो बिझनेस मन नव्हे, तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आहे.

त्याची ओळख करून देताना मेहमूद म्हणाले होते, की जर भारतीय संघ फायनल जिंकला तर सदर व्यक्ती सगळयांना टोयोटाची कार भेट करणार आहे. पण त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये आलेल्या कपिलने त्या ‘बिझनेसमन’चा असा काही पाणउतारा केला, की तो तावातावाने तिथून निघून गेला.

===

हे ही वाचा – क्रिकेटपटू नसुनही क्रिकेट विश्वातला सेलिब्रिटी बनलेल्या या अवलियाच्या रंजक गोष्टी!

===

मुळात कपिलला बाहेरच्या इतरांनी खेळाडूंना भेटणे अजिबात पटत नसे. वेंगसरकर यांनी सांगितलेल्या या घटनेनंतर कपिल देव यांनी त्यावर खुलासा केला होता.

 

 

मॅचच्या आधी कुणीतरी बाहेरची व्यक्ती मेहमूद यांच्यासोबत ड्रेसिंग रूममध्ये आली होती. ती व्यक्ती कोण होती ते कपिल यांना माहीत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. त्याला ओरडून ड्रेसिंग रूमच्या बाहेर हाकलून दिलं असल्याचं कपिल मान्य करतात. मात्र भेट म्हणून कार देण्याची ऑफर त्याने दिली की नाही, ते त्यांना माहीत नाही कारण तेव्हा ते तिथे नव्हते.

सामन्यात काय झालं?

अंतिम सामन्यात श्रीकांत, वेंगसरकर आणि गावस्कर यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानला २४५ धावांचं आव्हान दिलं होतं. जिंकण्यासाठी पाकिस्तानला शेवटच्या ओव्हरमध्ये ११ धावांची गरज असताना कपिल देवने चेतन शर्माच्या हातात बॉल दिला.

शेवटच्या बॉलवर ४ धावांची गरज असताना चेतन शर्माचा यॉर्कर फुलटॉस झाला आणि उत्तम संधीची वाट बघत असलेल्या मियाँदादने बॉल थेट प्रेक्षकांमध्ये भिरकवला.

जाता जाता दाऊद खराब नशीब देऊन गेला असं म्हणायला वाव आहे हे मात्र नक्की! हातातोंडाशी आलेला घास मियाँदादने हिसकावून नेला.

 

 

एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात ही कलाटणी देणारी घटना म्हणून प्रसिद्ध झाली, तर जावेद मियाँदाद त्यादिवशी पाकिस्तानसाठी सुपरहिरो झाला.

===

हे ही वाचा – “कॉट कुंबळे, बोल्ड द्रविड” ही नेमकी काय ‘भानगड’ आहे, तुम्हाला ठाऊक आहे का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version