आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
“पुनर्जन्मावर विश्वास आहे का?” हा प्रश्न विचारल्यावर फार कमी जणांचं उत्तर हे सकारात्मक असेल. पुनर्जन्माचा दावा करणारे लोक सुद्धा पाहायला मिळत नाहीत. पुनर्जन्माच्या कथा आपण सर्वांनी प्रत्यक्ष आयुष्यापेक्षा सिनेमा मध्येच जास्त बघितल्या आहेत.
१९७० च्या दशकातील ‘मधुमती’ असो किंवा ८० च्या दशकातील ‘कर्ज’ किंवा शाहरुखचा ‘ओम शांती ओम’ प्रत्येक सिनेमावर लोकांनी भरभरून प्रेम केलं.
हा जन्म जगतांना मागच्या जन्मातील एखादी गोष्ट आठवणे किंवा पुढे घडणाऱ्या गोष्टी दिसणे हे पडद्यावर बघतांना कमालीचं कुतूहल असतं आणि त्यामुळे आपण लगेच त्या कथेचा भाग बनतो.
काही वर्षांपूर्वी “आपण देवाचा पुनर्जन्म आहोत” असे दावे सुद्धा काही भोंदू लोकांनी केले होते. पण, हे सगळे दावे कोणत्याही पुराव्या अभावी सपशेल खोटे ठरले होते.
१९३० च्या दशकात मात्र ‘शांती देवी’ नावाच्या एका महिलेने आपल्या पुनर्जन्माचा दावा खरा करून दाखवला होता. हा दावा महात्मा गांधी यांनीसुद्धा मान्य केला होता.
काय आहे हे प्रकरण?
११ डिसेंबर १९२६ रोजी दिल्ली येथे शांती देवी यांचा जन्म झाला होता. ४ वर्ष वय असताना म्हणजे १९३० मध्ये शांती देवी यांनी सर्वात पहिल्यांदा “आपल्याला मागच्या जन्मातील घटना आठवत आहेत” असा दावा केला होता.
शांती देवी यांनी आपल्या पालकांना सांगितलं होतं की, मला माझ्या मथुरामधील घरात राहिल्याची आठवण येत आहे. १४५ किलोमीटर अंतर असलेल्या मथुरामध्ये मी माझ्या नवऱ्यासोबत राहत होते इतकं सगळं शांती देवी यांना आठवत होतं.
सहाजिकच, हे सगळं ऐकून पालक आश्चर्यचकित झाले होते. शांती देवी यांच्या आठवणी इथपर्यंत सीमित नव्हत्या त्यांनी त्यांच्या नवऱ्याचं हुबेहूब वर्णन केलेल्या काही गोष्टी सुद्धा सांगितल्या होत्या.
===
हे ही वाचा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या पुनर्जन्माची अविश्वसनीय कहाणी!
===
माझा नवरा गोरा होता, तो चष्मा घालायचा आणि त्याला डाव्या गालावर एक मस्सा होता. मथुरा येथील द्वारकाधीश मंदिराच्या समोर आमचं एक दुकान होतं हे सगळं शांती देवी यांना लहानपणीच स्पष्ट दिसत होतं.
शांती देवी यांचे पालक मात्र हे सगळे तिच्या मनाचे खेळ आहेत असंच तिला सांगत होते. शांती देवी यांनी त्यांच्या पालकांना हे सत्य असल्याचं सांगण्याचे खूप प्रयत्न केले.
पण, सगळे प्रयत्न व्यर्थ ठरल्याने त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षी आपल्या पालकांचं घर सोडलं आणि त्या हे गूढ उकलण्यासाठी मथुरेला जाण्यासाठी प्रयत्न करत होत्या.
शाळेच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी बोलतांना शांती देवी यांनी सांगितलं की, “मागच्या जन्मी माझं नाव ‘लुगडी देवी’ होतं आणि माझ्या नवऱ्याचं नाव ‘केदार नाथ’ होतं. मी मागच्या जन्मी एका बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर दहाव्या दिवशी माझा मृत्यू झाला होता.”
शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक हे सगळं ऐकून अवाक झाले होते. खात्री करण्यासाठी मुख्याध्यापकांनी मथुरा येथील द्वारकाधीश मंदिरासमोरील ‘केदार नाथ’ यांच्या दुकानावर जायचं ठरवलं. मुख्याध्यापकांना ते दुकान सापडलं, केदार नाथ यांची भेट झाली.
केदार नाथ यांनी हे मान्य केलं की, “९ वर्ष आधी माझी पत्नी ‘लुगडीदेवी’ला एका बाळाला जन्म दिल्यावर दहाव्या दिवशीच देवाज्ञा झाली होती.”
मुख्याध्यापक – पंडित कंजीमल आणि केदार नाथ हे दोघेही दिल्लीला एकत्र परत आले. पंडितजींनी शांती देवी यांना असं सांगितलं की, “हे माझे भाऊ आहेत.” पण, शांती देवी यांनी केदारनाथ यांना लगेच ओळखलं आणि “तुम्ही खोटं बोलत आहात” हे त्यांना सांगितलं.
केदार नाथ हे आपल्या सोबत त्यांच्या आणि लुगडी देवीच्या मुलाला – नवनीत लाल याला सुद्धा सोबत घेऊन आले होते. शांती देवी यांनी केदार नाथ यांना त्यांच्या प्रसूती नंतर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेबद्दल सांगितलं.
६ वर्षांच्या शांती देवी यांनी सांगितलेले हे बारकावे सर्वांना चकित करणारे होते. वैयक्तिक संभाषण आणि सांगितलेली काही माहिती हे तंतोतंत असल्याने केदारनाथ यांनी सुद्धा हे मान्य केलं की शांती देवी या लुगडी देवी यांचा पुनर्जन्म आहे.
१९४० च्या दशकातील ही घटना महात्मा गांधी यांच्यापर्यंत पोहोचली होती. या दाव्याची खातरजमा करण्यासाठी महात्मा गांधी यांनी एक समिती बसवली. ही समिती शांती देवी यांना घेऊन १५ नोव्हेंबर १९३५ रोजी मथुरेला गेली.
शांती देवी यांनी घरातील सर्व मंडळींना ओळखलं. लुगडी देवी यांच्या आजोबांना सुद्धा शांती देवी यांनी ओळखलं.
शांती देवी या समिती मधील लोकांना घरातील दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेल्या. एका ‘फ्लॉवर पॉट’ मध्ये ठेवलेल्या पैश्यांची आठवण शांतीदेवी यांनी सांगितली. पण, तिथे ते पैसे नव्हते. चौकशी नंतर असं लक्षात आलं की, ‘केदार नाथ’, यांनी ते पैसे काढून घेतले होते.
शांती देवी यांनी लुगडी देवींना दिलेल्या काही अपूर्ण वचनांची आठवण केदार नाथ यांना करून दिली. ते ऐकून केदार नाथ यांची पक्की खात्री पटली की, “हीच मागच्या जन्मातील माझी पत्नी आहे.”
महात्मा गांधी यांनी नेमलेल्या १५ सदस्यीय समितीने १९३६ मध्ये आपल्या शोधाचा अहवाल सादर केला आणि शांती देवी या लुगडी देवी यांचा पुनर्जन्म आहे यावर कायदेशीर रित्या शिक्कामोर्तब करण्यात आलं.
शांती देवी यांच्या या दाव्यावर बाल चंद नाहटा यांनी विरोध दर्शवला होता. ‘पुनर्जन्म की पर्यालोचना’ या मासिकातून त्यांनी या समितीच्या अहवालावर विरोध दर्शवला होता.
इंद्रा सेन यांनी या विरोधाचा चांगलाच समाचार घेतला होता आणि उपलब्ध पुरावे हे शांती देवी यांचा हा पुनर्जन्म आहे हे सांगण्यास पुरेसे आहेत हे १९५२ मध्ये आपल्या अहवाला द्वारे पुन्हा लोकांसमोर सादर केलं.
शांती देवी यांनी कधीच लग्न केलं नाही. आपल्या पुनर्जन्माची कथा त्यांनी ५० च्या दशकाच्या शेवटी आणि पुन्हा एकदा १९८६ मध्ये लोकांसमोर सांगितली होती. कॅनडा येथील मानसशास्त्रज्ञ, पुनर्जन्मावर पुस्तक लिहिणारे लेखक आयरन स्टीव्हन्सन आणि के.एस. रावत यांनी शांती देवी यांची एक मुलाखत घेतली होती.
===
हे ही वाचा – ‘आपण मेलोय’ याची तुम्हाला तुमच्या मृत्युनंतरही जाणीव असते… शास्त्राज्ञांचा अचाट शोध!
===
या मुलाखतीत शांती देवी यांनी लुगडी देवी यांच्या मृत्यू समयीच्या काही आठवणी सांगितल्या. के.एस. रावत यांनी आपला शोध सुरूच ठेवला होता.
शांती देवी यांची शेवटची मुलाखत ही २३ डिसेंबर १९८७ रोजी घेण्यात आली होती आणि २७ डिसेंबर १९८७ रोजी शांती देवी यांचा वयाच्या ६१ व्या वर्षी मृत्यू झाला.
शांती देवी यांची ही पुनर्जन्माची कथा एखाद्या सिनेमा किंवा वेबसिरीजला साजेशी आहे. काही दिवसात ही कथा चित्र स्वरूपात बघायला मिळू शकते.
सुरुवातीला विरोध करणाऱ्या शांती देवी यांच्या पालकांनी आणि इतर नातेवाईकांनी लुगडी देवी यांची २२ तथ्य ऐकल्यानंतर शांती देवी यांच्यावर विश्वास ठेवला होता.
अर्थात तोपर्यंत खूप उशीर झाला होता. शांती देवी यांनी आपल्या आठवणींचा इतक्या कमी वयात केलेला पाठपुरावा हा खरंच कौतुकास्पद आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.