' जयललितांना द्रौपदी वस्त्रहरणासारख्या हिणकस प्रसंगाला सामोरं जावं लागतं तेव्हा… – InMarathi

जयललितांना द्रौपदी वस्त्रहरणासारख्या हिणकस प्रसंगाला सामोरं जावं लागतं तेव्हा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मयसभेतला द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग प्रत्येकालाच अगदी स्पष्टपणे लक्षात आहे. महाभारत आपण अगणित वेळा वाचलं आहे ऐकलं आहे पाहिलं आहे, पण तुम्हाला माहितीये का आपल्या खऱ्या दुनियेतसुद्धा असंच एका स्त्रीचं वस्त्रहरण झालं होतं, तेही भर विधानसभेत!

हो हो, अगदी बरोबर तामिळनाडूच्या राजकरणातला तो एक काळा दिवसच होता. ते साल होतं १९८९, तामिळनाडू विधानसभेत एका महिलेवर काही लोकांनी हल्ला केला होता, ती महिला म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून तामिळनाडची अम्मा म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकीय लीडर जयललिता!

 

jayalalitha inmarathi

 

त्या वेळेस तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम.करुणानिधी हे सभेत राज्याचं बजेट सादर करायला उभे होते, एकंदरच माहोल तणावाचा होता, आणि या सगळ्यात विरोधीपक्ष नेत्या जयललिता त्यांना त्यांच्या परीने विरोध करत होत्या!

बजेटच्या भाषणात सतत अडथळा निर्माण होत असल्याने डीएमके पार्टीचे इतर नेतेसुद्धा प्रेशरखाली होते, जयललिता या विरोधी पक्षात असल्याने त्या त्यांचे काम चोख बजावत होत्या.

===

हे ही वाचा तमिळनाडूच्या जनतेचा जयललितांवर इतका जीव का होता?

===

पण या सगळ्या गदारोळात करुणानिधी आणि जयललिता यांच्या दोघांकडून एकमेकांवर वैयक्तिक टीका व्हायला सुरुवात झाली, जयललिता यांनी त्यांचा उल्लेख तामिळनाडूचे गुन्हेगार असा केला, आणि यावरून एकच हलकल्लोळ माजला!

 

karunanidhi inmarathi

 

त्यानंतर विधनसभेचं रूपांतर एका रणांगणात झालं, माइक उखडून फेकले गेले, तिथले कागद हवेत भिरकावले गेले, विधानसभेत एकमेकांवर हल्ला होऊ लागला.

हे सगळं पाहून जयललिता सभेच्या बाहेर पडायचा मार्ग शोधत होत्या इतक्यात सत्तेत असलेल्या पक्षाच्या एका मंत्र्याने जयललिता यांच्या साडीला हात घातला आणि त्यांना फरफटत त्यांच्यावर हल्ला केला!

 

jayalalitha 2 inmarathi

 

जयललिता यांच्या पार्टीच्या मेंबर्सनी त्यांना शक्य होईल तितका वाचवायचा प्रयत्न केला पण त्यांच्या डोक्याला मार लागला, त्यांची साडी फाटली, आणि तशाच अवस्थेत जयललिता या अखेर विधानसभेतून बाहेर पडल्या आणि बाहेरच्या कॅमेरामध्ये त्यांची ही दृश्य टिपली गेली!

त्या दिवसानंतर तामिळनाडूच्या राजकारणात खूप मोठा बदल झाला आणि त्यानंतर जयललिता यांनी मनाशी खूणगाठ बांधली की आता पुन्हा या विधानसभेत मुख्यमंत्री म्हणूनच त्या शपथ घेतील, आणि तसंच झालं त्यांनंतर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि राज्यकारभारसुद्धा चालवला!

नुकताच कंगना रनौत हिच्या थलयवी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे, ज्यात कंगना जयललिता यांची भूमिका साकारत आहे, त्या ट्रेलरमध्येसुद्धा या विधानसभेतल्या घटनेची झलक आपल्याला पाहायला मिळते!

 

thalaivi inmarathi

 

हा सिनेमा किती चालेल, लोकं त्याला पसंती देतील की नाही ते तर तो रिलीज झाल्यावरच कळेल, पण जयललिता यांचा तो दरारा आणि एक अभिनेत्री ते मुख्यमंत्री असा त्यांचा अविस्मरणीय प्रवास पडद्यावर उलगडताना नक्कीच आपण भारावून जाऊ!

===

हे ही वाचा तामिळनाडूच्या राजकारणाची अजब अपरिहार्यता: नेता नाही तर “अभिनेता” करणार नेतृत्व

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?