' प्राचीन रोमन लोक माऊथवॉश म्हणून काय वापरत हे बघून किळस येते! – InMarathi

प्राचीन रोमन लोक माऊथवॉश म्हणून काय वापरत हे बघून किळस येते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजच्या काळात दात चमकदार करण्यासाठी वेगवेगळ्या पेस्ट, ब्रशचे वेगवेगळे प्रकार, दंतमंजन पावडरी त्यातही आयुर्वेदिक पावडर, तोंडाला दुर्गंधी येऊ नये म्हणून दात घासल्यावर पुदीना, मिंट वगैरे असलेले माऊथवाॅश हे सगळं आपण पाहतो, वापरतो.

 

mouthwash inmarathi

 

पण चक्क माऊथ वॉश म्हणून लघवी? कपडे स्वच्छ व्हावेत, झुळझुळीत दिसावेत म्हणून साबण, सोडा, नीळ, ब्लीच हे सगळं आपण वापरतो. आजकाल तर कपडे धुतल्यानंतर त्यांना मंद सुगंध यावा यासाठी फॅब्रिक कंडीशनर पण बाजारात उपलब्ध आहेत.

पण पूर्वी रोमन लोक कपडे स्वच्छ व्हावेत म्हणून मूत्र वापरत असत.. बसला ना धक्का? आपल्याकडे पण शिवाम्बू चिकीत्सा करणारे लोक होतेच की…

शिवाम्बू चिकीत्सा हा प्रकार आपल्याकडे नवा नाही. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई हे शिवाम्बू प्राशन करीत, त्याआधारे ते ९९ वर्षं आरोग्यदायी आयुष्य जगले असं म्हणतात.

 

morarji desai inmarathi

 

काय आहे ही शिवाम्बू चिकीत्सा? शिवाम्बू चिकीत्सा म्हणजे मूत्र चिकित्सा. स्वमूत्राचा वापर शरीरांतर्गत स्वच्छतेसाठी व बाह्य रोगांवरील उपचार करणं म्हणजे शिवाम्बू चिकीत्सा.

याचा वापर करुन बरेच त्वचारोग बरे झाले असा दावा केला जातो. या उपचार पध्दतीबाबत असंही म्हणतात, साठवलेलं शिवाम्बू जर त्वचेवर चोळलं तर त्वचाविकार बरे झाले आहेत.

===

हे ही वाचा चक्क “प्रायव्हेट पार्टचं” म्युझियम?! हे असं संग्रहालय असू शकतं असं स्वप्नातही वाटलं नसेल!

===

या उपचार पध्दतीची मुळे रोममध्ये‌ सापडतात. जुन्या काळी जेव्हा पेस्ट, ब्रश यांचा शोध लागला नव्हता तेव्हा चक्क रोमन लोक माऊथवाॅश म्हणून, कपडे धुण्यासाठी म्हणून लघवीचा वापर करत होते!

या दिवसात जर कुणी असं करतं हे समजलं तर काय होईल? कुणी तयार होईल का अशा माणसांकडून कपडे धुण्यासाठी, पण हे खरं आहे.. प्राचीन काळी रोममध्ये लघवीचा वापर या कामासाठी केला जात होता.

 

roman people inmarathi

 

एकंदरीत आजच्या समाजजीवनात रस्ते बांधणी, सिमेंट, नदीवर बांधले जाणारे पूल, पोष्टाची कल्पना ही सारी रोमन लोकांनी जगाला दिलेली देणगी आहे. आज त्यात प्रचंड सुधारणा करत आपलं जीवन बरंचसं सुकर झालं आहे.

एकंदरीत पाहता, माणसाला साफ सफाई, स्वच्छता आवडतं. त्यासाठी दात स्वच्छ ठेवणं, तोंडाला दुर्गंधी येऊ नये म्हणून काही उपाय केले जातात. आजही चमचमणारे स्वच्छ दात कुणालाही आवडतात.

वेगवेगळ्या पेस्टच्या जाहिराती बघताना त्यात वापरलेले घटक पाहता हर्बल पेस्ट, चारकोलवाली, आयुर्वेदिक औषधी वनस्पती वापरलेली पेस्ट असे वेगवेगळे प्रकार आपण पाहतो.

मात्र प्राचीन काळी, जेव्हा हे सारे नवे शोध लागले नव्हते तेव्हा रोमन लोक मानवी आणि प्राण्यांच्या मूत्राचा वापर माऊथवाॅश म्हणून आणि दात चमकवण्यासाठी करत होते. हे ऐकून, वाचून किळस वाटेल पण ही गोष्ट खरी आहे.

स्वच्छतेसाठी मूत्राचा वापर केला जाई कारण मूत्रात असलेले रासायनिक घटक जसे अमोनिया, नायट्रोजन आणि हायड्रोजन यांची संयुगे, यामुळे स्वच्छता होते.

 

roman people 2 inmarathi

 

आजकाल स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांची, काचेच्या भांड्यांची स्वच्छता करण्यासाठी जे साबण, लिक्विड सोप वापरले जातात त्यात अमोनिया असतो त्यामुळे भांड्यांचा चिकटपणा जाऊन भांडी स्वच्छ चमकदार होतात.

रोममध्ये अशी लघवी वापरुन कपडे, दात स्वच्छ केले जात. मुळात असं सांगितलं जातं की रोमन लोक अगदी घाणेरडे होते. सार्वजनिक अंघोळीची कल्पना रोम साम्राज्याची देणगी. म्हणून तर म्हण आहे हमाम में सब नंगे!

कारण तेव्हा लोक रोजच्या रोज अंघोळ करत नसत. म्हणूनच कपडे धुणे.. तोंड धुणे हे पण रोजच होई असं नाही. त्यामुळे लघवीचा वापर करुन तोंड सगळेच स्वच्छ करत असे नव्हते. म्हणून एखादा चमकदार दाताचा माणूस दिसला की त्याची कुचेष्टाच केली जायची.

त्याकाळी लघवीचा वापर कपडे धुण्यासाठी, खत म्हणून जमिनीत टाकण्यासाठी केला जाई. कातडी कमावताना त्याला रंग यावा म्हणून सुद्धा लघवी वापरली जाई.

आज संशोधन केल्यानंतर हे सिद्ध झाले आहे की लघवीत असलेले अमोनिया वगैरे घटक हे खरोखरच स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त आहेत.

रोमन लोक स्वच्छतेसाठी ही लघवी साठवून ठेवत.अशी लघवी साठवण्यासाठी विशिष्ट भांडी वापरली जात. ही भांडी खुल्यावर ठेवलेली असत. लोक त्यात मूत्र विसर्जन करायचे. ते निर्जंतुक होईपर्यंत लोक थांबत.

 

urine inmarathi

 

अगदी ते अमोनियामध्ये एकजीव झालं की मग ती भांडी उचलून नेत आणि पाण्यात मिसळून घाण झालेल्या कपड्यांवर ओतून ठेवत. मूत्राची भांडी गोळा करुन आणून देणाऱ्या माणसाला पैसे द्यावे लागत कारण त्यांचा घाणेरडा वास सहन करत तो माणूस ते भांडं वाहून आणायचा.

मग कुणीतरी त्या घाणेरड्या कपड्यांवर पाण्यात लघवी मिसळून तुडवायचा त्यालाही पैसे द्यावे लागत.

===

हे ही वाचा – कुठे बियरचा पूर तर कुठे चिखलात अंघोळ – जगातील “१० भन्नाट” सण

===

त्याकाळी टूथपेस्ट पण विचित्र होती.. सशाचं डोकं, गाढवाचे दात आणि उंदरांचा मेंदू यांचं मिश्रण करून राखेत मिसळत आणि त्याने दात घासत.

एरवी अंड्याची टरफलं, फुलांचा अर्क काढून त्यापासून पेस्ट बनवली जायची आणि ती पेस्ट वापरली जायची, त्याचा वापर दात घासायला केला जायचा.

या प्राचीन गोष्टी ऐकायला घाण वाटते.. पण ती त्या काळातील एक गरज होती. अजून काही दशकांनी कदाचित आपल्या राहणीमानावर पण आपल्या भावी पिढ्या हसू शकतील.

 

roman empire inmarathi

 

पण त्या त्या काळाची ती ती गरज असते आणि माणूस त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून आपलं आयुष्य सुखी करायचा प्रयत्न करत असतो, त्यावर चूक बरोबर सांगणारे आपण कोण… नाही का?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?