Site icon InMarathi

…म्हणून यश चोप्रा यांनी बमन इराणी ऐवजी या सिनेमात बच्चनला काम दिलं!

yash chopra featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अमिताभ बच्चन हे भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधलं आदराने घेतलं जाणारं नाव. आजच्या काळातल्या तरुण अभिनेत्यांसमोरसुद्धा अमिताभ ज्या उत्साहाने काम करतात ते पाहून त्यांना बॉलिवूडचा शहनशहा का म्हणतात हे कळून येतं!

शतका शतकामधून होणारा महानायक म्हणून अमिताभ यांची ओळख साऱ्या जगभर झाली आहे. बॉलिवूड टॉलिवुडपासून हॉलिवूडपर्यंत सगळीकडे अमिताभ बच्चन या नावाची ख्याती पसरलेली आहे हे सर्वश्रुतच आहे!

 

 

तुम्हाला माहित आहे का, की या महानायकालासुद्धा एकेकाळी काम मिळवण्यासाठी दिग्दर्शकाच्या घराचे उंबरठे झिजवायला लागले होते.

 

 

९० च्या नंतरचा काळ हा अमिताभसाठी प्रचंड खडतर होता हे सगळ्यांना ठाऊक आहेच. शिवाय हाच तो काळ जेव्हा ३ खान आणि अक्षय कुमार यांनी इंडस्ट्रीवर पकड घ्यायला सुरुवात केली होती!

अमिताभ यांचा राजकारणात झालेला प्रवेश आणि त्यामुळे संपुष्टात येऊ लागलेलं फिल्मी करियर, शिवाय एबीसीएल या घरच्या कंपनीवर झालेलं करोडो रुपयांचा कर्ज यामुळे अमिताभ यांची अवस्था फार बिकट झाली होती!

===

हे ही वाचा जेव्हा परवीन बाबीने केले होते अमिताभवर “अतिशय गंभीर” स्वरूपाचे आरोप

===

कौन बनेगा करोडपती या टीव्ही शोमुळे अमिताभच्या करियरची नाव स्थिर झाली पण त्याआधीची काही वर्ष अमिताभसाठी अत्यंत वाईट होती!

 

 

शिवाय जेव्हा अमिताभ त्यांच्या काळात एका टॉपच्या पोझिशनला होते तेव्हासुद्धा त्यांनी कादर खानसारख्या माणसाला कमी लेखायला सुरुवात केली होती. ते म्हणतात णा कर्मा इज अ बीच, तसंच काहीसं अमिताभ यांच्या बाबतीत ९० नंतरच्या काळात घडत होतं!

याच दरम्यान अमिताभ प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक यश चोप्रा यांच्याकडे काम मागायला गेले. यश चोप्रा यांच्यासोबत अमिताभ यांनी दीवार, त्रिशूलसारखे मोठे हिट्स दिले असल्या कारणाने आणि अमिताभची सध्याची परिस्थिती त्यांना ठाऊक असल्याने यश चोप्रा यांनी अमिताभ यांना एका सिनेमात रोल द्यायचे नक्की केले!

तो सिनेमा होता २००० सालचा मोहब्बते. या सिनेमाचं कास्टिंग आधीच फायनल झालं होतं. शाहरुख खान, ऐश्वर्या राय यांच्यासोबत यश चोप्रा त्यांच्या मुलाला म्हणजे उदय चोप्राला देखील लॉंच करणार होते!

 

 

या सिनेमात शाहरुखची मुख्य भूमिका असल्याने अमिताभ यांनासुद्धा त्याच तोडीची भूमिका देणं यश चोप्रा यांना भाग होतं आणि सर्वतोपरी प्रयत्न करून एक महत्वाचा रोल यश चोप्रा यांनी अमिताभ यांच्यासाठी निश्चित केला!

असं म्हणतात की या रोलसाठी प्रथम बोमन इराणी यांची निवड करण्यात आली होती. पण अमिताभ यांच्या करियरला ट्रॅकवर आणण्यासाठी बोमन यांचा रोल अमिताभ यांना देण्यात आला!

 

 

तो रोल होता सिनेमातल्या कॉलेजचे प्रिन्सिपल नारायण शंकर यांचा! अमिताभ यांना या रोलसाठी घेण्यात आलं, आणि ते नियमित सेटवर येऊ लागले!

पण सेटवर फक्त शाहरुखमय वातावरण होतं, कारण तोवर शाहरुख हा तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला होता, सेटवर ज्या गोष्टी होत होत्या त्या सगळ्या शाहरुखसाठी आणि शाहरुखला विचारूनच होत होत्या!

अमिताभ यांना बऱ्याचवेळ नुसतं बसून राहावं लागत असे. शिवाय हा सिनेमा आजही बघताना आपल्याला शाहरुख आणि अमिताभ यांच्यातली जुगलबंदी खरीच वाटते.

आपलं स्टारडम हे समोरच्या व्यक्तीकडे गेलं आहे, हे स्वतःच्या डोळ्याने बघताना अमिताभ यांच्या नजरेतला हताशपणा या सिनेमात आजही बघताना जाणवतो.

 

 

हा सिनेमा रिलीज झाला, हिटसुद्धा झाला, यातली गाणी प्रचंड गाजली, शाहरुखचं कौतुक झालं पण याबरोबरीनेच अमिताभ यांच्या कामाचंसुद्धा कौतुक झालं. यानंतर अमिताभ यांनी केबीसीच्या माध्यमातून स्वतःचं नाव प्रस्थापित करायला सुरुवात केली!

यश चोप्रा यांच्या सिनेमात अमिताभ पुन्हा हळू हळू दिसायला लागले, बरोबरीनेच चोप्रा बॅनरखाली त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे अभिषेकलासुद्धा पुढे आणले!

पण आजही खुद्द अमिताभ त्यांचा ९० नंतरचा काळ विसरू शकणार नाहीत!

===

हे ही वाचा बच्चनने ही फिल्म नाकारल्यामुळे चित्रपटसृष्टीत इतिहास रचणारे सलीम-जावेद वेगळे झाले

===

एकेकाळी कादर खान यांना “मला सर म्हणून हाक मारा” असं म्हणणाऱ्या अमिताभवर त्यांना त्यांच्या उतरत्या काळात शाहरुखच्या स्टारडमला सामोरं जावं लागेल असा विचार खुद्द शहनशहाने सुद्धा केला नसेल!

 

 

पण शेवटी फासे कधीनाकधीतरी फिरतातच, आज या ३ ही खानमंडळींपेक्षा सर्वात जास्त काम आणि सिनेमे आज अमिताभ यांच्याकडे आहेत, ते म्हणतात ना ते खरंच आहे अमिताभ हे शतकातून होणारे महानायकच आहेत!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version