' हा ‘भारतीय रोबोट’ फक्त ५०,००० रुपयांमध्ये तयार झालाय…!! – InMarathi

हा ‘भारतीय रोबोट’ फक्त ५०,००० रुपयांमध्ये तयार झालाय…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘रोबोटिक्स’ हा विषय सध्या खूप चर्चेत आहे. दहा माणसांचं काम एक रोबोट अगदी कमी वेळेत करतो आणि तेसुद्धा न थकता! प्रोग्रामिंग, चार्जिंग, बॅटरी इतकी काळजी घेतली, की तुमचा रोबोट हा तुमच्या सेवेत सज्ज असतो.

आज प्रत्येक व्यवसायिक हा कमीत कमी मनुष्यबळ आणि कमी वेळेत जास्त नफा याबद्दल अधिक जागरूक झाला आहे. ऑनलाईन शॉपिंग केल्यावर आपण बघतोय, की आज ऑर्डर दिली म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण मागवलेली वस्तू आपल्या घरात आलेली असते. रोबोटच्या वापरामुळे हे सगळं शक्य होत आहे.

फ्लिपकार्ट, अमेझॉनसारख्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांची वेअरहाऊस कधी बघण्यात आली, तर बघता येईल की, एक छोटा रोबोट तुमच्या ऑर्डरचं मटेरियल किती कमी वेळात त्याच्या जागेवरून उचलून डिलिव्हरीच्या ठिकाणी आणून देतो. रोबोटच्या वापरामुळे कामात होणाऱ्या चुका सुद्धा नियंत्रणात आल्या आहेत.

 

robot lifting goods inmarathi

 

‘अॅलेक्सा’ ही आता कित्येक घरातील एक व्यक्ती झाली आहे. तुम्ही सांगितलेले गाणं लावणं, तुम्हाला माहीत नसलेल्या शब्दांचा अर्थ सांगणं या गोष्टी ‘अॅलेक्सा’ अगदी प्रामाणिकपणे करत असते. नुकतंच गुगलने सुद्धा ‘व्हॉईस हेल्प’ हे फिचर सुरू करून लोकांचा टायपिंगचा वेळ वाचवण्यास मदत केली आहे.

२०१६ मध्ये संगणक तज्ञांनी ‘ह्युमनॉईड’चा शोध लावून रोबोटिक्स क्षेत्रातील एक मोठं शिखर गाठलं. ह्युमनॉईड म्हणजे माणसांसारखा दिसणारा, बोलणारा रोबोट!

===

हे ही वाचा – अवकाशात प्रवास करणाऱ्या इस्रोच्या पहिल्या महिला रोबोट विषयी काही रंजक गोष्टी!

===

फेब्रुवारी २०१६ मध्ये हाँगकाँगच्या हंसोन रोबोटिक्सने ‘सोफिया’ नावाचा एक ह्युमनॉईड तयार केला आणि त्याला अमेरिकेतील साऊथवेस्ट फेस्टिवलमध्ये लाँच केलं. लोकांशी बोलणं, लोकांना ओळखणं, चालणं हे सगळं ‘सोफिया’ अगदी सहज करते. ‘सोफिया’ ही अशी पहिली ह्युमनॉईड आहे जिला सौदी अरेबियाने नागरिकत्व प्रदान केलं आहे.

 

sophia robot humanoid inmarathi

 

जगभरात रोबोटिक्सच्या क्षेत्रात इतक्या महत्त्वपूर्ण गोष्टी घडत असतांना आपण भारतीय थोडीच मागे रहाणार होतो.

राजमलपूर या गावात जन्म झालेल्या दिनेश पटेल यांनी ‘शालू’ हा भारतीय ह्युमनॉईड बनवला आहे. जिला एकूण ४७ भाषा बोलता येतात. दिनेश पटेल हे आयआयटी, मुंबईमध्ये शिक्षक आहेत.

दिनेश यांनी ‘शालू’ तयार करतांना प्लॅस्टीक, अल्युमिनियम आणि कार्डबोर्डचा वापर केला आहे. ‘शालू’ ही ‘सोफिया’पासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आली आहे असं दिनेश पटेल यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितलं होतं.

भारतीय ‘शालू’ ह्युमनॉईड ही सुद्धा लोकांना ओळखू शकते, पेपर वाचून दाखवू शकते, पदार्थांची रेसिपी सांगू शकते, सामान्य ज्ञान, गणिताचे प्रश्न सोडवू शकते, शिक्षक म्हणून काम करू शकते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भावना व्यक्त करू शकते.

इतके अद्भुत फीचर्स असलेली ‘शालू’ हे पहिलं भारतीय ह्युमनॉईड आहे. कमालीची गोष्ट म्हणजे दिनेश पटेल यांनी हा ह्युमनॉईड केवळ ५०,००० रुपयात तयार करण्यात आला आहे.

 

shalu indian humanoid inmarathi

 

मास्टर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशनचं शिक्षण घेतलेले दिनेश पटेल हे सध्या मुंबईतल्या केंद्रीय विद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतात. ‘रोबोट’ सिनेमाची प्रेरणा घेऊन आपण शालूची निर्मिती केल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं.

शालूला तयार करण्यासाठी दिनेश पटेल यांना एकूण ३ वर्षांचा कालावधी लागला. २०१७ मध्ये सुरू झालेला हा प्रवास २०२० च्या अखेरीस पूर्णत्वास आला. महागडी उपकरणं परदेशातून आयात न करता भारतातच बनवण्यात आली. शालूचं प्रोग्रामिंग सुद्धा दिनेश यांनी स्वतःच केली आहे.

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे भारतीयच असल्याने शालू ही पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ ह्युमनॉईड म्हणून नावाजली जात आहे.

‘शालू’ ही ९ भारतीय भाषा (हिंदी, भोजपुरी, मराठी, बांगला, गुजराती, तामिळ, मल्याळम, उर्दू) आणि ३८ विदेशी भाषा (इंग्रजी, जर्मन, जपानी इत्यादी) बोलू शकते. एखाद्या कंपनीची रिसेप्शनिस्ट म्हणून सुद्धा शालू काम करू शकते असा दावा दिनेश पटेल यांनी केला आहे.

‘शालू’मधील मानवी गुणधर्म म्हणजे ती हात मिळवते, विनोद करते, आनंदी, रागीट चेहरा करून दाखवते. दिनेश पटेल यांना काही दिवसात शालूला शाळेत घेऊन जायचं आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन भाषेचं ज्ञान मिळवता येईल.

===

हे ही वाचा – रोबोटिक्स विश्वातले “हे” १० आविष्कार बघून तुम्ही थक्क नाही झालात तर नवल….

===

आयआयटीमध्ये शिकवणारे शिक्षक आणि आयटीमध्ये काम करणाऱ्या सर्व तज्ञांनी दिनेश पटेल यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. सर्वांना हा विश्वास आहे, की शालू हे ह्युमनॉईड येणाऱ्या पिढीसाठी नवीन शोध लावण्यासाठी प्रेरणा म्हणून काम करेल. शालूमध्ये अजून फीचर्स वाढवण्यासाठी दिनेश पटेल यांनी शालूच्या दुसऱ्या आवृत्तीवर काम करायला सुरुवात केली आहे.

 

shalu and dinesh patel inmarathi

 

शालूच्या बोलण्याचे, प्रश्नांना योग्य उत्तर देण्याचे कित्येक व्हिडीओज सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. ‘अपनी रोबो शालू’ या युट्युब चॅनलवर दिनेश पटेल हे विडिओ अपलोड करत असतात. प्रेक्षक सुद्धा या पूर्णपणे भारतात आणि घरी तयार करण्यात आलेल्या ह्युमनॉईडचं सध्या कौतुक करत आहेत.

 

 

“ज्या कामासाठी मोठ्या कंपन्या फार पैसे मागतात, ते दिनेश पटेल यांनी ५०,००० रुपयात करून दाखवलं आहे. ‘शिक्षण, मनोरंजन आणि इतर क्षेत्रात सुद्धा ‘शालू’मुळे मदत होईल’ या शब्दात आयआयटी मुंबईचे प्राध्यापक सुप्रतिक चक्रवर्ती यांनी एका वृत्तपत्राशी बोलतांना दिनेश पटेल यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

‘शालू’च्या पुढील आवृत्तीमध्ये अजून सुधारणा होत राहो आणि दिनेश पटेल यांच्यासारखे अधिकाधिक लोक रोबोटिक्स क्षेत्रात आपलं आणि देशाचं नाव मोठं करत राहोत अशी आशा व्यक्त करूया.

===

हे ही वाचा – रोबोट्स हे “भविष्य” नाहीत. आपलं वर्तमान आहेत. मी बिझनेसमध्ये रोज रोबोट वापरतोय

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?