Site icon InMarathi

बॉयफ्रेन्डच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा: मराठी सिरिअल्सनी हे चालवलंय तरी काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

चित्रपट, मालिकांमधून एकीकडे महिला सबलीकरणाचे धडे देणाऱ्या दिग्दर्शक, निर्मात्यांनी दुसरीकडे पुरुषांवर ‘असे’ सीन दाखवत आहेत. दुतोंडी असण्याचे उदाहरण सध्या अनुभवायला मिळत आहे.

मालिका, सिनेमा, नाटकं इतर अनेक मनोरंजनाच्या साधनांचा समाजावर खूप मोठा पगडा आहे. जसा काळ पुढे सरकत गेला तशी हीच मनोरंजनाची साधने समाज प्रबोधनाचा हिस्सा झाली. अनेक चांगल्या वाईट गोष्टींची, सवयीची माहिती शहरापासून खेड्यांपर्यंत सर्वांनाच मिळावी या दृष्टींनी ही टीव्ही, सिनेमा आदी माध्यमे उपयोगी पडायला लागली.

कौन बनेगा करोडपती, सत्यमेव जयते यांसारखे शो ही त्याचीच काही उदाहरणं!

 

 

हे ही वाचा – नव्या वेष्टनात शिळाच माल! ‘अग्गबाई’, नव्या नावाने आपल्या माथी हे काय मारलं जातंय?

टीव्हीवरील अनेक मालिकांनी तर महिला सबलीकरण आणि स्त्रीशक्ती आदी विषयांवर खूप चांगले विचार मांडले.

मालिकांनी ‘सासू सून’ या एका चौकटीत न अडकता अनेक विविध विषयही हाताळले. मनोरंजनासोबतच समाज प्रबोधन करणाऱ्या या मालिका तुफान लोकप्रिय देखील झाल्या. मात्र काही सीन, काही घटना दाखवण्याच्या नादात दिग्दर्शक, निर्माते अति वाहवत जातात आणि काही चुकीचे चित्र लोकांसमोर मांडतात.

याच गोष्टीचा प्रत्यय नुकताच लोकप्रिय अशा झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून सर्वाना झाला.

 

 

या मालिकेने अगदी थोड्याच काळात प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आता मात्र या मालिकेतील एका दृष्टीमुळे मालिकेवर टीकेची झोड उलटली आहे.

अतिशय गडगंज संपत्ती असणारा ओंकार खानविलकर आणि अतिशय गरीब घरातील स्वीटू यांची प्रेमकहाणी असणाऱ्या या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिकांच्या मानत एक वेगळेच स्थान निर्माण केले.

या मालिकेतील मालविका म्हणजे ओंकार खानविलकरची बहीण तिच्या श्रीमंतीचा माज दाखवत असते. पैसा हेच सर्वस्व मानणाऱ्या गर्विष्ठ मालविकाने एका सीनमध्ये तिचा लिव्ह इन पार्टनर असणाऱ्या ‘रॉकी’ला अतिशय हीन दर्जाची वागणून दिली आहे.

तिने रॉकीच्या गळ्यात चक्क कुत्र्याचा पट्टा घालून त्याला पशुसारखी वागणूक दिली. आपल्यापेक्षा गरीब असणाऱ्या लोकांवर आपण राज्य करू शकतो, असा विचार तिने या सीनमधून दाखवला आहे.

 

 

यामुळेच आता या मालिकेवर प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करायला सुरुवात केली आहे. ‘चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणात पशु पक्षांना इजा झालेली चालत नाही. मात्र तेच माणसाचा पशु झालेला चालतो का?’ असा प्रश्न प्रेक्षकांनी मालिकेच्या टीमला विचारला आहे.

सोबतच एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या विरुद्ध असणाऱ्या या मालिका पुरुषांच्याबाबतीत मात्र असेच काहीसे दाखवून टीआरपी मिळवत असतील तर त्यांचा निषेध केला पाहिजे असे देखील प्रेक्षक म्हणत आहे.

मालिकांमधूनच स्त्री पुरुष असा दुजाभाव दाखवला जात असल्याने अशा गोष्टींचे समाजात अनुकरण न होण्याची काय शाश्वती आहे? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version