Site icon InMarathi

…तर ठाकरे सिनेमात नवाझुद्दीनऐवजी ‘हा’ स्टार बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसला असता!

thackrey featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गेल्या काही वर्षांपासून सिनेक्षेत्रात आपण एक ट्रेंड बराच पाहिला तो म्हणजे बायोपिकचा. एम. एस. धोनी, सचिन, शकुंतलादेवी पासून थेट संजूसारखे कित्येक बरे वाईट बायोपिक आले, काही चालले काही डब्यात गेले!

संजूसारखे काही बायोपिक वादाच्या भोवऱ्यात अडकले, तर मंटोसारख्या बायोपिककडे प्रेक्षकांनी ढुंकुनही पाहिले नाही, तर मेरी कोम किंवा दंगलसारख्या फिल्म्सना लोकांनी पसंती दाखवली.

 

 

मराठीतसुद्धा लोकमान्य, बालगंधर्व पासून पु.ल, काशिनाथ घाणेकर अशा कित्येक दिग्गजांवर बायोपिक झाले.

===

हे ही वाचा हिंदी सिनेमातील सत्याचा विपर्यास! आपल्या मनात रुजवले गेलेले घटनाक्रम वास्तवात किती वेगळे होते

===

पण मराठी जनतेचे कैवारी आणि आपले सगळ्यांचे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेला बायोपिकची चर्चा जास्त झाली. मुळातच बाळसाहेबांसारखं अफाट व्यक्तिमत्व आणि त्यांचा संघर्ष डोळ्यासमोर उभा राहीला की त्यांच्याबद्दलचा आदर आणखीन वाढतो.

मुंबई, मराठी माणूस आणि खासकरून महाराष्ट्रासाठी त्यांनी केलेलं काम, त्यांचा दरारा, राजकारणात असूनही त्यांनी जोडलेली माणसं आणि लोकांच्या मनावर असलेली पकड यामुळेच बाळासाहेब आजही आपल्या प्रत्येकाच्या मनात जीवंत आहेत!

त्यांच्यावर बायोपिक करण्याचं शिवधनुष्य उचललं ते म्हणजे शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी!

२०१९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ठाकरे’ या सिनेमाला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. काहींना सिनेमा खूप आवडला तर काहींना हा सिनेमा अपूर्ण वाटला. पण या इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर सिनेमा लोकांपुढे सादर करणं हेच एक मोठं चॅलेंज होतं!

 

 

हा सिनेमा आणखी एका गोष्टीमुळे प्रदर्शित व्हायच्या आधीच चर्चेत आला ती गोष्ट म्हणजे यातल्या बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकी या अभिनेत्याला निवडणं!

जेव्हा ठाकरे या सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज केला गेला तेंव्हा प्रथमदर्शनी लोकं नवाजचा लुक पाहून खरंच गोंधळून गेले. त्या लुकमध्ये नवाजने ज्या पद्धतीने ती भूमिका कॅरि केली होती तेंव्हाच हा सिनेमा अर्धा हीट झाला!

त्यावेळेस नवाज या अशा रोल मध्येसुद्धा परफेक्ट बसू शकतो याची कुणी कल्पनाही केली नसेल. अर्थात तो एक उत्कृष्ट कलाकार आहेच त्यामुळे त्याने वठवलेल्या बाळासाहेबांच्या भूमिकेचं सगळ्याच स्तरातून कौतुक झालं!

 

 

पण तुम्हाला माहीत आहे का, की या रोलसाठी प्रथम नवाज नाही तर एका वेगळ्याच भन्नाट अभिनेत्याचा विचार केला गेला होता! या भूमिकेसाठी सर्वप्रथम दिवंगत इरफान खान या अभिनेत्याची निवड केली गेली होती!

===

हे ही वाचा मियाँ मकबूल, ये कुबुल नहीं : “स्वप्न जगायला” शिकवणारा इरफान…!

===

विश्वास बसणं जरा कठीणच आहे पण सिनेमाच्या प्रदर्शनावेळीच कास्टिंग डायरेक्टर रोहन मापूसकर यांनी एका मुलाखतीत म्हंटलं आहे की त्यांनी बाळसाहेबांची भूमिका साकारण्यासाठी इरफान खानचं नाव समोर आलं होतं!

संजय राऊत, अभिजीत पानसे आणि रोहन मापूसकर यांनी या गोष्टीवर चर्चासुद्धा केली होती! पण इरफानच्या आजाराची बातमी नुकतीच बाहेर पडली होती आणि त्याच्या इतर फिल्म शुटींगच्या डेट्समुळे इरफानऐवजी नवाजला हा रोल देण्यात आला!

 

 

नवाजूद्दीनने तो रोल प्रामाणिकपणे केला, शिवाय बाळासाहेब हे उत्तम वक्ते असल्याने त्यांच्या बोलण्याची शैली, हावभाव हातवारे आणि बॉडी लॅंगवेज हे सगळं नवाजने हुबेहूब पडद्यावर मांडलं!

कुठेही मिमीक्री न वाटता त्या भूमिकेचं गांभीर्य समजून त्याने तो रोल केला, पण त्याच्याऐवजी इरफान ने जर हा रोल केला असता तर तो सुद्धा लोकांनी तितकाच पसंत केला असता!

इरफानच्या अभिनयातली सहजता आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे. समजा इरफानने हा सिनेमा केला असता तर आज वेगळ्या स्वरूपात बाळासाहेब आपल्यासमोर पडद्यावर अवतरले असते!

===

हे ही वाचा हिंदू मनाला भावलेला, कायमचा वसलेला ध्रुवतारा : बाळासाहेब ठाकरे

===

 

इरफान आज आपल्यात नाही, पण त्याने केलेले कित्येक रोल्स आजही लोकांच्या स्मरणात आहेत, पण ठाकरेमध्ये इरफानला बघायला प्रत्येकालाच आवडलं असतं हे मात्र नक्की!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version