नव्या वेष्टनात शिळाच माल! ‘अग्गबाई’, नव्या नावाने आपल्या माथी हे काय मारलं जातंय?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
टीव्हीवरील मालिका बघणं हा प्रत्येक सामान्यांचा अगदी आवडीचा विरंगुळा आहे. अबालवृद्ध आज आवडीने मालिका बघत असतात. लहान मुलांना असल्या मालिका बघण्याची सवय लावू नका, असं सांगायची वेळ यावी इतक्या मोठ्या प्रमाणावर सगळेच जण मालिकांच्या आहारी गेलेले आहेत.
अल्फा मराठी ते झी मराठी असा नावाचा प्रवास केलेली वाहिनी, गेली अनेक वर्षं टीआरपीच्या यादीत चांगला क्रमांक राखून होती. सध्या मात्र या वाहिनीवरील मालिकांचा टीआरपी घसरलेला पाहायला मिळतोय.
एकदा टीआरपी घसरला, की ‘येन केन प्रकारेण’ त्याला पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी चॅनलवाले झटत असतात. मग त्यासाठी अगदी मालिका ‘ऑफ ट्रॅक’सुद्धा झाली तरी बेहत्तर!
लवकरच संपणार असलेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका अशीच भरकटलेली पाहायला मिळाली. नवऱ्याची बायको ते बिझनेस वूमन, (३०० कोटींच्या कंपनीची मालकीण!), ते बायकोचा नवरा अशी असंख्य वळणं या मालिकेने घेतली.
सध्या आणखी एक मालिका अशाच भलत्या वळणावर जाणार अशी चिन्हं दिसतायत. डॉ. गिरीश ओक, निवेदिता सराफ, तेजश्री प्रधान इत्यादी मंडळींची तगडी स्टार कास्ट असणारी ही मालिका नुसता ट्रॅकच नाही, तर चक्क नावही बदलते आहे.
‘चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे’ ही म्हण सत्यात उतरवत ‘झी मराठी’ वाहिनीने ‘अग्गबाई सासूबाई’चं नाव ‘अग्गबाई सूनबाई’ असं केलंय.
View this post on Instagram
मालिका सुरु होऊन अनेक महिने झाल्यानंतर, मालिकेचं नव्याने बारसं होण्याची घटना पहिल्यांदाच घडत आहे. हा सगळा अट्टाहास कशासाठी, तर फक्त आणि फक्त घसरलेला टीआरपी पुन्हा वर यावा म्हणून… या मालिकेचा फक्त टीआरपीच नाही, तर पातळीच घसरली आहे. मालिकेचा दर्जा आणि पातळी चांगली होती, असं म्हणावं का? हाच मुळात प्रश्न आहे.
–
हे ही वाचा – टीव्हीवरील एखाद्या कार्यक्रमाचा “टीआरपी” जास्त आहे म्हणजे नेमकं काय? तुम्हाला माहित नसलेली ‘माहिती’!
–
अगदी सुरुवातीपासूनच या मालिकेत नुसताच मूर्खपणा सुरु आहे. प्रेमविवाह करणाऱ्या शुभ्राला नवऱ्याच्याच कॉलेजात असूनही, त्याने शिक्षण पूर्णच केलेलं नाही हे माहित असू नये… वाह रे वाह…!
त्याच सोहमने नुकतीच नोकरी मिळवली आहे. या नोकरीसाठी दिलेल्या इंटरव्यूमध्ये त्याने आजवर काय काय आणि कशी माती खाल्ली याचा पाढाच मांडला. तरीही त्याला नोकरी मिळाली बरं का मंडळी! म्हणजे टॅलेंट वगैरे जाऊ द्या, तुम्ही किती माती खाता यावर नोकरी मिळणार की नाही हे अवलंबून आहे. लॉकडाऊनच्या रामरगाडग्यात नोकऱ्या गेलेल्या मंडळींनी, हा फंडा वावरून बघायला हवा…
या मालिकेच्या नावासह आणखी दोन गोष्टी बदलणार आहेत. एक म्हणजे ‘साधीभोळी’ आसावरी अचानक बिझनेस वूमन झालेली पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये लहान मुलासह दिसणारी शुभ्रादेखील नवी दिसतेय. तेजश्री प्रधान साकारत असलेली ही भूमिका यापुढे उमा पेंढारकर साकारणार आहे.
मालिकेचं नवं नाव, म्हणजे नवं वेष्टन आणि त्यात तेजश्रीची रिप्लेसमेन्ट म्हणजे एक थोडासा वेगळा फ्लेवर, एवढं सोडलं तर सगळा नुसता शिळाच माल बघायला मिळतोय, नाही का?
अभिजित राजे, शुभ्रा अशी तीच नावं या प्रोमोमध्ये दिसतायत. खाली मात्र ‘नवी मालिका’ असं लिहिलेलं दिसतंय. ‘अग्गबाई’ मग हिला नवी मालिका समजावं, की सध्या सुरु असलेल्या मालिकेचं नवं रूप…
या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, ते आम्हाला कळू द्या, बरं का मंडळी… चला सांगा बरं पटापट…!
===
हे ही वाचा – राधिका मसालेची ३०० कोटींची शॉपिंग – मराठी प्रेक्षकांना मूर्ख समजता काय?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.