' पैशांच्या चणचणीमुळे शाळाही सोडणारा पठ्या असा बनला मुंबई एअरपोर्टचा मालक! – InMarathi

पैशांच्या चणचणीमुळे शाळाही सोडणारा पठ्या असा बनला मुंबई एअरपोर्टचा मालक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“चांद तारे तोड लाऊ, सारी दुनिया पर मैं छाऊ, बस इतनासा ख्वाब है, …….बस इतनासा ख्वाब है”, काय मस्त गाणं आहे नाही, आयुष्यात काहीतरी मिळवू पाहणारा, धडपड करणारा प्रत्येकजण हे गाणं गुणगुणत असतोच. प्रत्येकाची स्वप्न असतात, काहींची पूर्ण होतात, काहींची होत नाहीत, पण म्हणून स्वप्न बघणं कोणी सोडत नाही.

असंच एक स्वप्न एका युवकाने बघितलं होतं, त्याला हे माहित नव्हतं की त्याचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे की नाही, आणि झालंच तर नक्की कधी होईल? पण इथेच तो वेगळा ठरला, “पूर्ण होईल, नाही होईल” याचा अजिबात विचार न करता, हा युवक आपले प्रामाणिक प्रयत्न करत राहिला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज तो अशा ठिकाणी विराजमान आहे की ज्याची त्याकाळी कोणी कल्पनाही केली नसेल, त्या युवकाचं नाव आहे, “गौतम शांतीलाल अदानी”! होय आज जगभर पसरलेल्या “अदानी ग्रुप”चे सर्वेसर्वा.  जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांनी आता ५ स्थान मिळवले आहे.

हे ही वाचा – वय वर्ष ३४, रोज कोटींची उलाढाल….श्रीमंत तरुणांची अविश्वसनीय यशोगाथा!

 

adani main inmarathi

 

गौतम यांचा जन्म २४ जून १९६२ रोजी गुजरातमधील “अदानी” या मध्यमवर्गीय कुटुंबात अहमदाबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव “शांतीलाल” व आईचे नाव “शांती’ होते.

गौतम यांना ७ भावंडे होती. त्यांचे वडील Textile Merchant होते, त्यांच्या घरची परिस्थिती अगदी एखाद्या सामान्य कुटुंबाप्रमाणेच होती, त्यांनी दहावीनंतर बी. कॉमसाठी गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला, पण घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी सेकंड इयरमध्येच शिक्षण सोडून दिले.

त्यावेळी या माणसासमोर अनंत अडचणी आ वासून उभ्या होत्या, एकत्र कुटुंब असल्यामुळे घर चालवायचं तर होतंच, पण त्याही पुढे जाऊन स्वतःसाठी काहीतरी करायचं होतं. इथेच त्यांच्या वेगळेपणाची झलक दिसून येते.

शिक्षण सोडल्यानंतर त्यांना वडिलांचा पारंपरिक धंदा करता आला असता, पण त्यांची स्वप्नच वेगळी होती, त्यांना businessman तर व्हायचे होते, पण काहीतरी वेगळी सुरवात करून.

आज त्यांच्याकडे बघितले तर “Someone is sitting in the shade today because someone has planted a tree long time ago” या वॉरेन बफे यांच्या वाक्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

प्रथम त्यांनी तरुण वयात मुंबई गाठली आणि Mahendra Brothers मध्ये diamond sorter म्हणून नोकरीला सुरवात केली. साधारण २ ते ३ वर्षे त्यांनी ही नोकरी केली. नंतर झवेरी बाजरी मुंबई येथे स्वतःची diamond brokerage firm सुरु केली.

काहीतरी नवीन करण्याची उमेद त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती, पण करायचे काय हे ही नक्की होत नव्हतं, कुठेतरी मनामधून त्यांना ही जाणीव होत असावी फक्त diamond brokerage हेच काही त्यांच स्वप्न नाही, ते तर खूप मोठे आहे, एक successful businessman व्हायचे.

त्यांचा हा प्रवास चालू होताच, अशातच त्यांचे थोरले बंधू मनसुखभाई अदानी यांनी अहमदाबाद येथे एक छोटेसे प्लास्टिक युनिट चालवावयास घेतले. गौतम यांना ते सांभाळण्यासाठी गुजरातला परत येण्याची ऑफर दिली, ही ऑफर नाकारतील तर ते “गौतम अदानी” कसले, त्यांना माहित होते, कदाचित हाच त्यांच्या स्वप्नांकडे घेऊन जाण्याचा राजमार्ग असेल, त्यांनी ही ऑफर स्वीकारून पुढचा प्रवास सुरु केला.

 

logo inmarathi

 

Dont push people to where you want to be, meet them where they are” असं Meghan Anderson, Vice President, HubSpot मार्केटिंग यांनी लिहून ठेवलंय, जे “गौतम” यांना तंतोतंत लागू होते, संधी ही प्रत्येकाला मिळते, तिचं सोनं करायची ताकद फार थोड्यांमध्ये असते, “गौतम” हे त्यातीलच एक होते.

सन १९८५ मध्ये ह्या युनिटमध्ये प्रवेश करताच त्यांनी polypinvyl chloride च्या व्यवसायात लक्ष घालायला सुरवात केली. छोट्या छोट्या लघु उद्योगांसाठी त्यांनी पॉलीमर इम्पोर्टची व्यवस्था केली आणि हे करत असतानाच त्यांनी अदानी एक्सपोर्टस लिमिटेडची स्थापना केली, जी आज Adani Enterprises Limited या नावाने ओळखली जाते. ती “अदानी ग्रुप”ची होल्डिंग कंपनी आहे.

या सगळ्यावर कडी म्हणून की काय १९९१ साली economic liberlization policy मध्ये झालेले बदल अदानी यांच्या पथ्यावर पडले व त्यांची एकाच घोडदौड सुरु झाली, त्यांनी मग मागे वळून ना पाहता textile , agro, metal या सारख्या industries मध्ये उडी घेतली.

हे ही वाचा – १०००० कोटींचं साम्राज्य असणाऱ्या “बिग बुल”च्या टिप्सनी तुम्हीही व्हाल मालामाल!

 

port adani inmarathi

 

१९९४ साली गुजरात सरकारने Mundra Port साठी management outsource करण्याचा विचार केला आणि १९९५ साली Adani Group ला हे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. ही त्यांची सगळ्यात मोठी झेप होती, स्वप्नपूर्तीकडे जाण्याची. Mundra पोर्ट हा भारतातील सगळ्यात मोठा असा एक Private sector पोर्ट आहे.

१९९६ साली त्यांनी वीज निर्मिती क्षेत्रात प्रवेश करून Adani Power Limited ह्या कंपनीची स्थापना केली. ह्या कंपनीद्वारे त्यांनी thermal power क्षेत्र पादाक्रांत करायला सुरवात केली.

आजमितीला Adani Powers, ४६२० मेगावॅटची थर्मल पॉवर निर्माण करतात, आज Adani Power ही भारतातील सगळ्यात मोठी private sector thermal energy कंपनी ठरली आहे. पण म्हणतात ना, इतक्यावरच थांबतील ते Adani कसले… सन २००९ ते २०१२ या कालावधीत त्यांनी ऑस्ट्रेलियामधील Abbot Point Port व Carmichael Coal अशा बड्या कंपन्या विकत घेऊन एक इतिहास घडविला.

 

adani au inmarathi

 

त्यांच्या कर्तृत्वाचा कळसाध्याय म्हणजे २०२० साली त्यांना “Solar Energy Corporation of India” चे सगळ्यात मोठे प्रोजेक्ट मिळवण्यात यश आले, ज्याची क्षमता ८००० मेगावॅट इतकी प्रचंड आहे

तुम्हाला वाटत असेल, हे त्यांना अगदी सहज मिळालं असेल, पण त्यामागे त्यांची चाणाक्ष बुद्धी, स्वतःवर असलेला प्रचंड आत्मविश्वास आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची उपजत वृत्ती कामी आली. त्यांचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता.

राजकारणी लोकांशी असलेले संबंध हा त्यातील एक महत्वाचा विषय, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेली जवळीक सुद्धा कित्येकांना खटकली होती. जर फक्त अशा ओळखीने कुणी “गौतम अदानी “होत असते, तर आजवर कित्येक “अदानी” निर्माण झाले असते भारतात… पण तसं झालं नाही. हे सगळे आरोप सहन करून अदानींची वाटचाल चालूच आहे.

 

adani modi inmarathi

 

आज अदानी यांनी संपत्तीच्या बाबतीत Reliance चे सर्वेसर्वा Mukesh Ambani यांनाही मागे टाकले आहे, मुकेश अंबानी यांच्याकडे तर Reliance Group, वारसा हक्काने आला, पण अदानींनी मात्र एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन ही गरुडभरारी घेतली आहे. त्यांचा आदर्श त्यांनी तरुणाई पुढे घालून दिला आहे.

“अशक्य काहीही नसतं, पण त्यातील “अ” हा मात्र तुम्हालाच काढावा लागेल’ असं कोणीतरी म्हणून ठेवलंय ते उगाचच नाही”. अशा या अदानीच्या अशक्यप्राय कर्तुत्वाला एक सलाम तर बनतोच बनतो , तुम्हाला काय वाटतं?

===

हे ही वाचा – श्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठी ‘या’ गोष्टींचं हमखास पालन करतात

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?