Site icon InMarathi

१९६२ च्या भारत-चीन युद्धावर बेतलेली ही भन्नाट वेबसिरीज प्रत्येक भारतीयाने का बघावी?

1962 war featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

१९६२ साल म्हटलं की आपल्याला एकच प्रसंग आठवतो, तो म्हणजे “भारत-चीन” युद्धाचा, या युद्धाच्या खूप आठवणी आपण अजूनही उराशी बाळगून आहोत!

हा विषय तसा आपल्यासाठी खूप नाजूक आहे, कारण असं म्हणतात, की या युद्धात भारताचा दारुण पराभव होऊन आपण ४३,००० किलोमीटरची जमीन शत्रुपक्षाला बहाल केली.

ही घटना म्हणजे आपल्या भारतावर झालेली एक अशी जखम आहे, जिची खपली उघडली की कटू स्मृतींचं रक्त भळाभळा वाहायला लागतं.

पण मित्रांनो जे ऐकलं ते जे घडलं त्यापेक्षा वेगळं असू शकत नाही का? का असं झालं? कुणामुळे झालं, हे सर्व प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभे राहतात, ज्यांची उत्तरं मात्र आपल्याला एकतर माहिती नाहीत, किंवा विस्तृतपणे सांगितली गेली नाहीत!

===

हे ही वाचा ‘सद्यस्थितीशी’ संबंधित असे युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारीत ‘हे’ सिनेमे प्रत्येक भारतीयाने बघायलाच हवे!

===

हे सगळं आत्ताच आठवण्याचं कारण म्हणजे सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर आपल्यासाठी एक नवी वेबसिरिज घेऊन येत आहेत, जिचं नावच आहे, “1962, the war in the hills”!

 

 

खरंच महेश मांजरेकरांचं कोतुक करावं तितका थोडंच आहे, जे वाटतं ते बोलणारा आणि जे पटतं ते दाखवणारा हा माणूस मराठी चित्रपटसृष्टीचा एक आधारस्तंभ ठरला आहे!

 ते जे चित्रपट करतात तेही असेच त्यांच्यासारखे वेगळे, मग अस्तित्व असेल, वास्तव असेल, सुनील बर्वेंच्या सर्वांगसुंदर अभिनयाने नटलेला एड्स विषयावरचा “निदान” असेल, हा माणूस नेहमी काहीतरी वेगळा विचार करतोच!

“१९६२, the war in the hills” या वेबसिरिजद्वारे तो आपल्याही भावनांना वाट मोकळी करून देईल असा विश्वास वाटतो, यात त्यांना अभिनयात मिळणारी साथ हा पण एक चर्चेचा विषय ठरतोय!

अभय देओल सारखा कसलेला कलाकार, मराठमोळा आकाश ठोसर (सैराट फेम वैगरे म्हणणं योग्य ठरणार नाही, कारण कुठल्याही अभिनेत्यावर एक ठराविक शिक्का लागू नये असा शिक्का लावून, आपण त्याच्या अभिनय गुणांवर आपसूकच मर्यादा आणतो), सुमित व्यास ज्याने “पर्मनन्ट रूममेट” व ट्रीपलिंग सारख्या सिरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. या सर्वांवर कडी म्हणून की काय माही गिल एका मुख्य भूमिकेत झळकत आहे, म्हणजे सोनेपे सुहागा!

 

 

या सगळ्या सशक्त कलाकारांची टीम त्यांच्या मागे उभी आहे, मग तुम्ही म्हणाल ही रिलीज कधी होणार, कुठल्या प्लॅटफॉर्म वर, मग ऐका दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ रोजी ही बहुचर्चित सीरिज “डिस्ने हॉटस्टार” या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.

ही सिरिज कशी असेल, चांगली का वाईट हा प्रश्नच वेगळा आहे, पण या युद्धात बळी पडलेल्या भारतीय सैन्याप्रती एक आदरभावना आणि महेश मांजरेकरांच्या नवीन प्रयत्नांचे कोतुक करण्यासाठी ही सिरिज आपण पाहायलाच हवी!

“हिंदी-चिनी भाई भाई” म्हणणारा चीन कुठल्या पातळीपर्यंत जाऊन पोचला, भारताचा खरंच विश्वासघात केला की भारत गाफील राहिला, या सर्व प्रश्नांच्या मुळाशी गेल्यावर, अशा काही गोष्टी समजल्या की ज्या आपल्याला सत्य स्वरूपात कधी सांगितल्याच गेल्या नाहीत!

 

 

आपल्या पूर्व इराकी राजदूतांनी असं म्हटलंय, की हे युद्ध चीनने भारताच्या सार्वभोवमत्वाला आणि विशालतेला आव्हान देण्यासाठी सुरु केलं! साम्राज्यवादी चीनची अशी ओळख जगापासून लपून राहिलेली नाही.

===

हे ही वाचा चीनच्या वाढत्या कुरापतींमुळे भारताला चीनकडून भविष्यात धोका संभावण्याची शक्यता?

===

दुसरी महत्वाची माहिती अशी समोर आली ती म्हणजे चीनने सर्व बॉर्डरवर, (सर्व दिशांना) एकाच वेळी आक्रमण केले, ती वेळ होती संध्याकाळी बरोबर ५ वाजता, म्हणजे अशीही शंका घ्यायला वाव आहे, की हे आक्रमण आपल्याला “हिंदी-चिनी भाई भाई” म्हणून गुंतवून ठेवून झालेलं होतं!

पण याहूनही धक्कादायक बाब म्हणजे या युद्धामध्ये हवाई दलाचा वापरच केला गेला नाही, जे युद्ध केलं ते आपल्या armed forces नी केलं, जर हवाई मदत मिळू शकली असती, तर निकाल कदाचित वेगळा लागू शकला असता!

पण इथेच थांबेल तो चीन कसला, जगविख्यात युद्धतज्ञ Bruce Riddle च्या पुस्तकात एक दाखला दिला आहे, ज्यात असा उल्लेख आहे की चीनने याचवेळी पाकिस्तानने सुद्धा भारतावर हल्ला करावा असा प्रस्ताव तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान अयुब खान यांना दिला होता, मोबदल्यात “काश्मीर”चे बक्षीस पाकिस्तानला मिळणार होते!

 

 

पण त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांची भारताला ३५० मिलियन डॉलरचा शस्त्रसाठा देण्याची ऑफर दिली होती, जी त्यांच्या हत्येमुळे पुढे प्रत्यक्षात उतरू शकली नाही!

या सर्वांवर कडी म्हणून की काय लतादीदींनी गायलेलं , “ए मेरे वतन के लोगो” जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यात देखील पाणी आणून गेलं जे आजही ऐकू आलं कि अंगावर काटा येतो!

हे आणि असे असे अनेक संदर्भ या युद्धाबद्दल देता येतील, पण “१९६२, the war in the hills, या सिरिजमध्ये सुद्धा अशाच एका घटनेवर प्रकाश टाकला जातोय, ज्यामध्ये फक्त ८००० भारतीयसैनिकांनी ८०००० हजार चिनी सैन्याला रोखून धरले आणि अभूतपूर्व पराक्रम केला!

आपण युद्धावर अनेक चित्रपट बघितले, बॉर्डर बघितला, लक्ष्य बघितला, उरीसुद्धा बघितला, मग हि वेबसिरिजही पाहूया की! काय माहित यात सुद्धा काही दडलेली गुपितं असतील, जी आपल्याला माहित नाहीत!

 

 

फक्त तारीख लक्षात ठेवा २६ फेब्रुवारी, २०२१, भारत-चीन युद्ध सुरु होतंय, डिस्नी हॉटस्टार वर, मग काय बघणार ना? कोणासाठी नाही बघितलेत तरी चालेल, फक्त आपल्या शूर सैनिकांसाठी तरी एकदा बघा, जय हिंद!

===

हे ही वाचा तिबेट – चीन – भारत : हा किचकट त्रिकोण समजून घेणं प्रत्येक भारतीयासाठी अत्यावश्यक आहे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version