' हा पत्रकार नसता तर दाऊदचा ‘तो’ फोटो कधीच आपल्यासमोर आला नसता! – InMarathi

हा पत्रकार नसता तर दाऊदचा ‘तो’ फोटो कधीच आपल्यासमोर आला नसता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अजय देवगण, इम्रान हाश्मी यांचा वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई हा सिनेमा प्रचंड गाजला. त्यातली गाणी डायलॉग, अभिनय सगळंच भन्नाट होतं. असं म्हणतात की त्यावेळच्या मुंबईच्या हाजी मस्तान गॅंग आणि दाऊदची गॅंग यांच्यावर हा चित्रपट बेतला होता.

यातला इम्रान हाश्मीचा एक डायलॉग प्रचंड फेमस झाला होता तो म्हणजे “जिंदगी हो तो स्मगलर जैसी, सारी दुनिया राख की तरह नीचे और खुद धुए की तरह उपर!”

 

once upon a time in bollywood inmarathi

 

हा डायलॉग दाऊदच्या बाबतीत अगदी चपखल बसतो. आज सारं जग त्याच्या मागे लागलेलं असतानाही जगाच्या कोणत्या कोपऱ्यात तो जाऊन बसलाय याचा कुणालाच थांगपत्ता लागलेला नाहीये!

पण एक काळ असाही होता जेंव्हा हा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार क्रिकेटच्या मॅक बघायला स्टेडियममध्ये हजेरी लावायचा, फिल्म इंडस्ट्रीच्या मोठमोठ्या लोकांसोबत ऊठबस करायचा, आणि इतका मोठा स्मगलर असूनसुद्धा पोलिस त्याला पकडत नसत.

हा तो काळ होता १९९३ च्या बॉम्बब्लास्ट आधीचा. दाऊद क्रिकेटप्रेमी आणि सिनेमाप्रेमी होता हे जगजाहीर आहे. क्रिकेटच्या मॅच बघायला तो स्टेडियम मध्ये कधी कधी यायचा. आजही फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याचंच नाणं चालतं असं म्हंटलं जातं!

 

dawood inmarathi

 

पण १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतर मात्र सगळं चित्र बदललं. मुंबई पोलिसांच्या हाती बरेच पुरावे लागले आणि दाऊदला हा देश सोडून कायमचा पोबारा करावा लागला.

या प्रकरणात दाऊदचं नाव थेट घेतलं जाऊ लागलं. या सगळ्यामागे दाऊदनेच पैसा लावला असंही बोललं जाऊ लागलं, त्याने स्वतःला निर्दोष ठरवण्याचे अनेक केविलवाणे प्रयत्न केले. पण शेवटी हे नाव जगातल्या सगळ्या संस्थेच्या हीटलिस्टवर आले जे आजतागायत तसेच आहे!

दाऊदची कुकर्म आणि त्यांचे उलट सुलट धंदे आपल्याला काही नवीन नाहीत. एवढंच काय तर दाऊद असं तुम्ही नुसतं गुगल वर सर्च जरी केलंत तरी काही मोजके तुरळक फोटोच आपल्या समोर येतात.

===

हे ही वाचा गोपीनाथ मुंडे यांनी उघडकीस आणले दाऊद आणि शरद पवारांचे संबंध…?

===

त्यापैकी एक फोटो म्हणजे पिवळ्या टी-शर्ट मधला, तपकिरी रंगाचा जाड गॉगल घातलेला, हातात फोन घेतलेला, भरीव मिशी आणि ओठात सिगरेट पकडलेला दाऊदचा फोटो हमखास गुगलवर येतोच येतो!

 

dawood 2 inmarathi

 

दाऊद हा त्याच्या आयुष्याबाबत बरीच गुप्तता पाळून आहे त्यामुळे इंटरनेटवर त्याचे फार कमी फोटोज उपलब्ध आहेत!

पण तुम्हाला दाऊदच्या या फेमस फोटोमागची धम्माल गोष्ट माहिती आहे का? हा फोटो नेमका कुणी काढला होता? दाऊदची परवानगी घेऊन हा फोटो काढला होता का? याविषयीची माहिती आपण या लेखातून जाणून घेऊया!

हा फोटो काढणारे फोटोजर्नलिस्ट म्हणजेच भवन सिंह इंडिया टूडेमध्ये काम करत होते. ही गोष्ट १९९३ बॉम्बस्फोटाच्या आधीची होती. १९८५ साली शारजाच्या स्टेडियम मध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच चालू होती. डे अँड नाइट मॅच असल्याने त्यावेळेस मॅचसाठी बरीच लोकं आले होते!

 

bhavan singh inmarathi

 

भवन सिंह स्टेडियमच्या व्हीआयपी लाउंज मध्ये त्यांचा कॅमेरा घेऊन फिरत होते तेंव्हा त्यांच्या कानावर एक नाव पडलं जे ऐकून ते चक्रावलेच, ते नाव होतं दाऊद ईब्राहिम याचं!

हा तो काळ होता जेंव्हा कुख्यात गुन्हेगार दाऊदचे जास्त फोटोज मिडिया मध्ये नव्हते. शिवाय भवन सिंह यांनी आजवर दाऊदला कधीच पाहिले नव्हते तरी आसपासच्या लोकांच्या वावरावरुन त्यांना नेमका दाऊद कोण याचा अंदाज आला होता!

भवन सिंह यांच्याकडे तेंव्हा २ कॅमेरे होते, त्यातला एक त्यांनी गळ्यात अडकवला आणि एक ट्रायपॉडला लाऊन फ्रेम सेट करून दाऊदचा फोटो काढायची तयारी करणार इतक्यातच दाऊदच्या आजूबाजूच्या लोकांनी भवन सिंह यांना झिडकारलं, त्यात छोटा राजनसुद्धा होता.

त्यांनी भवन सिंह यांना फोटो काढू नये म्हणून तिथून झिडकारलं, भवन सिंह हे काही क्षणासाठी स्तब्ध झाले, त्यांना काय करावं हे कळेना. त्यांच्या चेहऱ्याकडे एक सेकंड दाऊदची नजर गेली आणि त्याने त्यांच्या माणसांना इशारा करूनच सांगितलं की “काढू दे त्याला फोटो”!

भवन सिंह यांनी अजिबात वेळ न घालवता ताबडतोब ५ फोटोज क्लिक केले. भारत ती मॅच हरला होता, आणि जेंव्हा भवन सिंह पुन्हा भारतात आले तेंव्हा त्यांनी क्लिक केलेले दाऊदचे फोटो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.

 

dawood 3 inmarathi

 

सुदैवाने त्यांनी क्लिक केलेले फोटो दाऊदचाच होता, जर तो फोटो कुणा दुसऱ्या व्यक्तीचा असता आणि तो पब्लिश झाल्यावर हे समजलं असतं तर त्याचे उलट परिणाम झाले असते.

दाऊदची परवानगी नसतानाही या फोटोग्राफर ने जी हिंमत करून त्याचा फोटो काढायचा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी सुद्धा झाला अशा भवन सिंह यांच्या कृपेमुळेच दाऊदचे फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहेत. नाहीतर आज कित्येक गुन्हेगार असेदेखील आहेत ज्यांच्या नावाखेरीज कोणतीच माहिती आपल्या संस्थांकडे नाहीत.

या अशा भयानक गुन्हेगाराचा सामना करून त्याची परवानगी न घेता फोटो काढणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजण्यासारखं आहे!

===

हे ही वाचा “तुमचा दाऊद तर आमचा गवळी”, बाळासाहेबांच्या गर्जनेने अंडरवर्ल्डची झोप उडाली होती

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?