Site icon InMarathi

झी मराठीवरील ही सुपरहिट मालिका परत येतीय, पहा त्या सिरिअरलचा भन्नाट टिझर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काही वर्षांपुर्वीपर्यंत एकाहून एक सरस मालिका देणाऱ्या झी मराठीची पातळी घसरली असल्याचा आरोप सध्या प्रेक्षकांकडून केला जात आहे.

याचंच प्रतिक म्हणजे झी मराठीचा खालवलेला दर्जा दाखवणाऱ्या मालिका आणि झीला कंटाळून इतर वाहिन्यांकडे वळलेला प्रेक्षकवर्ग.

 

 

मात्र प्रेक्षकसंख्येला लागलेली गळती लक्षात घेता आता वाहिनेने आपल्या परिने खटपट सुरु केली आहे. याचाच एक प्रयत्न म्हणजे एका गाजलेल्या मालिकेचा तिसरा सिझन आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

हे ही वाचा – टीव्ही मालिकांना “डेली सोप्स” म्हणण्यामागचं ‘हे’ कारण वाचून आश्चर्य वाटेल!

झी मराठीने आपल्या अधिकृत सोशल मिडीयाव्दारे या मालिकेचा टिझर प्रदर्शित केला आणि प्रेक्षकांना चर्चेला नवा विषय मिळाला.

ही मालिका कोणती? तिचे नवेकोरे भाग कधी येणार? याबाबत प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असून अखेर या कोड्याचं उत्तर सापडलंय.

गेले दोन सिझन एका गुढ वलयात प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या रात्रीस खेळ चाले या मालिकेचा तिसरा भन्नाट सिझन प्रेक्षकांना पाहता येणार आहे. याच मालिकेचा टिझरही सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. 

 

 

‘रात्रीस खेळ चाले’ चा दुसरा सीजन मागच्या वर्षी संपला होता. संपूर्ण महाराष्ट्रात अण्णा नाईक यांची दहशत निर्माण झाली होतीच त्यात शेवंताच्या सौंदर्याने अनेकजण घायाळ झाले होते. त्यांची रोमँटिक केमेस्ट्री चॅनेलने चांगलीच रंगवली.

बाहूबलीची जितकी उत्सुकता होती तितकची महाराष्ट्रातील प्रेक्षकांना या सिरीयलच्या दुसऱ्या सीझनची उत्सुकता होती. अगदी बाहुबली सारखा ट्रेंड उचलून त्यांनी कथा आपल्या समोर मांडली.

पहिल्या सीझनमधील पहिल्या एपिसोडपासून मालिकेने उत्सुकता निर्माण केली होती. अण्णा नाईकांचा आपल्या मुलाच्या लग्नाच्याच दिवशी मृत्यू होणं, त्यातून हळूहळू एक एक कलाकार व कथा पुढे जात होती मात्र कुठेतरी माशी शिंकली आणि मालिका उत्सुकतेच्या शिरावर पोहचली असताना चॅनलने गुंडाळून टाकली.

 

 

सुसल्या नक्की कोणाची मुलगी आहे हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला. जसे भाऊबली मध्ये कट्ट्पा ने बाहुबली को क्यू मारा हा प्रश्न होताच अगदी तसाच हा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना पडला होता.

पहिल्या सीजनमध्ये दाखवलेली पात्र ही साधारणतः मोठ्या वयाची, घरची जबाबदारी घेतलेली आहे असे दाखवले आहे तर दुसऱ्या सीझनमध्ये प्रत्येक पात्राची पार्श्वभूमी म्हणजे अगदी बालपणापासून  ते तारुण्यपर्यंतचा प्रवास दाखवला होता. नाईक कुटुंब कसे तयार झाले हे दाखवण्यात आले.

दुसऱ्या सीजनचा संपूर्ण फोकस हा अण्णा नाईक या पात्रावर होता कारण पहिल्या सिझनच्या पहिल्याच भागात त्यांचा मृत्यू झाला पण त्या मृत्यूमागची कारणे ही दुसऱ्या भागात दाखवली होती.

 

 

पहिला सीजन हा सुसल्या नक्की कोण आणि घरात घडणारे प्रसंग तसेच कोकणातील अंधश्रद्धा, भुताखेताचे प्रकार ह्या गोष्टींमुळे गाजला तर दुसरा सीजन अण्णांच्या कुकर्मासह शेवंताच्या प्रेमामुळे चर्चिला गेला.

एकीकडे खुनशी, क्रूर स्वभाव असणारे अण्णा नाईक एका बाईसाठी किती हतबल झाले हे दाखवण्यात आलं होतं.

कथेची पार्श्वभूमी ही कोकणातली दाखवली होती, जमीनदार माणसाची गावातली दहशत, कुटुंब प्रमुखाच्या स्वभावामूळे कुटुंबावर होणारे अन्याय, कोकणातील इरसाल नमुन्यांप्रमाणे त्यातील पात्र, त्यासाठी घेतलेले कलाकार त्या त्या पात्रात चपखल बसले.

अण्णा आणि शेवंतांचं प्रेम हा अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला होता.

 

 

मालिकेतील भाषेचा लहेजा, तांत्रिक बाजू तितक्याच ताकदीची होती.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मालिकेच्या तिस-या सिझनमध्ये कोणते कलाकार दिसणार? कथा नेमकी काय असणार? पहिल्या दोन सिझनचा मेळ साधला जाणार की काही आक्रीत पहायला मिळणार? या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर काही दिवस वाट पहा.

===

हे ही वाचा – बालपण पुन्हा जगायचंय? : तुमच्या प्रिय बालपणी घेऊन जाणाऱ्या “टाईममशीन” मालिका…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version