' पाठदुखीने बेजार झालाय? घरगुती व्यायामाचा फायदा नक्कीच होऊ शकेल… – InMarathi

पाठदुखीने बेजार झालाय? घरगुती व्यायामाचा फायदा नक्कीच होऊ शकेल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अनेक वेळा झोप झाली नाही किंवा चुकीच्या पद्धतीने झोपलो म्हणून आपल्याला दिवसभर पाठदुखीचा त्रास जाणवतो. या पाठदुखीसाठी अनेक व्यक्ती अनेक प्रकारचा व्यायाम करतात.

कधी कधी व्यायाम केल्यानंतर सुद्धा काही वेळेस त्रास कमी होत नाही. अशावेळी काय करायला पाहिजे, कुठल्या प्रकारचे व्यायाम केल्यामुळे तुम्हाला आराम वाटेल ही माहिती या लेखात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

आपल्यापैकी अनेक मंडळी दिवसभर पाठदुखीने, मानदुखीने त्रस्त असतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे रात्री व्यवस्थित झोप न होणं किंवा चुकीच्या पद्धतीने झोपणं.

 

actress sleeping inmarathi

 

या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे घरगुती व्यायाम करता येतील, ज्यामुळे तुम्हाला पाठदुखीचा त्रास होणार नाही.

यातील काही व्यायाम खाली दिलेले आहेत… चला तर मग जाणून घेऊयात या घरगुती व्यायामांबद्दल….

१. ब्रिज

हा व्यायाम तुम्ही तुमच्या घरी सुद्धा अगदी व्यवस्थितपणे करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जिममध्ये जाण्याची आवश्यकता नाही.

हा व्यायाम खालील पद्धतीने करा

सगळ्यात आधी फरशीवर किंवा सपाट जमिनीवरत झोपा. त्यानंतर जमिनीवर तळहात आणि तळपाय टेकवा. तळहात आणि तळपायावर जोर देत पाठ, मांडी, गुडघा, कंबर हे इतर अवयव जमिनीपासून वर, अधांतरी राहतील अशाप्रकारे उचला. अशाप्रकारे एका मिनिटात १५ वेळेस व्यायाम केल्याने तुम्हाला पाठदुखीचा त्रास जाणवणार नाही.

 

bridge-exercise-inmarathi

 

२. गुडघा छातीला टेकवणे

सर्वप्रथम सपाट जमिनीवर किंवा फरशीवर पाठ टेकून झोपा. त्यानंतर पाय गुडघ्यातून उचला आणि तळपाय जमिनीवर टेकवा. याच स्थितीत दोन्ही हाताने एका पायाचा गुडघा पकडून गुडघा छातीला पाच सेकंदासाठी टेकवा.

हे ही वाचा – पाठदुखीच्या वेदना असह्य होतायत? आहारातील “या” सवयी आजच बदला…

 

knees-on-chest-inmarathi

 

अशाप्रकारे दोन्ही पायाचे गुडघे छातीला टेकवावेत. अशाप्रकारे दोन-तीन वेळेस व्यायाम केल्याने तुम्हाला पाठदुखीचा त्रास होणार नाही.

३. Lower back rotational stretches

या व्यायाम प्रकारात देखील सर्वप्रथम सपाट जमिनीवर किंवा फरशीवर झोपा. दोन्ही पायांचे गुडघे वाकवून, दोन्ही पायांचे तळवे जमिनीवर टेकवा. त्यानंतर दोन्ही पाय एका दिशेने हळूहळू खाली घेत जमिनीला टेकवावे. याच स्थितीत ५ ते १० सेकंद पाय तसेच ठेवावेत. अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूला देखील पाय टेकवावेत. या पद्धतीने प्रकारे रोज व्यायाम केल्याने तुम्हाला पाठदुखीचा त्रास होणार नाही.

 

lower-back-rotational-stretches-inmarathi

 

४. Lying lateral leg lifts

या व्यायाम प्रकारात सर्वप्रथम सपाट जमिनीवरती किंवा फरशीवर एका कुशीवर झोपावे. यावेळी मात्र तुम्हाला तुमच्या हाताच्या आणि पायाच्या स्नायूंवर जोर द्यायचा आहे.

आपल्या हातांच्या आणि पायांच्या स्नायूंवरती जोर देत एक पाय शक्य होईल तेवढा वर उचलावा आणि वर उचलल्यानंतर पाच सेकंदांसाठी स्थिर ठेवावा आणि नंतर परत खाली घ्यावा.

 

Lying-lateral-leg-lifts-inmarathi

 

असे दहा वेळेस करावे आणि नंतर दुसऱ्या कुशीवर सुद्धा अशाच प्रकारे व्यायाम करावा. असा व्यायाम केल्यामुळे तुम्हाला पाठदुखीचा त्रास होणार नाही.

५. Cat stretches

हा व्यायाम करण्यासाठी गुडघा आणि हातावर जोर देत पाठ उचलून धरावी, त्यानंतर पाठ आणि मान हा भाग वर करून ताणून धरावा. नंतर हळूहळू तो खाली करत ताण देखील कमी करावा आणि थोड्यावेळाने ताण पूर्णपणे सोडून द्यावा.

 

cat-stretches-inmarathi

 

परत पहिल्या परिस्थितीत येत अशाप्रकारे व्यायाम करत राहावा. सकाळी तीन ते पाच वेळेस हा व्यायाम अगदी योग्य पद्धतीने केल्यास तुम्हाला पाठदुखीची कसलीही तक्रार राहणार नाही.

६. Superman pose

या व्यायाम प्रकारात तुम्हाला सपाट जमिनीवर पोटावर झोपावे लागते आणि त्यानंतर दोन्ही हात आणि पाय ताठ करत त्यांना ताण द्यावा लागतो. त्यानंतर आपली छाती आणि गुडघा जमेल तेवढा वर उचलायचा आहे. अशाच स्थितीत दहा सेकंद थांबावं. अशा प्रकारे व्यायाम केल्यामुळे तुम्हाला पाठदुखीचा त्रास होणार नाही.

 

superman-pose-inmarathi

 

हे सर्व व्यायाम प्रकार करत असताना अगदी व्यवस्थित पद्धतीने केल्यासच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि पाठ दुखीपासुन तुमची मुक्तता होईल. नाहीतर त्याचा फायदा व्हायच्या ऐवजी तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल.

===

हे ही वाचा – घरबसल्या व्यायाम कसा करावा हे सुचत नसेल तर या ८ टिप्स नक्की फॉलो करा

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?