' आंबट गोड चव असणाऱ्या या फळाला जगभरातून होते प्रचंड मागणी! – InMarathi

आंबट गोड चव असणाऱ्या या फळाला जगभरातून होते प्रचंड मागणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजकाल प्रत्येक जण विकेंडसाठी कुठे ना कुठे जात असतोच, बऱ्याच जणांच्या स्टोरीमध्ये सुला वाईन्सला भेट दिलेली दिसून येत असते.

नाशिक पर्यटनात अग्रेसर आहेच त्यात सुला वाईन्सने आणखीनच भर पडली आहे. सुला वाईनयार्ड हे भारतातील सर्वोत्कृष्ट वाइनरी उत्पादन केंद्र आहे.

या वाईनयार्डमध्ये एक वाईन टेस्टिंग रूम देखील आहे. जिथे पर्यटकांना विविध प्रकारच्या वाईन चाखण्याची संधी मिळते.

वाईन प्रामुख्याने द्राक्षापासून बनवतात, द्राक्षावर असणार्‍या यीस्टमुळे त्यापासुन वाईन बनवणे सोपे जाते. असे हे आंबट गोड फळ भारतात आले कुठून त्यांचा इतिहास थोडक्यात पाहूया!

 

grapes inmarathi

 

द्राक्ष वेलवर्गातील फळ आहे. नाशिकला जाताना अनेक द्राक्षांचे मळे आपल्याला दिसून येतात. साधारण इ. स. १३०० च्या सुमारास इराण व अफगाणिस्तान येथून द्राक्षवेल आला असे काही लोकं मानतात. भारतीय संस्कृती तसेच ग्रंथांमध्ये द्राक्षाचा उल्लेख आढळून येतो.

द्राक्षांचे मूळ हे पश्चिम आशियातच आढळून आलेलं दिसून येते. द्राक्षाच्या वंशातील (व्हायटेस) एकूण पन्नास ते साठ जातींपैकी भारतात फक्त पाच आढळतात.

द्राक्षे प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये विभागली जातात – टेबल आणि वाइन द्राक्षे – दोन्हीमध्ये युनिक टेक्सचर, गोडपणा आणि चव असते. टेबल द्राक्षात बिया नसतात आणि ती ताजी खाऊ शकतात. ते सलाड  आणि पाककृतींमध्ये देखील वापरले जातात.

===

हे ही वाचा फणस मजा म्हणून खाताय? हे वाचल्यावर गुणकारी औषध म्हणूनही फणस खाल्ला जाईल

===

हे द्राक्षे हिरव्या, काळ्या, लाल आणि जांभळा अशा विविध रंगांमध्ये येतात आपल्या इथे बाजरात सामन्यात दोन प्रकारची द्राक्षे आढळून येतात त्यामध्ये एक हिरव्या प्रकारची व दुसरी जांभळ्या  रंगाची.

कुठे पिकते?

द्राक्ष म्हटलं की नाशिक हे समीकरण झाले आहेच पण सांगली जिल्ह्यात देखील द्राक्षाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. तसेच भारतात तामिळनाडू,आंध्र प्रदेश ,पंजाब हरियाणा ही राज्य देखील आहेतच.

 

grapes 2 inmarathi

 

सर्वात जास्त द्राक्षाचे उत्पादन घेणारे राज्य म्हणजे कर्नाटक. ह्या फळाच्या लागवडीसाठी हलकी किंवा मध्यम काळी अशी जमीन लागते त्याबरोबरीने कोरडे आणि उष्ण हवामान लागते.

द्राक्षलागवडीची काळजी घेणे हे तितकेच जवाबदारीचे असते. द्राक्षे काळजीपूर्वक हाताळली पाहिजेत, इतर विशिष्ट फळांप्रमाणेच, एकदाच संपूर्ण पिकल्यानंतर त्यांची कापणी केली जाते.

कोणती द्राक्षे घ्यावीत?

द्राक्षे विकत घेताना नीट बघून घ्यावीत, सुरकुत्या व मुरुमे नाहीत ना हे खात्री करून घ्या तसेच हिरव्या द्राक्षांसाठी पिवळसर रंगाची छटा असल्यास ती जर तुम्हाला गोड वाटली असेल तरच घ्या.

कोणत्याही कीटकनाशकाच्या अवशेषांचे सेवन टाळण्यासाठी खात्रीलायक फळ विक्रेत्याकडून किंवा स्टोअरमधून द्राक्षे खरेदी करा.

 

grapes seller inmarathi

 

जास्त काळ ताजेपणा राखण्यासाठी स्वच्छ बॅगमध्ये धुवून द्राक्षे फ्रिजमध्ये ठेवा. तथापि, फ्रीजमध्ये द्राक्ष ठेवल्यानंतर चार ते पाच दिवसांच्या आत ती खाणे चांगले.

द्राक्षांचे आंतरराष्ट्रीय स्थान :

देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच जागतिक बाजारपेठेत द्राक्ष विक्रीस चांगला वाव आहे. भारतीय द्राक्षाची निर्यात प्रामुख्याने नेदरलॅंड, इंग्लंड, बांगलादेश, बेल्जियम, सौदी अरेबिया, नॉर्वे, जर्मनी, नेपाळ, श्रीलंका इ.देशांत जास्त प्रमाणात होत आहे.

लॉकडाऊनचा द्राक्ष निर्याती वरही परिणाम झाला होता पण जानेवारी मध्ये चित्र चांगले दिसून लागले आहे.

द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे, निर्यातक्षेत्रात भारतीय द्राक्षांच्या अनेक वर्षांच्या मोनोपॉलिला मागील काही वर्षापासून चिली या देशाने आव्हान दिले आहे.

द्राक्षांचे  फायदे :

सध्या द्राक्षांचा सिझन आहे. द्राक्ष हे चविष्ट, पौष्टिक आणि पचण्यास सुलभ असे फळ आहे. द्राक्ष हे ग्लुकोजसाठी प्रसिद्ध फळ आहे. द्राक्षांच घड हे अन्नमूल्ये, खनिजं आणि जीवनसत्त्वांनी भरलेलं आहे.

 

grapes 3 inmarathi

 

त्यातील  अँटीऑक्सिडंट आपल्याला जळजळ कमी करण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करू शकते. उष्णतेला पराभूत करण्यासाठी ते परिपूर्ण फळ आहेत आणि पौष्टिकतेचे दररोज मूल्य प्रदान करुन आपल्याला निरोगी ठेवू शकतात.

दमा, ह्रदयरोग, बद्धकोष्ठता, डोकेदुखी, मूत्रपिंडाचे आजार ह्यासारख्या आजरांवर द्राक्ष उपायकारक आहेत. मधुमेह ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी देखील द्राक्षे खाल्ली पाहिजेत.

===

हे ही वाचा फळं खायचीयेत, पण कॅलरीजची चिंता भेडसावतेय? तुमच्या “डाएटिंग”साठी ही फळं आहेत लाभदायी

===

आपल्या शरीरातील साखरेची पातळी कमी करण्याचे काम द्राक्ष करतात. जर आपल्याला भूक न लागण्याची समस्या असल्यास आणि यामुळे आपले वजन वाढत नाही तर द्राक्षे खाल्ली पाहिजेत.

द्राक्षापासून तयार केलेले पदार्थ :

द्राक्ष हे अल्पकाळ टिकणारे फळ आहे. द्राक्षापासून आसव, रस, सरबत, मद्य, शिर्का (व्हिगेनर), जेली, लोणची, मुरंबा, बेदाणा व मणूका तयार करतात. बेदाणा आणि मनुका ही वाळलेली द्राक्षे आहेत.

 

manuka inmarathi

 

ह्या आंबटगोड फळाचा वापर गीतकार गुलज़ारांनी देखील केला आहे. त्यांनी त्यांच्या चित्रपटाला ह्या फळाचे नाव दिले तो म्हणजे ‘अंगूर’ हा सिनेमा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?