Site icon InMarathi

इराकमध्ये अपहरण: मुंबईच्या पत्रकाराची चक्क अमिताभ बच्चनमुळे झाली सुटका!

hussain zaidi featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ब्लॅक फ्रायडे, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, शूट आऊट अॅट लोखंडवाला, शूट आऊट अॅट वडाळा या फिल्म मध्ये कॉमन काय आहे? दहशतवाद, गॅंग आणि गँगस्टर या व्यतिरिक्त?

या सगळ्यांमध्ये एक समान दुआ आहे तो म्हणजे पत्रकार हुसेन झैदी! हुसेन झैदी यांच्या पुस्तकांवर आधारित या सगळ्या फिल्म्स आहेत. हुसेन झैदी यांच डोंगरी ते दुबई हे पुस्तक जरी वाचलं तरी जवळपास सगळ्या फिल्म्सचा अंदाज तुम्हाला येईल.

 

 

तर हे हुसेन झैदी आहेत कोण? ज्यांच्या पुस्तकांवर असे कित्येक हिट चित्रपट तयार झाले. तर आज याच व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत.

एस हुसेन झैदी. भारतात आणि खास करून अंडरवर्ल्ड मध्ये प्रसिद्ध असलेले क्रिमिनल रिपोर्टर. तस यांचा जन्म मुंबईच्याच एका सामान्य मुस्लिम घरातला! शिक्षण पूर्ण झालं तसं पत्रकारितेला आपला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून त्यांनी निवडले.

एशियन एज या वृत्तपत्रात त्यांनी कामाला सुरुवात केली. रेसिडेंट एडिटर पदापर्यंत पोहोचेपर्यंत ते तिथे कार्यरत होते. नंतर जसा जसा अनुभव वाढत गेला तसं इंडियन एक्स्प्रेस, मिड डे, मुंबई मिरर सारख्या नावाजलेल्या वृत्तपत्रात त्यांनी काम केलं.

झैदी यांची पत्रकारिता आणि मुंबई मध्ये गॅंग आणि गँगवॉर यांची सुरवात एकाच वेळची. आतापर्यंत ज्या ज्या मोठ्या गॅंग मुंबईत सक्रिय होत्या आणि त्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गँगस्टरला त्यांनी त्याच्या कार्यकाळात जवळून पाहिले आहे.

 

 

एवढंच काय त्या गॅंग वर कारवाई करणाऱ्या पोलिसांपासून गॅंगला रसद पोहोचवणाऱ्या नेत्यांपर्यंत त्यांची उडी गेली होती.

कालांतराने आपल्या तीन चार दशकांचा अनुभव त्यांनी लिखित रुपात आणायचे ठरवले आणि वेगवेगळी क्रिमिनल पार्श्वभूमीवरची पुस्तकं बाजारात यायला लागली.

त्यांची गाजलेली काही पुस्तके पुढील प्रमाणे:

ब्लॅक फ्रायडे – द ट्रू स्टोरी ऑफ द बॉम्बे बॉम्ब ब्लास्ट

 

 

मुंबईत १९९३ साली झालेल्या तेरा साखळी बॉम्ब स्फोटाबाबत यामध्ये सविस्तर लिहिले गेले आहे. चार वर्षे हुसेन झैदी यांनी केलेली शोध पत्रकारिता म्हणजे हे पुस्तक.

भारताबाहेर कट कसा रचला गेला, तो सत्यात कसा उतरवला गेला याची माहिती त्यांनी दाऊद आणि टायगर मेमन यांच्या जवळच्या माणसापासून मिळवून या पुस्तकाची रचना केली.

अनुराग कश्यपचा ब्लॅक फ्रायडे हा या पुस्तकावर आधारित आहे.

===

हे ही वाचाअंगावर काटा आणणारी चित्तथरारक कहाणी : एअर इंडिया “IC 814” विमान अपहरण…

===

माफिया क्वीन ऑफ मुंबई

 

 

पुरुष गँगस्टर मंडळी जवळपास सगळ्यांनाच माहीत आहेत. पण त्यांच्या बरोबरीनेच महिला गँगस्टर सुध्दा होत्या.

कामाठीपुराच्या गल्ल्या या आपला अड्डा बनवून त्यांनी कसं मुंबईत आपलं साम्राज्य निर्माण केलं त्याबद्दल यात आपल्याला माहिती मिळते.

आलिया भटचा येणारा गंगुबाई काठीयावाडी हा चित्रपट या पुस्तकावर आधारित आहे.

 

डोंगरी टू दुबई – सिक्स डिकेड्स ऑफ मुंबई माफिया

 

 

दाऊद इब्राहिमच्या आयुष्यवर लिहिलेलं हे पुस्तक सगळ्यात जास्त प्रसिद्ध झालं! दाऊदच्या भोवती फिरणाऱ्या या पुस्तकात हाजी मस्तान, करीम लाला, वरदा राजन, माया डोळस, मन्या सुर्वे या गँगस्टरचा उदय आणि अस्त यावर प्रकाश पाडला आहे.

शूट आऊट अॅट लोखंडवाला, शूट आऊट अॅट वडाळा हे फिल्म या पुस्तकावर आधारित आहेत.

माय नेम इज अबू सालेम

मुंबईत असलेल्या गँगस्टर लोकांमध्ये रंगीन जीवन जगलेला एकमेव गँगस्टर. गुलशन कुमार यांच्या सुपारीमुळे अख्या अंडरवर्ल्ड मध्ये सालेम प्रसिद्ध झाला.

माय नेम इज अबू सालेममध्ये याच सालेमची कहाणी आहे. जन्मापासून ते पोर्तुगाल मध्ये अटक होईपर्यंत!

मुंबई अवेंजर्स

 

 

मुंबईला गॅंगवॉर मधून बाहेर काढणाऱ्या शूरवीर पोलीस अधिकारी यांच्यावर असलेलं हे पुस्तक गॅंगवॉर कसं संपलं, त्यात पोलीस राजकारणी यांचा काय रोल होता यावर प्रकाश पडतो.

सैफ अली खान याचा फॅंटम याच पुस्तकावर आधारित आहे.

तर, याच हुसेन झैदी यांनी एका मुलाखती मध्ये सांगितलं की एकदा इराक मध्ये त्यांच अपहरण झालं होतं आणि अमिताभ बच्चन यांच्या मुळे त्यांची सुटका झाली होती.

 

 

या घटनेला विस्तृतपणे सांगताना झैदी सांगतात,

सद्दाम हुसेन ला अमेरिकन फौजांनी उचलले तेव्हा त्यांच्यातला शोध पत्रकार जागा झाला आणि ते तडक सुदान आणि इराक च्या दौऱ्यावर निघाले.

इराकची राजधानी बगदाद मध्ये अशीच सद्दाम हुसेन बद्दल माहिती गोळा करत असताना त्यांच्या मागे एक अनोळखी व्यक्ती एके ४७ ताणून उभा राहिला.

काय होत आहे हे समजायच्या आत त्यांना गाडीत बसवून त्यांचं तोंड झाकलं गेलं आणि गाडी एका अज्ञात स्थळी जाऊन थांबली.

जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं कापड काढलं तेव्हा त्यांच्या समोर काही माणसं बंदुका घेऊन उभे होते. त्यापैकी एकाने त्यांना पाकिस्तानी असल्याचे विचारले, आपण पाकिस्तानी नसून हिंदी भाषिक भारतीय असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीने त्यांना ‘अमिशा बक्कन’ ला ओळखतो का विचारले. त्यावेळेस आमिषा पटेल बॉलिवूड मध्ये नावाजलेली आणि आघाडीची अभिनेत्री होती. तिच्या बद्दल विचारत असेल म्हणून त्यांनी आमिषा पटेलला ओळखतो बोलले.

शेवटी रागावून ती व्यक्ती आतल्या खोलीत गेली आणि एक पोस्टरचं कट औय घेऊन आली. १९८२ च्या ‘शक्ती’ फिल्मचं ते पोस्टर होतं. ज्यात लीड रोल मध्ये अमिताभ बच्चन होते.

 

 

अमिताभला पाहून मी हसून अमिताभ बच्चन बोललो तसं समोरची ती व्यक्ती पण आनंदी झाली. अनायसे असेल पण त्यांना मी अमिताभ बच्चन यांचा मित्र वाटलो.

त्याने मला एक नोट लिहून दिली की, जर कधी तो मुंबईला आला तर त्याची आईची अमिताभ बच्चन यांच्याशी भेट मी घडवून आणेन.

टांगणीला लागलेला जीव सोडवण्यासाठी मी तात्काळ हो बोललो आणि तडक तिथून निघून भारत गाठलं. तर असे हे हुसेन झैदी मरणाच्या दारातून सुखरूप परतले.

त्यांच्यामुळेच आज अंडरवर्ल्ड मध्ये नेमकं काय व्हायचं आणि मुंबई अंडरवर्ल्डच्या कचाट्यातून कशी बाहेर पडली हे संबंध भारतीयांना समजलं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version