' ‘हिंदूद्वेष्ट्या’ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील हे ‘तांडव’ वेळीच थांबायला हवं नाहीतर… – InMarathi

‘हिंदूद्वेष्ट्या’ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील हे ‘तांडव’ वेळीच थांबायला हवं नाहीतर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

“विनाशकाले विपरीत बुद्धी” ही गोष्ट सध्याच्या फिल्ममेकर्स आणि वेबसिरिज मेकर्सच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडते! कारण सध्या ज्या प्रकारचा कंटेंट ऑनलाइन रिलीज होत आहे तो पाहता भारतीय ऑनलाइन कंटेंटवर सेन्सॉरची कात्री लागायला वेळ लागणार नाही अशी शक्यता नाकारता येणार नाही!

याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे ‘तांडव’ ही amazon prime या प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली वेबसिरिज. १५ जानेवारीला ही सिरिज ऑनलाइन रिलीज केली गेली.

 

tandav 2 inmarathi

 

सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोवर, कुमुद मिश्रा अशी तगडी स्टारकास्ट आणि अली अब्बास जफर दिग्दर्शित ही सिरिज नेटफ्लिक्सच्या हाऊस ऑफ कार्ड्स सिरिजची कॉपी आहे अशीही चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे!

कथा, पटकथा, सादरीकरण सगळ्याच बाबतीत फोल ठरलेली ही सिरिज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सिरिज मध्ये एक सीन आहे, ज्यात एका थिएटरमध्ये कॉलेजचे विद्यार्थी नाटक करत आहेत.

सिरिजमधलं एक प्रमुख पात्र या नाटकात भगवान शंकराची भूमिका साकारताना दाखवलं आहे. आणि त्या सीनमध्ये शंकराच्या तोंडी विचित्र शिव्या आणि काही आक्षेपार्ह सीन्समुळे ही सिरिज चर्चेत आली आहे!

यामुळेच Ministry Of Information & Broadcasting या डिपार्टमेंटचे मिनिस्टर प्रकाश जावडेकर यांनी सिरिजच्या मेकर्सकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले आणि मग सगळीकडेच या सिरिजविषयी, खासकरून त्या सीनविषयी बोललं जाऊ लागलं!

 

tandav scene inmarathi

 

या सगळ्या प्रकरणानंतर सिरिजच्या मेकर्सनी नुकतंच “सिरिजमध्ये आवश्यक ते बदल करू” या स्वरुपाचं औपचारिक स्टेटमेंट सुद्धा सोशल मीडियावर जाहीर केलं!

सोशल मीडिया तसेच कित्येक मीडिया प्लॅटफॉर्मन्सनी हा मुद्दा उचलून धरला, याबाबतीत बरीच चर्चा व्हायला सुरुवात झाली, त्यामुळेच कदाचित एवढ्या लवकर रिजल्ट्स आपल्याला पाहायला मिळाले!

पण आपण आज या लेखातून या सगळ्या प्रकरणामागची मानसिकता जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. कशाप्रकारे फिल्ममेकर्स लोकांना गृहीत धरून त्यांची आयडियोलॉजी आपल्यावर थोपवतात आणि त्यात ते कसे यशस्वी होतात या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत!

२०१८ साली रिलीज झालेला “पद्मावत” सिनेमा आठवतोय? त्या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान झालेले वाद, शिवाय त्यातल्या काही सीन्सवर घेतलेला आक्षेप किंवा त्याच्या नावावरून झालेला गोंधळ हे सगळं आपल्याला आठवत असेलच!

पद्मावत सिनेमात आक्षेपार्ह असं काहीच नसलं तरी त्यामुळे निर्माण झालेल्या कॉंट्रोवर्सीमुळे सिनेमाला चांगलाच फायदा झाला.

 

padmavat inmarathi

 

आमीर खान आणि राजकुमार हिरानी यांच्या पीके सिनेमाच्या वेळेसही असेच वाद निर्माण झाले. मंदिर, मशीद आणि चर्च मधल्या काही सीन्समुळे आणि त्या सिनेमातही भगवान शंकर यांचीच खिल्ली उडवल्याने फिल्ममेकर्सना लोकांचा रोष पत्कारावा लागला होता!

‘ओह माय गॉड’ सारख्या लोकप्रिय सिनेमात सुद्धा लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने त्यावर टीका झाली!

हे झालं फिल्म्सबाबत, पण सध्या कित्येक ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन हा असला प्रोपगांडा सर्रास पसरवला जातोय! सेक्रेड गेम्स, पाताल लोक, द फॅमिलीमॅन अशा कित्येक ऑनलाइन सिरिजमधून सध्या सर्रास ही गोष्ट होताना दिसत आहे!

या अशा कंटेंट मधून जातीयवाद, द्वेष, हिंदू देवी देवतांचं बीभत्स चित्रण, हिंदू लोकांना टार्गेट करणं, हिंदू लोकांना असहिष्णु दाखवणं, आतंकवादाला जस्टीफाय करणं, रामायण महाभारत या महाकाव्यांचे चुकीचे संदर्भ देणं हे सगळं राजरोसपणे दाखवलं जात आहे!

 

web series inmarathi

 

पण वारंवार अशाच प्रकरचा कंटेंट दाखवून ही कलाकार मंडळी नेमकं काय सिद्ध करू पाहतायत? देवच जाणे! पण लोकं सुद्धा आता स्मार्ट झाले आहेत, लोकांना सुद्धा आता या अशा कंटेंटचा तिटकारा यायला लागला आहे.

जेंव्हा ओटीटी प्लॅटफॉर्म नवीन होते, तेंव्हा या सगळ्या गोष्टी चालून गेल्या पण आता वारंवार तीच आयडियोलॉजी प्रत्येक कलाकृतीत दिसायला लागल्याने लोकं सुद्धा अशा कलाकृतीवर टीका करायला लागले आहेत!

खासकरून हिंदू समाज आणि हिंदू श्रद्धास्थान यांच्याविषयी हे चित्रण बहुतेक करून प्रत्येक कलाकृतींमधून तुम्हाला पाहायला मिळेल!

सिनेमातला व्हिलन हा खूप कर्मठ आणि तिलकधारी दाखवणे, मुस्लिम लोकांच्याविषयी त्याच्या मनात अढी असणे अशा अतिशय स्टीरियोटाइप साच्यात एखाद्या व्हिलनला सादर करणे. शिवाय रामायण महाभारत यातले बरेच चुकीचे संदर्भ चुकीच्या पद्धतीने वापरणे. “अहम ब्रह्मासी” याचा चुकीचा अर्थ लोकांसमोर मांडणे. देवी देवतांविषयी अतिशय चुकीच्या शब्दात भाष्य करणे हे सगळंच आता कुठेतरी थांबायला हवं!

 

shankar inmarathi

 

संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीवर डाव्या विचारसरणीचा खूप प्रभाव आहे हे आपण पदोपदी अनुभवलं आहे, त्यामुळे हा असा प्रकार आपल्यासाठी काही नवीन नाही.

हैदर, न्यूटन, किंवा राजी सारख्या सिनेमातून नक्षली लोकांना क्रांतिकारी दाखवणं, पाकिस्तानसारख्या देशाची सकारात्मक भुमिका मांडणं आणि उरी किंवा परमाणु सारख्या सिनेमाला Hyper toxic nation म्हणून हिणवणं हे आपण अनुभवलं आहेच!

पण आता कुठेतरी या सगळ्या गोष्टी थांबायला हव्यात. ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ या गोंडस नावाखाली स्वतःची आयडियोलॉजी लोकांच्या माथी मारणं थांबायला हवं!

यासाठी तुमच्या आमच्या सारख्या प्रेक्षकांनी स्टँड घेणं खूप गरजेचं आहे! खासकरून आपण हिंदू लोकांनी या सगळ्या विरोधात उघडपणे भाष्य करायला हवं.

जी लोकं आपल्या संस्कृतीच्या मुळांवर आघात करत आहेत त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यायलाच हवं. हिंदू समाज हा सहिष्णू आहेच पण आपल्या या शांततेचा कुणी गैरफायदा घेता कामा नये!

अभिव्यक्तिच्या नावाखाली चाललेल्या या स्वैराचाराला कुठेतरी आळा घालायलाच हवा!

या सगळ्यावर ‘बॅन’ किंवा ‘बॉयकॉट’ हा ऑप्शन अजिबात नाही. उलट अशा कलाकृती बायकॉट करून आपण त्या कलाकारांच्या कृतीला आणि आयडियोलॉजीला खतपाणी घालत आहोत!

 

boycott inmarathi

 

तांडव असो किंवा सेक्रेड गेम्स अशा कलाकृतींना आणि त्यात दाखवलेल्या आक्षेपहार्य दृश्यांना आपण सभ्य आणि सांविधानिक भाषेत विरोध दर्शवायला हवा, आणि त्यांचं म्हणणं खोडून काढायला हवं!

नाहीतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर भविष्यातसुद्धा असाच कंटेंट येत राहिला तर या प्लॅटफॉर्मवर सुद्धा सेन्सॉरची कात्री चालायला वेळ लागणार नाही. आणि यात सर्वात मोठे नुकसान आहे ते म्हणजे कलाकारांचे आणि प्रेक्षकांचेसुद्धा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?