' जेवणाला चव आणणाऱ्या मिठाचेसुद्धा प्रकार असतात बरं का! हे बघा आठ प्रकार! – InMarathi

जेवणाला चव आणणाऱ्या मिठाचेसुद्धा प्रकार असतात बरं का! हे बघा आठ प्रकार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

खाद्य पदार्थाची चव वाढविण्याचं काम मीठ करतं. मात्र तुम्हाला महित आहे का? मिठाचेही अनेक प्रकार असतात आणि विविध पदार्थात त्या त्या गरजेनुसार वापरले जातात.

आयुर्वेदात मिठाचे, शेंदेलोण (सैंधव), पादेलोण, बिडलवण, सांबरलोण आणि दर्याई असे पाच प्रकार सांगितले आहेत. श्रीकृष्ण, रुक्मिणी आणि सत्यभामेची गोष्ट तुम्हाला माहित असेलच.

एकदा श्रीकृष्णाला रूक्मिणीनं विचारलं की मी आणि सत्यभामा यात आपली लाडकी कोण? यावर श्रीकृष्ण उत्तरलेच “तू मीठासारखी लाडकी” या उत्तरावर रुक्मिणी रुसली!

आणि तिचा रुसवा कढण्यासाठी, तिला मिठाचं महत्व समजावण्यासाठी श्रीकृष्णानं स्वयंपाकात मीठ न वापरण्याचा सुचना केल्या ते अळणी जेवण जेवल्यावर चिमुटभर मीठाचं महत्व रूक्मिणीला कळलं आणि ती खुष झाली.

असं म्हणलं जातं की स्वयंपाक जर चारजणी मिळून करत असतील तर त्यातली जी शेवटी मीठ घालेल स्वयंपाक तिचा, कौतुक तिचं. कारण चिमुटभर मीठ जरा कमी झालं तर पदार्थ सपक बनेल आणि जास्त झालं तर चवच बिघडेल.

 

salt inmarathi

 

जगभरातल्या स्वयंपाकघरातला महत्वाचा पदार्थ म्हणजे, मीठ. प्रत्येक तिखट पदार्थात मीठ अत्यावश्यक आहे. सोडियम या खनिजाचा उत्तम स्त्रोत असणारं मीठ रोजच्या खाण्यात चिमुटभर असलंच पाहिजे.

मिठ हे एक प्रकारचं क्षार आहे. जेवण मीठाशिवाय असण्याची आपण कल्पनाही करु शकत नाही.

मात्र अनेक जणांना माहित नाही की या मीठाचेही अनेक प्रकार आहेत आणि विविध रेसपिजमधे ते गरजेनुसार वापरले जातात. मुळात मीठ ही एक generic term आहे. जी सर्वच प्रकारच्या मीठासाठी वापरली जाते.

मॉलमधे जी मीठं मिळतात त्यावर ही नावं वाचून अनेकांना प्रश्न पडतो की, या मिठात आणि त्या मिठात नेमका काय फ़रक आहे? मीठ तर मीठच असतं. सगळ्याच मिठाची चव खारटच असेल तर हे वापरलं काय आणि ते वापरलं काय?

पदार्थाच्या चवीत असा काय फरक पडणार आहे? यासाठी आज आपण मिठचे प्रकार आणि त्याचा वापर कसा करतात ते बघू!

 

१. टेबल सॉल्ट –

 

table salt inmarathi

 

रोजच्या वापरातलं जे असतं, म्हणजे आपण पदार्थांत घालतो ते किंवा ताटात वरून घेतो ते हे मिठ, याला टेबल सॉल्ट म्हणून ओळखलं जातं. जमिनीखाली साठलेल्या मिठाच्या थरावर प्रक्रिया करून वापरायोग्य असं मिठ बनवलं जातं.

हे मिठ बनविण्याच्या प्रक्रियेत यामधे anti-caking घटक मिसळले जातात. जेणेकरून मिठात गुठळ्या होणार नाहीत.

हे मीठ इतकं फाईन असतं की हवेतल्या ओलाव्यानंही याला पाणी सुटत नाही. फ्री फ्लोइंग असं हे मिठ म्हणूनच लोकप्रिय आहे. विशेषत: हॉटेल्समधे हे मीठ मोठ्या प्रमाणात वापरलं जातं.

 

२. सी सॉल्ट –

 

sea salt inmarathi

 

मिठागरांत खारट पाणी साठवून त्याची वाफ केली जाते. खाली पाण्यातलं मीठ सुटं होऊन उरतं. नंतर त्यावर थोडीफार प्रक्रिया करुन वापरण्यायोग्य असं मीठ बनवलं जातं.

सहसा हे मीठ रिफाईन केलेलं नसतं. यामुळे यात काही खनिजं काही प्रमाणात आढळतात. जसे की, झिंक, पोटॅशियम किंवा आयर्न.

मिठाचं पोषणमूल्य यामुळे वाढतं तसेच याची चवही टेबल सॉल्टपेक्षा थोडी वेगळी असते. हे खरखरीत स्वरूपात असतं. ज्याला आपण खडे मिठ म्हणतो ते सी सॉल्ट असतं.

 

३. कोशेर सॉल्ट –

 

kosher salt inmarathi

 

हे मिठ चव आणि टेक्स्चरचा विचार करता सी सॉल्ट प्रमाणेच असतं. मात्र हे थोडं जाड असतं. हे पाण्यात लगेचच विरघळतं त्यामुळे कुकिंगसाठी योग्य मानलं जातं. याची चव पदार्थाला आणखीन बहरदार बनवते. विशेषत: मांसाहारी पदार्थांत हे मिठ वापरलं जातं.

 

४. अयोडाईज्ड सॉल्ट –

 

iodized salt inmarathi

 

जगभरात आयोडिनची कमतरता हा चिंतेचा विषय आहे. आयोडिन हे फार मोजक्या पदार्थातून मिळतं त्यामुळे त्याचे स्त्रोतही मर्यादित आहेत.

केस गळणे, कमालिचा थकवा इत्यादी लक्षणं आयोडिनच्या कमतरतेमुळे आढळतात. यावर उपाय म्हणून आयोडाईज्ड मिठं बनविण्यात येऊ लागली.

नेहमीच्या टेबल सॉल्टमधेच आयोडिन मिसळून त्याला आयोडाईज्ड मिठ बनविलं जातं. शरिराच्या थायरॉइड ग्रंथींच्या कार्यासाठी आयोडिन म्हत्वाचा घटक असतो. यात बिघाड झाला की ही ग्रंथी सुजते.

 

५. ब्लॅक सॉल्ट –

 

black salt inmarathi

 

तुम्ही पाहिलं असेल तर अलिकडे दुकांनामधे एक गुलाबी रंगाचं मीठ विक्रिसाठी असतं. अनेकांना प्रश्न पडतो की हे मीठ वापरावं की नाही? हिमालयन मिठ हे बरण्यांमधे साठवलं जातं.

त्यात कोळसा, झाडाची साल, बिया आणि हर्बस घालून भट्टीत भाजलं जातं. हिमालयन सॉल्ट प्रमाणेच हे देखिल शुध्द असतं आणि आपल्याला आवश्यक ती सर्व खनिजं देतं.

याला एक प्रकारचा स्मोकी वास आणि चव असते. काळपट लाल रंगाचं हे मीठ साधारण हलकंसं अंड्याच्या चविचं असतं.

 

६. हिमालयिन सॉल्ट –

 

himalayan salt inmarathi

 

हा मिठाचा सर्वात शुध्द प्रकार मानला जातो. याच्या नावातच जसं सुचवलं आहे तसं ते हिमालयाच्या पोटात दडलेल्या खाणींमधून काढलं जातं. खेवरा मिठाच्या खाणी, ज्या हिमालयाच्या पाकिस्तानी भागात सर्वदूर पसरलेल्या आहेत तिथे हे मीठ मिळतं.

हे मीठ केवळ स्वयंपाकासाठीच वापरलं जातं असं नाही तर सौंदर्य पसाधनातही याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. स्पा मध्ये त्वचेवर ट्रिटमेंट साठी मोठ्या प्रमाणात या मिठाचा वापर होतो.

याचा रंग याचं वेगळेपण आहे. याच्या रंगामुळेही स्पा ट्रिटमेंटमधे ते मोठ्या प्रमाणात वापरलं जातं.

या मिठात एक दोन नाही तर ८४ प्रकारची खनिजं आढळतात त्यामुळे याची चवही थोडी उग्र असते मात्र मीठ वर्गात याचा क्रमांक अव्वल आहे.

 

७. सेल्टिक सॉल्ट –

 

celtic salt inmarathi

 

हे समुद्राच्या पाण्यापासून बनविण्यात येतं. फ्रान्सच्या समुद्र किनार्‍यांवर मुख्यत्वे बनतं. यात समुद्राच्या पाण्याचा अंश असल्यानं हे हाताला ओलसर लागतं.

एरवी मिठ ओलसर होऊ नये म्हणून उपाय केले जातात मात्र हे मिठ ओलसर असेल तरच ऑथेण्टिक समजलं जातं. समुद्री पाण्यात खनिजं मोठ्या प्रमाणात असल्यानं या मिठाला मिनरल रिच समजलं जातं.

इतर मिठांच्या तुलनेत याच्यात सोडियमचं प्रमाण मात्र कमी असतं. या मिठाचा रंग करडा असतो.

 

८. रॉक सॉल्ट –

 

rock salt inmarathi

 

हिमालयिन सॉल्टचाच हा प्रकार आहे. मिठाचे खडक असतात त्यापासून हे मीठ बनतं म्हणून याला रॉक सॉल्ट किंवा मराठीत शेंदेलोण म्हणतात. यालाच सैंधव म्हणूनही ओळखलं जातं. उपवासासाठी हे मीठ वापरण्याची पध्दत आहे.

याचाच दुसरा प्रकार म्हणजे, पादेलोण. यालाच सौवर्चल किंवा संचळ मीठ म्हणूनही ओळखलं जातं. याचेही खडे असतात आणि रंग गुलाबी असतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?