' ज्या नावावरून इतका गदारोळ सुरू आहे ते ‘औरंगाबाद’ नाव कसं पडलं ? वाचा! – InMarathi

ज्या नावावरून इतका गदारोळ सुरू आहे ते ‘औरंगाबाद’ नाव कसं पडलं ? वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाविकास आघाडीचं भविष्य धोक्यात असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनेकवर्ष भिजत पडलेल्या औरंगाबादच्या नामकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

“नाम मे क्या रखा है?” – शेक्सपियर यांनी लिहिलेल्या ओळीचा हा अनुवाद आपण कित्येक वेळेस ऐकत असतो. प्रत्येक व्यक्ती, जागा, शहर, देश यांचं आणि त्यांना मिळालेल्या नावाचं आपण कुठे तरी साधर्म्य शोधत असतो.

 

whats in name inmarathi

 

इंग्रजीत अजून एक वाक्य लोकप्रिय आहे ज्याचा अर्थ हा आहे की, “कोणत्याही पुस्तकाच्या कव्हर वरून पुस्तकाचा अंदाज घेऊ नका किंवा ते असंच असावं हा अट्टहास धरू नका.” पण, आपण असं करत नाही.

आपण तर ट्रेलर वरूनच सिनेमाचा अंदाज बांधतो, त्याचं भवितव्य सांगतो. एखादा संबंध जोडतो आणि या सिनेमाचं हे नाव असलं असतं किंवा नसलं असतं तर तो चालला असता असंही कित्येक वेळेस म्हणतो.

हे तर झालं सिनेमाचं वगैरे जे की आता तयार झाले आहेत.

आपण शहरांच्या नावाबद्दल सुद्धा आग्रही असतो. काही वेळेस तो आग्रह योग्य असतो. पण, ती मागणी शांततेत प्रस्तुत व्हावी अशी सामान्य माणसाची माफक अपेक्षा असते.

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या आपल्या भारत देशात जसजसे राज्य, शहर यांची सीमा आखण्यात येऊ लागली तसे त्यांना नावं मिळू लागली.

भारत स्वतंत्र होईपर्यंत तिथल्या स्थानिक राजांनी ही नावं त्या शहरांना दिली गेली. सध्याचा काळ लक्षात घेतला तर नावाबद्दल हे प्रमाण आहे की, जो निर्माण करेल किंवा जन्म देईल तो नाव देईल.

इतरांना नाव देण्याचा किंवा ‘नावं ठेवण्याचा’ कोणताही अधिकार नसतो. पण, लोकशाही मध्ये असं होत नसतं. तिथे, प्रत्येकाला आपलं मत प्रदर्शित करण्याचा एक अधिकार असतो.

मधल्या काही वर्षात शहरांच्या नावावरून आपल्याकडे तीन मतप्रवाह बघायला मिळाले. एक ते लोक ज्यांना शहरांची नावं समर्पक असावीत असं वाटतं.

 

prayagraj inmarathi

 

दुसरे ते ज्यांना एकदा ठरलेल्या नावात बदल होऊ नये असं वाटत असतं आणि तिसरे ते ज्यांना एक तर काहीच माहीत नसतं किंवा जाणून घेणं गरजेचं वाटत नाही.

काही जणांना बॉम्बेचं नाव मुंबई व्हावं हे वाटत असतं. पण, इतर शहरांच्या नावाबद्दल त्यांचं काही मत नसतं. उस्मानाबादचं नाव ते का? निझामाबाद हे नाव का बदललं नसावं? याबद्दल आपण अनभिज्ञ असतो.

सरकारने एकदाच भारतातील सर्व प्रमुख शहरांची नावं बदलून घ्यावीत आणि मग फक्त त्यांच्या विकासाकडे लक्ष द्यावं असा विचार आपल्याला सुद्धा नक्कीच आला असेल.

राज्य सरकारच्या एका परिपत्रकात औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा केल्याने पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला होते. या मुद्द्यावरून औरंगाबादचे खासदार इम्तियाझ जलील यांनी खडे बोल सुनावले होते.

ज्या अधिकाऱ्यांनी परिपत्रकात हा बदल केला आहे, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीदेखील त्यांनी केली होती.

याआधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर हॅण्डलवरून पोस्ट केलेल्या एका बॅनरमध्ये औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा करण्यात आला होता. तेव्हाही या नावावरून गदारोळ मजला होता.

बातम्यांमध्ये चर्चा सुरू असतात महाराष्ट्रातील ‘औरंगाबाद’ च्या नावामागची पार्श्वभूमी काय आहे?

औरंगाबाद की संभाजीनगर? या प्रश्नामुळे मराठवाड्याच्या राजधानीचं शहर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. काही वर्षांपूर्वी हे शहर चर्चेत होतं ते आशियातील सर्वात जास्त गतीने प्रगती करणारं शहर म्हणून.

 

aurangabad inmarathi

 

औरंगाबाद शहराची जी औद्योगिक प्रगती झाली आहे ती कौतुकास्पद आहे.

पण, जायकवाडी सारखं आशियातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेलं धरण ज्या शहराच्या लगत आहे तिथे आजही लोकांना ५ दिवसातून एकदा पाणी मिळतं आणि त्यावरून कधीच कोणत्या सदनात चर्चा होत नाही हे त्या शहराचं दुर्दैव आहे.

लोकांनी कितीही पुढाकार घेतला तरीही कोणत्याही शहराचा विकास होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती सुद्धा तितकीच महत्वाची असते. मधल्या काही वर्षात औरंगाबाद मध्ये या गोष्टीची कमतरता प्रकर्षाने जाणवली.

एका विशिष्ठ ठिकाणी पोहोचून औरंगाबादच्या प्रगतीला ब्रेक लागण्याचं हे एक कारण म्हणता येईल.

कधी औद्योगिक प्रगती तरी कधी पर्यटन वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न असा सतत फोकस बदलत गेलेल्या या शहराला पश्चिम महाराष्ट्रातील शहरांसारखे रस्ते कधी मिळाले नाहीत. पण, या विषयावर नेहमीच मौन साधलं गेलं.

अजिंठा-वेरूळ सारखे वर्ल्ड हेरिटेज मधील ठिकाण असलेल्या या शहरातील तरुणांना औरंगाबाद मधील मोजक्याच क्षेत्रातील नोकरीच्या संधी असल्याने पुणे, मुंबई सारखी शहर गाठावी लागली.

 

ajintha verul leni inmarathi

 

आज हे शहर चर्चेत आलं आहे ते फक्त त्याच्या नावामुळे. कुठून आलं हे नाव?

औरंगजेबच्या नावावरून पडलेलं ‘औरंग+आबाद’ म्हणजेच संपन्न, राहण्या योग्य हा अर्थ असलेल्या या शहराची स्थापना १६१० मध्ये झाल्याची नोंद आहे.

प्राचीन बुद्धिस्ट लेण्या असलेल्या या शहरात बौद्ध धर्माची शिकवण देणारे कित्येक धर्मगुरू आजही आहेत. मलिक अंबर या मंत्र्याने ‘खडकी’ हे या जागेला नाव दिलं होतं.

१६२६ मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान याने ‘फतेहनगर’ हे नाव या शहराला दिलं होतं.

एक काळ असा होता की, मुहम्मद बिन तुघलक हा औरंगाबादची भौगोलिक रचना बघून दिल्लीची राजधानी फतेहनगरला हलवणार होता. त्या काळात भारताच्या मध्यवर्ती असलेलं औरंगाबाद हे अफगाण च्या सैन्यापासून वाचण्यासाठी सुरक्षित ठिकाण होतं.

दिल्ली ही राजधानी न ठेवता औरंगाबाद हे राजधानीचं शहर असावं हा निर्णय मुहम्मद बिन तुघलक याने मागे घ्यायला लावला आणि दिल्ली हे शहरच मुघल साम्राज्याची राजधानी असेल हे ठरवण्यात आलं.

१६३४ मध्ये औरंगजेबने दक्षिणेकडे स्वारी केली आणि मुघल साम्राज्याचा विस्तार केला. त्या आधी खडकी हे शहर अहमदनगर सल्तनत मध्ये राजधानीचं शहर म्हणून मान्यता होती.

 

aurangzeb inmarathi

 

अहमदनगर सल्तनतचा सांभाळ करण्यासाठी मलिक अंबर या एथोपीयन सैन्यातील अधिकाऱ्याला पाचारण करण्यात आलं.

औरंगजेब हा त्या काळात दक्षिण भारतातील मुघल साम्राज्याचा व्हॉईसरॉय होता. १६५३ मध्ये हे शहर अहमदनगर सल्तनत कडून जिंकून त्याला मुघल साम्राज्याची दक्षिणेकडची राजधानी म्हणून घोषित केलं.

औरंगजेब या शाह जहानच्या या तिसऱ्या मुलाने १६५३ मध्ये या फतेहनगरचं नाव बदलून ‘औरंगाबाद’ हे नाव ठेवलं आणि ते आणि ते आज ३५० वर्षांनी सुद्धा कायम आहे.

१७०७ मध्ये औरंगजेब च्या मृत्यू नंतर निजाम असफ जाह यांनी मुघल साम्राज्याची धुरा सांभाळली आणि त्यांनी ‘असफ जाही’ या नावाने मुघल साम्राज्याचं नाव बदललं.

हैद्राबाद हे राज्य आणि औरंगाबाद ही त्याची राजधानी असं स्वरूप निजाम असफ शाहने ठेवलं होतं. १७६३ मध्ये राजधानीचं शहर बदलून हैद्राबाद हे शहर राजधानीचं शहर करण्यात आलं.

त्यानंतर १९४८ पर्यंत हैद्राबाद हे एक राजेशाही राज्य म्हणून ब्रिटिश राज मध्ये सुद्धा ओळखलं जायचं. औरंगाबाद हे १९५६ पर्यंत निझामच्या हैद्राबाद राज्याचा भाग होतं.

 

hyderabad inmarathi

 

१९६० मध्ये निझाम कडून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर औरंगाबाद हे शहर महाराष्ट्रातील शहर आणि मराठवाड्याची राजधानी म्हणून नावारूपास आलं.

‘संभाजीनगर’ हे नाव का असावं? किंवा औरंगाबाद हे नाव का असू नये?

ही कोणतीही धार्मिक किंवा भावनिक मागणी नसून ज्या औरंगजेबने संभाजी राजेंना कैद केलं होतं. त्याचं नाव आजही महाराष्ट्रात का घेतलं जावं? या विचाराने ही मागणी होत आहे.

मुघल साम्राज्याच्या विस्तारासाठी काहीही करायची तयारी असलेला औरंगजेब हा एका बाजूने तर प्रगतीला प्राधान्य देणारा धार्मिक मनुष्य होता. त्याने बांधलेल्या मस्जिद या जनतेच्या पैशातून नाही तर स्वलिखित कुराणच्या कॉपी विकून बांधल्या होत्या अशी नोंद आहे.

पण, याच औरंगजेबच्या कार्यकाळात कित्येक हिंदू मंदिरं उध्वस्त करण्यात येऊ लागली. ‘जिझिया कर’ लागू करण्यात आला, मुस्लिम धर्मात मान्यता नसलेल्या जुगार, दारूला मान्यता देण्यात आली.

१६८७ मध्ये झालेल्या वाई च्या लढाई नंतर औरंगजेबने मोठ्या प्रमाणात मराठा सैन्याला त्रासून सोडलं होतं. सेनापती हंबीरराव मोहिते यांचा खून झाला होता.

संभाजी राजेंचा बचाव करण्यासाठी शिर्के परिवाराने पुढाकार घेतला होता. पण, औरंगजेबच्या सैन्यातील मुबारक खान याने संभाजी राजेंना त्यांच्या २५ सैनिकांसोबत अटक केली होती.

संभाजी राजे यांना बहादुरगड (सध्याचं नगर) इथे नेण्यात आलं आणि त्यांना शरणागती पत्करण्यास, मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी औरंगजेबकडून खूप यातना दिल्या गेल्या.

 

sambhaji maharaj inmarathi

 

पण, संभाजी राजेंनी औरंगजेबच्या कोणत्याही मागणीला भीक घातली नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करत राहिले. याच कारणामुळे संभाजी राजेंना ‘धर्मवीर’ ही उपाधी देण्यात आली.

संभाजी राजेंनी मराठा सैन्य आणि मुघल साम्राज्य यांच्यातील संघर्षाचं नेतृत्व केलं होतं. मुघलांसोबतच सिद्धी, पोर्तुगीज यांच्याकडून सुद्धा संभाजी राजेंना कायमच संघर्ष करावा लागायचा.

पण, ज्या पद्धतीने औरंगजेब ने संभाजी राजेंना कैद करून छळ केला आणि त्यांचे डोळे, जीभ, नखं काढून त्यांना वाघ नखाने मारण्याची शिक्षा दिली.

११ मार्च १६८९ रोजी संभाजी राजेंना पुण्या जवळील तुळापूर येथे भीमा नदीच्या काठावर मारून टाकण्याचं क्रूर कृत्य औरंगजेबने केलं. अशी वागणूक इतिहासात कोणत्याच राज्यकर्त्याने कोणालाही दिली नव्हती.

अश्या राजाचं नाव स्वतंत्र भारतातील कोणत्याही शहराला असणं हे योग्य नाही अशी रास्त मागणी लोकांची आहे. हा इतिहास ज्यांना माहीत आहे ते या मागणीचा विरोध करणार नाहीत हे नक्की.

पण, इतक्या वर्षांनी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे कोणताही पक्ष पुढे येऊन औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर हे करण्याचं धाडस करत नाहीये हे आपलं दुर्दैव आहे.

 

sambhaji nagar inmarathi

 

 

औरंगाबाद आणि तत्सम नावांच्या शहराचा इतिहासाचा लवकरच अभ्यास व्हावा आणि प्रत्येक शहराला तिथल्या लोकांना प्रेरणा देणारं नाव मिळावं अशी आशा करूयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?