Site icon InMarathi

२०२० – अजिबात चुकवू नयेत अशा, सर्वश्रेष्ठ भारतीय १० वेब सिरिज!

web inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लॉकडाऊनमुळे लोकं डिजिटल माध्यमांकडे वळली आणि त्याची जणू त्यांना सवयच लागली. सध्या गेले महिनाभर थेटर्स चालू झाली आहेत तरीही लोकं थेटर्सकडे वळताना तुम्हाक क्वचितच दिसतील. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे घरबसल्या मिळणारा दर्जेदार कंटेंट.

मोबाईलच्या एका क्लिक वर कित्येक डिजिटल प्लॅटफॉर्म जगभरातील दमदार कन्टेन्ट तुमच्यासमोर घेऊन आले.

प्रथम नेटफ्लिक्स नंतर प्राईम व्हिडियो, हॉटस्टार झी ५, सोनी लिव्ह, वूट अशा विविध प्लॅटफॉर्मनी रांग लावली आणि इंडस्ट्रीमधले सुद्धा बरेच लोकं या माध्यमाकडे वळू लागले. वेब सिरीज, ओरिजिनल शो, सिनेमे हे लोकांच्या अंगवळणी पडलं.

 

 

ही गोष्ट किती चांगली किंवा किती वाईट हे सांगता येणं जरा कठीण आहे पण, या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे थेटर्सना फार मोठं नुकसान होत आहेत. थेटर्स बंद असल्याने बरेचसे सिनेमे हे डिजिटल माध्यमावर रिलीज केले गेले आणि लोकांनी ते सिनेमे अगदी नापसंत केले.

सडक २ पासून ते थेट लक्ष्मी बॉम्ब पर्यंत अशा बऱ्याचशा मोठ्या स्टार्सच्या सिनेमांना लोकांनी नाकारले. आपला विरोध त्यांनी थेट दर्शवला.

बॉलिवूडमधलं ड्रग रॅकेट, सुशांत सिंगचा मृत्यू, आणि एकंदरच नेपोटीझमला कंटाळलेल्या प्रेक्षकांना जेंव्हा दर्जेदार कन्टेन्ट दिसतो तेंव्हा ते ह्या त्यांच्या अशा स्टार्सच्या सिनेमांकडून सुद्धा अपेक्षा वाढतात आणि त्या पूर्ण न झाल्याने लोकं आता फक्त फक्त कंटेंट असेल त्याच कलाकृतीला सपोर्ट करत आहे.

सुपरस्टारच्या नावापेक्षा सिनेमाची कथा दिग्दर्शक याकडे बघून सिनेमे पाहिले जातायत हा सर्वात मोठा बदल डिजिटल माध्यमाने घडवून आणला!

अशाच १० भारतीय वेबसिरीज ज्या तुम्ही आवर्जून पाहायलाच हव्यात त्याविषयी आज आम्ही तुम्हाला या लेखातून माहिती देणार आहोत!

१. दिल्ली क्राइम :

 

ही नेटफ्लिक्स वर रिलीज झालेली एक भारतीय सिरिज आहे. या सिरिजला नुकताच Emmy अवॉर्ड मिळाला असून, हा पुरस्कार मिळणारी ही पहिली भारतीय सिरिज ठरली आहे.

ही एक क्राइम थ्रिलर सिरिज आहे जी दिल्लीतल्या निर्भया गॅंगरेप प्रकरणावर आधारित आहे. इतका गंभीर विषय असून सुद्धा ही सिरिज तुम्ही तुमच्या परिवारासोबत बसून बघू शकता.

निर्भया केसची चौकशी, निकाल कसा लागला आणि एकंदरच त्या वेळेस दिल्लीतला माहोल आणि पोलिस डिपार्टमेंटवर असलेलं प्रेशर आणि त्यातून निर्माण होणारं टेंशन या सिरिज मध्ये अगदी हुबेहूब दाखवलं आहे!

शेफाली शाह ही या सिरिज मध्ये मुख्य भूमिकेत असून इतरांनी सुद्धा अप्रतिम कामं केली आहेत. साधारण एकच सीझनची ही सिरिज तुम्ही नक्कीच बघू शकता!

 

२. पंचायत –

 

एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनी मध्ये काम करायची स्वप्नं बघणारा तरुण इंजिनियर जेंव्हा उत्तर प्रदेश इथल्या छोट्याशा गावातल्या पंचायतीचा सेक्रेटरी म्हणून नाईलाजाने काम करायला सुरुवात करतो.

सुरुवातीला हे काम त्याला आवडत नाही पण मग हळू हळू त्यात तो रमायला लागतो अशी ही एकंदर कहाणी!

जितेंद्र कुमार उर्फ जितू भैया, नीना गुप्ता, रघुवीर यादव अशी स्टारकास्ट असलेली पंचायत ही फॅमिली ड्रामा सिरीज तुम्ही ऍमेझॉन प्राईम व्हिडियो या प्लॅटफॉर्मवर बघू शकता.

 

३. स्पेशल ऑप्स :

 

 

दिल्लीतल्या विधानभवनावर झालेला आतंकवादी हल्ला आणि दहशतवाद अशी पार्श्वभूमी घेऊन नीरज पांडे या हुशार दिग्दर्शकाने डायरेक्ट केलेली ही पहिली वेब सिरीज.

रॉ ऑफिसर हिम्मत सिंग आणि त्याच्या काही गुप्त ऑपरेशनच्या आधारावर ही सिरीज एक वेगळाच स्पाय थ्रिलर आपल्यापुढे मांडते.

के के मेनन, दिव्या दत्ता, विनय पाठक, सैयामी खेर, अशा तगड्या कलाकारांच्या अभिनयाने समृद्ध अशी ही सिरीज तर तुम्ही अजिबात चुकवू नका.

आणि मुळात ही सिरीज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बसून बघू शकता, हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ही सिरीज तुम्हाला बघायला मिळेल!

 

४. बंदिश बँडिट्स :

 

 

आपण संगीत नाटकं पाहिली आहेत, म्युझिकल सिनेमे पाहिले आहेत, पण वेबच्या दुनियेत पहिल्या संगीत वेब सिरीजचा मान मिळवणारी बंदिश बँडीट्स ही पहिली भारतीय वेबसिरीज. भारतीय शास्त्रीय संगीत, त्यामागची तपस्या आणि पॉप कल्चर असं मिक्स करून फ्युजन केलेलं कथानक तुम्हाला नक्कीच गुंतवून ठेवेल.

राजस्थान इथल्या जोधपूर मधील संगीत घराण्याची ही कहाणी आहे. शंकर – एहसान – लॉय या त्रिकुटाच्या अफलातून संगीताने तर या सिरीजला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.

रित्त्विक भौमिक, श्रेया चौधरी, त्रिधा चौधरी या ३ नव्या चेहऱ्यांनी उत्तम अभिनय करत नसिरुद्दीन शहा, राजेश तैलंग, अतुल कुलकर्णी, शिबा चद्धा अशा लोकांच्या तोडीस तोड अभिनय केला आहे. ही सिरीज तुम्हाला ऍमेझॉन प्राईम व्हिडियोवर पाहायला मिळेल!

 

५. मिर्झापुर – सीझन २

 

 

वेब दुनियेतली सर्वात जास्त चर्चिली गेलेली सिरीज म्हणजे मिर्झापुर. नुकताच त्याचा सीझन २ रिलीज केला गेला आणि प्रेक्षकांनी अपेक्षेप्रमाणे त्याला उदंड प्रतिसाद दिला.

मिर्झापुर फॅन्स तर या सीझनची खूप आतुरतेने वाट पाहत होते. मिर्झापुर इथला बाहुबली अखंडानंद त्रिपाठी यांच्या कुटुंबाची ही कहाणी! एकंदर मिर्झापुर इथलं राजकारण आणि गुन्हेगारी विश्व आणि गुंडगिरी हे सगळं या सिरीज मध्ये पुरेपूर भरलेलं आहे.

बरेचसे बोल्ड सीन्स आणि शिवीगाळ हिंसा असल्याने ही सिरीज तुम्ही घरच्यांसोबत बघू शकत नाही.

बाकी पंकज त्रिपाठी, दिव्येन्दू, श्वेता त्रिपाठी, अली फझल, राजेश तेलंग यांचा उत्कृष्ट अभिनय पाहायचा असेल तर ही सिरीज आवर्जून बघाच ऍमेझॉन प्राईम ला उपलबद्ध आहे!

 

६. असुर –

 

 

असुर म्हणजे दानव, राक्षस अशी आपली समजूत आहे. तर ती समजूत दूर करून असुर म्हणजे एक प्रवृत्ती आहे हे सांगणारी सायको थ्रिलर सिरीज म्हणजे असूर.

एका सिरीयल किलरच्या विचित्र षडयंत्राभोवती ही सिरीज फिरते. या सिरीज विषयी काही सांगणं म्हणजे स्पोयलर्स देण्यासारखंच आहे.

अर्षद वारसी, शरीब हाश्मी, अमेय वाघ अशा कलाकारांच्या अभिनयाने भरपूर अशी ही असुर सिरीज तुम्ही वूट या प्लॅटफॉर्मवर बघू शकता!

 

७. पाताल लोक –

 

 

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने प्रोड्युस केलेली सर्वात उत्तम आणि पहिली वेब सिरीज. ही कथा एका पत्रकाराच्या पुस्तकावरून प्रेरित आहे.

एका प्रसिद्ध पत्रकाराच्या खुनाचा कट रचला जातो आणि त्यामुळे वेगवेगळे राजकीय सामाजिक पैलू उलगडत जातात अशी ही एकंदर कहाणी आहे.

निओ नॉयर जॉनर हा भारतीय कलाक्षेत्रासाठी नवीनच. शिवाय अभिषेक बॅनर्जी, जयदीप अहलावत, स्वस्तिका मुखर्जी, नीरज काबी अशा मातब्बर कलाकारांचा परफॉर्मन्स बघण्यासाठी ऍमेझॉन प्राईम वर ही सिरीज तुम्ही बघूच शकता!

 

८. हाय –

 

 

ड्रगच्या विळख्यातून बाहेर येण्यासाठी एक नवीन ड्रग मार्केट मध्ये येतं, आणि त्या ड्रगच्या विळख्यात सुद्धा लोकं अडकली जातात असं एक वेगळंच जग आपल्यासमोर निर्माण करणारी ही सिरीज तुम्हाला एक वेगळाच अनुभव देते.

ड्रग्स कोणतही असो ते वाईटच आणि ते कोणत्याही थराला माणसाला घेऊन जातं आणि या सगळ्यात गुंतलेलं गुन्हेगारी विश्व तर फारच भयंकर असतं!

अक्षय ओबेरॉय, रणवीर शोरे, श्वेता प्रसाद बसू यांनी सुद्धा यात काम केलं आहे तुम्हाला ही सिरीज एमएक्स प्लेयर वर बघायला मिळेल!

 

९. आर्या –

 

 

या सिरीज मधून बॉलिवूडची दिलबर गर्ल सुश्मिता सेन हिने पदार्पण केलं आणि तिच्या लाजवाब अभिनयाने लोकांनी पुन्हा तिला डोक्यावर घेतलं.

अफीमचा व्यापार करणाऱ्या एका फॅमिलीचं हे कथानक असून, त्या फॅमिलीतल्या एका कर्त्या माणसाच्या मृत्यूमुळे त्या फॅमिलीवर कोणती संकटं येतात आणि त्यातून सुश्मिता सेन ही आपल्या परिवाराला कशी बाहेर काढते ते बघण्यासारखं आहे.

फॅमिली ड्रामा जरी असला तरी यात तुम्हाला सगळं काही बघायला मिळेल. शिवाय या कथेचा क्लायमॅक्स तर तुम्हाला आणखीन गुंतवून ठेवणारा आहे.

सुश्मिता सेन, चंद्रचूड सिंग, मनीष शर्मा यांनी सुद्धा यात उत्कृष्ट अभिनय केला असून ही सिरीज तुम्हाला डीझने प्लस हॉटस्टार वर उपलब्ध आहे!

 

१०. स्कॅम १९९२ – हर्षद मेहता स्टोरी :

 

 

१९९२ साली हर्षद मेहता य स्टॉक ब्रोकर ने केलेला ५०० करोडचा घोटाळा आणि हर्षद मेहताच्या पर्सनल आयुष्यावर भाष्य करणारी ही वेब सिरीज ही भारतात बनलेली आजवरची सर्वात उत्तम वेब सिरीज आहे.

प्रत्येक स्तरातून या सिरीजची तारीफच ऐकायला मिळत आहे.

एकेकाळी मुंबईच्या स्टॉक मार्केटची स्वप्न पाहणारा हर्षद मेहताचा स्टॉक मार्केटचा बिग बुल बनण्यापर्यंतच्या प्रवासाची कहाणी ज्या पद्धतीने दिग्दर्शक हंसल मेहता यांनी मांडली आहे त्यावरून लक्षात येतं की वेब सिरीज लिहिणं म्हणजे नेमकं काय?

शिवाय प्रतीक गांधी सारखा गुजराती थेटर ऍक्टर, श्रेया धन्वंतरी सारखी गुणी अभिनेत्री सोबत असल्यावर ही सिरिज हिट ठरणारच होती. १० एपिसोडची ही सिरीज तुम्ही सोनी लिव्ह या ऍप वर बघू शकता!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version