छंदाचे रुपांतर व्यवसायात करून, महिन्याला ३० हजार रुपये कमावणाऱ्याची भन्नाट कथा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कोरोना महामारीच्या काळात अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या अनेक छोटे छोटे उद्योग बंद पडले. रोज काही ना काही या ना त्या प्रकारच्या बातम्या येत होत्या किंवा आपल्या आजूबाजूला अशा घटना घडत होत्या.
मागेच एका सेव्हन स्टार हॉटेल मध्ये शेफ असलेल्या एका तरुणाची नोकरी गेल्यावर त्याने दादर मध्ये आपल्या कलेच्या जोरावर बिर्याणीचा व्यवसाय सुरू केला.
पैशाला पर्याय नाही आणि त्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. आज अशाच एका तरुणाला आपण भेटणार आहोत, जो परदेशात बक्कळ पगाराच्या नोकरीवर होता. पण नोकरी सुटल्याने नाईलाजाने मायदेशात परतावे लागले.
आणि मार्केट मध्ये गरज असलेल्या आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या ‘कृषी’ विषया मधून आपल्या रोजगाराची दिशा पकडली.
एलदोस राजू अस या तरुणाचं नाव. मूळ केरळच्या एर्नाकुलमचा रहिवासी असलेला राजू कतार मध्ये ‘इंडस्ट्रीयल नर्स’ म्हणून कार्यरत होता.
इंडस्ट्रीयल नर्स म्हणजे इमर्जन्सी केस मध्ये ऍम्ब्युलन्स मध्ये रुग्णाला गरजेच्या असलेल्या सर्व सुविधा आणि ट्रीटमेंट देणारी व्यक्ती.
कोरोनाच्या काळात आहे ते सगळं सोडून मायदेशात आलेल्या आखाती एनआरआय मध्ये राजू सुद्धा होता.
दहा वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर आपल्याला नोकरी सहज मिळेल आणि केरळ मेडिकल बाबतीत पुढारलेल असल्याने इथे ते सहज होईल या आशेने तो मायदेशात परतला.
परंतु त्याचे सगळे प्लॅन फेल जातील याची कल्पना सुद्धा त्याने केली नव्हती. जगायचं म्हणजे पैसा हवा आणि पैसा हवा तर त्यासाठी नोकरी हवी किंवा तत्सम पर्याय.
मग आता करायचं तरी काय? आणि याच उत्तर त्याला सापडलं त्याच्या लहानपणीच्या छंदामधून! लहानपणापासून राजू ला झाड-झुडुपांची आवड. त्यातल्या त्यात कमळा मधे त्याला विशेष रुची होती.
त्याच आवडीच्या माध्यमातून त्याने बाऊल कमळ मागवले आणि आपल्या टेरेस वर ती उगवायला सुरवात केली. कमळ पूर्ण फुलल्यानंतर त्याने त्याचे फोटो आपल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट वर शेअर केले.
आणि इथूनच त्याच्या ‘कमळाच्या’ बिझनेस ची सुरवात झाली! आजच्या डिजिटल युगामध्ये कोणतीही माहिती हवी असेल तर गुगल शिवाय पर्याय नाही आणि त्यातल्या त्यात युट्युब हा उत्तम पर्याय!
अनेक उभरत्या बिजनेस बद्दल जर जाणून घेतले तर त्यांच्या त्या प्रवासात युट्यूब चा कुठे ना कुठे उल्लेख हा दिसून येतो म्हणजे येतो.
आपल्या कमळाला असलेली मागणी पाहता राजू ने युट्युब वर कमळाची शेती कशी केली जाते याचे ट्युटोरियल पाहिले.आणि त्यानुसार आपल्या टेरेसवर त्याने त्याप्रकारचे बदल केले.
एकाच प्रकारचे कमळाचे फुल उत्पादनासाठी पुरेसे नाही याची कल्पना आल्यावर राजुने थायलंड,अमेरिका आणि युरोपातून वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या जातीचे कमळ इम्पोर्ट करायला सुरुवात केली आणि त्यांचं उत्पादन तो आपल्या टेरेस वर घेऊ लागला.
आपल्या या कमळाच्या बिझनेसच्या मार्केटिंग बद्दल सांगताना ३४ वर्षीय राजू सांगतो, या अडचणीच्या काळात सर्व्हायव्हर म्हणून सोशल मीडिया त्याच्या कामी आलं.
त्याने शेअर केलेले कमळाचे फोटो बघून पल्लकड,कोची आणि तिरुअनंतपुरम येथून काही व्यक्तींनी येऊन कमळा बद्दल चौकशी करूम गेले आणि दुसऱ्या विझिट मध्ये त्यांनी त्याच्या कडून कमळाची फुलं तसेच काही रोप आणि बाऊल सुद्धा नेले.
त्यांच्या मुळे त्याचा बिझनेस हा पूर्ण केरळ मध्ये प्रसिद्ध झाला आणि अल्पवधीतच पूर्ण भारतातून त्याला कमळासाठी फोन यायला लागले.
आपल्या ग्राहकांबद्दल सांगताना राजू सांगतो, की त्याचे सर्वाधिक ग्राहक हे मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे या मेट्रो शहरातले आहेत. त्याच्या पेजला विझिट देणारे मुख्यतः उत्तर भारतातले आहेत.
आणि त्याचा एक्स्पोर्ट हा उत्तर भारतातच सर्वाधिक आहे. फुला सहित तो फुलांचे कंद, बाऊल आणि मूळ सुद्धा ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवतो.
कंद आणि फुल यांची ऑर्डर आली की तो पाण्यामधून ती वेगळी करतो आणि स्वछ करून ती ऑर्डर डिसपॅच करतो.
कमळाची फुलं तशी १२ दिवस टिकतात पण तरी फुल असल्या कारणाने ट्रान्सपोर्ट करणाऱ्या व्यक्तीला तो टॉप प्रयोरिटी सांगून ते डिलिव्हर करायला सांगतो.
रोजच्या रोज नियमित ऑर्डर येत असल्याने ट्रान्सपोर्ट करणारी एजन्सी सुद्धा त्याच्या विनंती मान्य करते, हे तो इथे नमूद करतो.
राजू तब्बल २० प्रकारच्या कमळाचे उत्पादन घेतो. झिझु कियनबॅन, मॅग्नीफिसेन्ट, दा सजीन, चारमिंग लिप्स आणि फायर बाऊल सारख्या परदेशी कमळाच्या जातींना प्रचंड मागणी असते.
उत्पन्ना बद्दल विचारले असता राजू सांगतो, त्याच्या या छंदामुळे त्याला महिना काठी ३०,००० रुपये एवढी ‘सॅलरी’ मिळते.
सॅलरी यासाठी की आवड म्हणून ज्याची लागवड केली त्याची फक्त काळजी घेण्याची कामे तो करतो.उत्पादन घेऊन त्याची विक्री हा नंतरचा भाग आहे.
राजू च्या टेरेस शेती मध्ये ८०० रुपयांपासून ते ३५०० रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या कमळाची व्हेरायटी मिळतात. आज जे काही तो करत आहे ते त्याच्या आवडीमुळे झालेलं आहे ते इथे तो विशेष करून नमूद करतो.
राजूच्या या निर्णयाला त्याच्या कुटुंबीयांनी पूर्ण पाठिंबा दिला. कमळाच्या या शेतीपासून त्याला उत्पन्न मिळेल याची त्याला तिळमात्र कल्पना नव्हती.
मात्र उत्पन्न सुरू झाल्यावर वेगळं असलेलं शैक्षणिक बॅकग्राउंड आणि सुरू असलेला व्यवसाय याचा संबंध नसताना सुद्धा घरच्यांनी त्याला कमळाच्या शेतीसाठी पाठिंबा देऊन त्याचे मनोबल उंचावले!
करियर स्विच करणे ही खूप अवघड गोष्ट आहे, पण आपल्या आवडीलाच आपलं प्रोफेशन बनवलं की सगळ्या गोष्टी या सोयीस्कर होत असतात. एलदोस राजुच्या या कमळाच्या बिझनेसने हे पुन्हा एकदा सिद्ध होते.!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.