हे पदार्थ शिजवून खाताय की कच्चे? तब्येतीसाठी काय चांगले ते जाणून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
अन्न ही शरीराची आवश्यक गरज आहे. अन्न ग्रहण केल्यानेच आपल्याला ऊर्जा मिळते मानवी शरीरासाठी आवश्यक सर्व प्रथिने आणि इतर सर्व बहुतांश आवश्यक घटक आपल्याला अन्नाद्वारे मिळतात.
बरेच अन्नपदार्थ हे आपण शिजवून किंवा त्यावरती काहीतरी प्रक्रिया करूनच ग्रहण करतो, परंतु काही अन्नपदार्थ कच्चेच ग्रहण करणे शरीरासाठी अधिक फायदेशीर असतं.
आपण दैनंदिन आयुष्यात शक्यतो अन्नावरती विविध प्रकारच्या प्रक्रिया करूनच त्याचा आहारामध्ये समावेश करतो.
उकळणे, तापवणे, तळणे अशा प्रकारच्या प्रक्रिया केल्यामुळे अन्न पदार्थां मधील आवश्यक घटक कमी होतात विशेषतः विटामिन सी आणि विटामिन डी यासर्व प्रक्रियांमुळे अन्नपदार्थ पासून वेगळे होतात.
त्यामुळेच काही अन्नपदार्थ हे काहीही प्रक्रिया न करता कच्चेच ग्रहण केले तर त्याचा शरीराला अधिक फायदा होतो. तर मग जाणून घेऊयात या पदार्थांबद्दल!
१. हिरव्या पालेभाज्या :
मित्रांनो लक्षात घ्या ह्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये विटामिन सी आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं अशा पदार्थांवर जास्त प्रक्रिया केल्यामुळे यातील आवश्यक घटक निघून जाण्याची शक्यता असते.
त्यामुळे अशा पदार्थांवर ती जास्त प्रक्रिया न करणं फायदेशीर ठरतं या भाज्यांचं नियमित सेवन केल्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि हृदयाचं आयुष्य देखील वाढतं.
या भाज्यांच सेवन केल्यामुळे तुम्हाला पचनाचा त्रास देखील होत नाही.
२. ओला नारळ :
आपल्या आहारामध्ये ओला नारळ मोठ्या प्रमाणात समाविष्ट करायला हवा.
दक्षिण भारतात जवळपास सर्वच पदार्थांमध्ये तुम्हाला ओला नारळ नक्कीच आढळेल याचं कारण म्हणजे शरीराला पाण्याची कमतरता न पडू देण्याचं सर्वात महत्त्वाचं काम हा पदार्थ करतो.
ओल्या नारळाची मुबलक प्रमाणात हेल्दी फॅट्स देखील असतात ज्यामुळे शरीराला प्रमाणात सेट्स देखील मिळतात याउलट वाळलेल्या खोबर्यात एवढी आवश्यक घटक आढळत नाहीत.
३. सुकामेवा :
यामध्ये अंजीर बदाम काजू मनुके अक्रोड यासारख्या अन्नपदार्थांचा समावेश होतो यामध्ये देखील मुबलक प्रमाणात हेल्दी फॅट्स उपलब्ध असतात.
यासोबतच मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे आवश्यक घटक या अन्नपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळेच हे सर्व पदार्थ कच्चे खायला हवेत.
४. पेरू :
आपण सर्वांनी लहानपणी हे फळ नक्कीच खाल्लं आहे मित्रांनो लक्षात घ्या की हे फळ कच्च खायला हवं,
त्याची चव अप्रतिम आहेच पण त्यासोबतच तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात असलेली उष्णता देखील पेरूने कमी होते. हे फळ कच्चं खाल्ल्यामुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात.
५. बीट :
बीट हे असे फळ आहे ज्याचा नियमित जेवणामध्ये समावेश करायला हवा.
तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर ती कमतरता दूर करण्याचे काम हे फळ करते एवढेच नाही तर तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील या फळाची मोठी मदत होते.
या फळांमध्ये विटामिन सी पोटॅशियम मॅग्नेशियम विटामिन बीचे सर्व आवश्यक घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळेच नेहमीच्या जेवणात याचा नक्कीच समावेश करायला हवा.
६. आलं :
आलं हा पदार्थ आपल्याकडे नेहमीच प्रक्रिया करून वापरला जातो परंतु याचं सेवन केल्यामुळे देखील अनेक फायदे होतात.
या पदार्थाचे कच्च सेवन केल्यामुळे शरीरातील लंग्ज कॅन्सरचा धोका कमी होतो त्यासोबतच अनेक प्रकारचे आवश्यक घटक या पदार्थात असल्यामुळे हा पदार्थ कच्चा खाणे शरीरासाठी किफायतशीर आहे.
७. कांदा :
आपल्यापैकी अनेक मंडळींना कच्चा कांदा खाणे हे आवडत नसेल.
परंतु लक्षात घ्या शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी तसेच जास्त प्रमाणातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारात कांदा खायलाच हवा.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.