Site icon InMarathi

उत्तम पार्टनरशिपचं उदाहरण जगासमोर मांडणाऱ्या ऑडीच्या लोगोची रंजक गोष्ट वाचा!

audi featured 2 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“A good logo is one that can be scratched in the sand with your big toe.” -Kurt Weidemann

प्रसिद्ध ग्राफिक डिझायनर वेडमन यांचे हे वाक्य आजच्या घडीला तंतोतंत लागू पडतं. प्रत्येक मोठ्या ब्रँडची ओळख म्हणजे त्याचा लोगो!

लोगो पाहिला की त्या त्या ब्रँडची ओळख ही लांबून सुद्धा पटते. आणि त्या त्या लोगोचा काही गहन असा अर्थ सुद्धा असतो.

उदाहरण घ्यायचं म्हणजे मर्सिडीजचे तीन डायमेंशनल स्टार हे पाणी, जमीन आणि आकाश याला रिप्रेझेंट करत. बीएमडब्ल्यूचा लोगो हे बीएमडब्ल्यू जर्मनी मध्ये ज्या भागात आहे त्या जागेला रिप्रेझेंट करते.

ह्युंडाईच्या एच मध्ये ग्राहक आणि कंपनी चा कर्मचारी हात मिळवत आहेत असं एकंदरीत चित्र दिसतं. ग्राहकांचा विश्वास हे तिथे ते अधोरेखित करतात.

तर, जर्मन लक्झरी गाड्या बनवणारी अजून एक जगप्रसिद्ध कंपनी म्हणजे ऑडी! आणि ऑडीचा लोगो म्हणजे चार बांगडया अर्थात चार रिंग एकमेकांमध्ये अडकलेल्या!

जस की वर सांगितले की प्रत्येक लोगोला काही न काही अर्थ हा असतो. तर ऑडी च्या यार चार रिंगला सुद्धा तेवढाच गहन अर्थ आहे!

या चार रिंग म्हणजे ऑडी, डिकेडब्ल्यू, हॉर्च आणि वॉन्डरर ऑटोमोबाईल. आणि त्या चार रिंगचे एकमेकांमध्ये अडकणे म्हणजे त्यांची एकमेकांसोबत असलेली पार्टनर शिप!

 

 

हे चौघे मिळून एक झाले हा त्या लोगोचा अर्थ. या चार कंपन्यानी मिळून आजच्या जगप्रसिद्ध ऑडीचा पाया घातला. आधी पाहुयात या चार कंपन्या बद्दल!

हॉर्च :

ऑगस्ट हॉर्च या मेकॅनिकल इंजिनिअरने १४ नोव्हेंबर १८९९ मध्ये हॉर्च अँड साय या कंपनीची स्थापना केली. १९०४ मध्ये आपल्या या कंपनी ला शेअर्स ट्रेडिंग कंपनी मध्ये रूपांतरित केले.

मॅनेजमेंट सोबत असलेल्या वादामुळे १९०९ साली हॉर्चला आपल्याच कंपनीला रामराम ठोकावा लागला. पुढे हॉर्च पुन्हा ऑटोमोबाईल क्षेत्रात परतली.

ऑडी :

ज्या वर्षी हॉर्चने आपलीच कंपनी सोडली, त्याच वर्षी जुलै १९०९ साली त्याने स्वतः ची नवीन कंपनी स्थापन केली.

पण हॉर्च हे नाव आधीच रजिस्टर केले गेल्यामुळे त्याला ते नाव परत घेता येई ना. शेवटी आपल्याच नावाचे लॅटिन ट्रान्सलेशन करून त्याने आपल्या नवीन कंपनीचे नाव ठेवले-‘ऑडी’!

 

 

ऑडी ऑटोमोबाईल वर्क ही हॉर्चची दुसरी कंपनी एप्रिल १९१० पासून कार्यरत झाली.

वॉन्डरर :

एक छोट सायकल रिपेअर करणारे दुकान मग सायकल बनवणारी कंपनी, मग मोटारसायकल रिपेअर करणारे गॅरेज ते मोटार सायकल बनवणारी कंपनी.

आणि पुढे मोटार सायकल वरून थेट मोटार कार तयार करणारी कंपनी, हा प्रवास आहे वॉन्डरर या कंपनीचा.!

१८८५ मध्ये जर्मनीच्या शेमनीज मध्ये जोहान बैपटिस्ट विंकहॉफर, रिचर्ड एडोल्फ जैनिक या दोघांनी मिळून सायकल रिपेअर करण्याचे वर्कशॉप सुरू केले.

मग सायकल सोबत मोटार सायकल पण दुरुस्त करायला लागले. नंतर आलेला अनुभव पाठीशी घेऊन त्यांनी स्वतःची मोटर सायकल बनवणारी कंपनी सुरू केली. वॉन्डरर फेरार्डवर्क!

१९०२ मध्ये त्यांनी आपली पहिली मोटार सायकल तयार केली. आपल्या मोटार कार बनवण्याच्या निर्णयाला वॉन्डररने १९१३ मध्ये मूर्त रूप दिले. ‘पपशेन’ नावाची दोन सीटर मोटार कार त्यांनी १९१३ मध्ये बाजारात आणली.

 

 

ज्याचे अनेक दशके उत्पादन हे सुरू होते.

डीकेडब्ल्यू :

१९०४ मध्ये शेमरीज मध्ये ही कंपनी ‘रॅस्मसेन अँड अर्नेस्ट’ या नावाने स्थापन झालेली. पुढे जागेच्या कमतरतेमुळे शेमरीज मधून ही कंपनी अर्जबर्ग भागात स्थलांतरित झाली.

कंपनीचा संस्थापक असलेल्या जोर्गन रॅस्मसेन याने १९१६ च्या दरम्यान वाफेवर चालणाऱ्या मोटारीचा प्रयोग सुरू केला. आपला प्रयोग पूढे पेटंट करून त्याने त्याला ट्रेडमार्क दिला डीकेडब्लू!

सन १९१९ साली कंपनीचे नाव बदलून ‘शापोर मोटर वर्क’ (Zschopauer Motorenwerke) ठेवले गेले जी दोन स्ट्रोक इंजिन असलेल्या मोटर सायकल चे प्रोडक्शन करत असे.

१९२२ साली डीकेडब्लू या दोन स्ट्रोक इंजिन असलेल्या मोटारबाईक ला तुफान यश प्राप्त झाले. त्यानंतर कंपनीचे सगळे उत्पादन हे ‘डीकेडब्लू’ याच नावाने बाजारात यायला लागले.

१९२८ साली डीकेडब्लू ची पहिली छोटी कार बाजारात आली.

तर, या चार कंपन्यांच्या एकत्र समिकरणातून निर्माण झाली ‘द ऑटो युनियन एझी’ २९ जून १९३२ ला युनियन बँक ऑफ सॅक्सोनी च्या पुढाकाराने या नव्या टायअप ची पायाभरणी झाली.

 

 

या नव्या कंपनीचे मुख्यालय हे शेमनीज मध्येच स्थापन करण्यात आले. त्या काळी जर्मनी मध्ये कार निर्माण करणारी ऑटो युनियन ही दुसरी सगळ्यात मोठी कंपनी होती.

चारही कंपन्याना समूहातील एक एक खंडाची जबाबदारी दिली गेली. डीकेडब्लू ला मोटार सायकल आणि लहान गाड्यांची जबाबदारी दिली गेली.

वॉन्डरर ला मध्यम गाड्यांच्या निर्मिती ची जबाबदारी दिली गेली. ऑडीला लहान आणि मध्यम लक्झरी गाड्यांची जबाबदारी तर हॉर्चला ऑटोमोबाईल क्षेत्रात असलेला अनुभव बघता मोठ्या लक्झरी गाड्यांची जबाबदारी दिली गेली.

चार ही कंपन्यांच्या विलय झाल्यानंतर चार कंपन्यांच्या प्रतिकांच्या स्वरूपात चार इंटरलिंक रिंग कंपनीचा लोगो म्हणून निवडला गेला!

 

 

आणि हेच ते ऑडी चे जगप्रसिद्ध सिम्बल! तर ही होती ऑडीच्या सिम्बल मागची कहाणी. ऑडीच्या या लोगो मध्ये त्याच्या निर्मितीचेचं मूळ असल्याने त्याला मोठा अर्थ निर्माण होतो!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version