' कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी सज्ज झाली आहे ही आगळीवेगळी भिंत, वाचा – InMarathi

कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी सज्ज झाली आहे ही आगळीवेगळी भिंत, वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“कोरोना गो” हा नारा आपण खूप दिवसांपूर्वी ऐकला होता. त्याचा फारसा उपयोग झालेल्या नसल्याचा आपल्याला लक्षात आलंच असेल.

मार्च २०२० मध्ये भारतात दाखल झालेल्या कोरोना ने इतक्या दिवसात चांगलाच उच्छाद मांडला आहे. डॉक्टर्स, पोलीस आपली ड्युटी चोख बजावत आहेत.

मागील काही महिन्यात कोरोना बद्दल घडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मागच्या काही दिवसात मृत्यूदर हा कमी झाला आहे.

रुग्णसंख्या सुद्धा सध्या आधीपेक्षा नक्कीच कमी आहे. पण, त्याचं कारण मागच्या पंधरा दिवसात कमी झालेल्या टेस्ट हे सुद्धा सांगण्यात येत आहे.

आजूबाजूला काहीही होवो, “माझ्यापर्यंत मी कोरोनाला येऊ देणार नाही” हे जेव्हा आपण स्वतःला सांगू तेव्हाच आपण न चुकता योग्य ती काळजी घेऊ हे नक्की.

“माझं कुटुंब, माझी जवाबदारी” हा स्लोगन काही दिवसांपासून खूप लोकप्रिय झाला आहे.

 

corona mask inmarathi

 

पण, दिवाळीच्या वेळी जर का आपण रोड वर खरेदी साठी झालेली गर्दी बघितली असेल तर किती लोकांना हे खरंच कळलं आहे हे आपल्या लक्षात आलं असेल.

“दिवाळीची खरेदी असली की बाहेर पडावंच लागतं” हे उत्तर देऊन कित्येक लोक स्वतःला पत्रकारांच्या स्वसुरक्षेबद्दल च्या प्रश्नांपासून वाचवत होते.

घराबाहेर पडण्याचे बंधन सरकार ने या विश्वासावर शिथिल केले होते की, लोक स्वतः मास्क घालतील, एकमेकांपासून अंतर ठेवतील. फार कमी लोक हे या सुचनांचं पालन करताना आपण प्रत्येक वृत्तवाहिनीवर बघितले.

“मास्क घातला की श्वास घ्यायला त्रास होतो” किंवा “मास्क घरीच विसरलो” किंवा “मास्क खिशात ठेवला आहे” या सबबी लोक आजही देत आहेत हे बघून कोरोना लोकांना किती कळला आहे हे समजतं.

कोरोनाचं गांभीर्य सर्वांना सुरुवाती पासून असलं असतं तर निदान महाराष्ट्रात चित्र इतकं विदारक झालं नसतं. “नो मास्क, नो एन्ट्री” हे जेव्हापासून कित्येक दुकानांनी, मॉल, ऑफिस ने सुरू केलं तेव्हापासून लोक निदान त्या ठिकाणी तरी मास्क मध्ये दिसत आहेत.

पण, सर्वात अवघड प्रश्न आहे तो रोडचा, स्ट्रीट मार्केट चा. तिथे तुम्हाला कोणीच अडवत नाही किंवा अडवलं तरी तुम्ही केवळ २०० रुपयांचा दंड देऊन सुटू शकतात.

तुमच्यामुळे इतरांना किंवा तोपर्यंत इतरांमुळे तुम्हाला कोरोना व्हायरसची लागण झालेली असल्यास जवाबदार कोण असेल?

 

corona 2 inmarathi

 

समाजातील काही लोकांकडे मास्क खरेदी करण्यासाठी पैसे नसतात. या लोकांसाठी कित्येक समाजसेवी संस्था सध्या पुढे येऊन मास्क वाटप करत आहेत. जयपूर सरकारने तळागाळातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत मास्क पोहोचावा म्हणून एक उत्तम योजना राबवायला सुरुवात केली आहे.

राजस्थान चे मुख्यमंत्री अशोक गहेलोत यांनी काही दिवसांपासून ‘नो मास्क-नो एन्ट्री’ हे कॅम्पेन सुरू केलं आहे. जयपूर डेव्हलपमेंट अकॅडमी (JDA) ने या कॅम्पेन ला सपोर्ट करण्यासाठी एका ‘मास्क की दिवार’ ची संकल्पना राबवली आहे.

ही एक भिंत अशी बांधली आहे की ज्यात काही कप्पे आहेत ज्यामध्ये नेहमी ‘मास्क’ ठेवलेले असतील. कोणीही या भिंतीजवळ येऊन स्वतःसाठी मास्क घेऊन जाऊ शकतो. आहे की नाही मस्त आयडिया ?

मास्क न वापरण्याचं कोणतंही कारण आपण ही भिंत सगळीकडे बांधल्यास देऊ शकणार नाही.

‘मास्क की दिवार’ ची सुरुवात करताना जाहीर केलेल्या पत्रकात राजस्थान सरकार ने घोषित केलं आहे की, “मास्क ची ही भिंत चा उद्देश हा आहे की जोपर्यंत कोरोना लस आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ही भिंत कोरोना आणि लोकांच्या मध्ये उभी असेल.

या भिंती जवळ नेहमीच काही कर्मचारी नियुक्त केले असतील. ते कर्मचारी लोकांना मास्क मोफत वाटतील.

 

mask ki diwaar inmarathi

 

ज्या सेवाभावी संस्थांना इतरांना मदत म्हणून मास्क वाटप करायचं आहे, ते इथे येऊन मास्क जमा करू शकतात. तुमच्या एका मास्क मुळे सुद्धा एखादी व्यक्ती सुरक्षित होऊ शकते.”

जयपूर शहरी विकास प्राधिकरणाचे प्रमुख भास्कर सावंत आणि गौरव गोयल यांनी लोकांना मास्क वाटप करून या उपक्रमाचा शुभारंभ केला.

जयपूर मधील जेडीए मुख्यालयाच्या समोरील बिर्ला मंदिरा जवळ ही ‘मास्क की दिवार’ उभी करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री अशोक गहेलोत आणि गृहमंत्री शांती धारिवाल यांच्या इच्छेतून ही संकल्पना नावारूपास आली.

‘मास्क की दिवार’ या योजने अंतर्गत आजपर्यंत ३ लाखांहून अधिक मास्कचं वितरण करण्यात आलं आहे.

‘पिंक सिटी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जयपूर शहरातील या उपक्रमामुळे लोक खूप आनंदी आहेत. एक व्यक्ती एका वेळी जास्तीत जास्त दोन मास्क घेऊ शकतो असा नियम सध्या जयपूर डेव्हलपमेंट अकॅडमी ने लावला आहे.

२३ नोव्हेंबर ला सुरू केलेल्या या ‘मास्क की दिवार’ ला लोकांनी तिथून मास्क घेऊन आणि वेगवेगळ्या डिझाईन चे मास्क तिथे देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे.

आपणही मास्क वापरावा आणि इतरांना आपल्या वागण्यातून मास्क वापरण्यासाठी प्रेरित करावं असं आव्हान जयपूर सरकारने जनतेला केलं आहे.

 

wall of mask inmarathi

 

कोरोनाशी लढाई करताना सर्वांची साथ मिळणं अत्यंत आवश्यक आहे. “एकही रुग्ण नवीन तयार होऊ नये” हा उद्देश ठेवून प्रत्येकाने रोज सतर्क राहून वावरुया.

जयपूर सरकार ने ने सुरू केलेला ‘मास्क की दिवार’ हा उपक्रम महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमासारखा आहे असं आपण म्हणू शकतो.

जिथे आपल्यला नको असलेले आणि इतरांच्या कामी येऊ शकणाऱ्या कपड्यांची देवाण घेवाण विना संवाद होत असते. आपल्या माणुसकीचं आपण सगळे रोज दर्शन घडवूया, चला मास्क घालू या…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?