' तुमच्या रोजच्या आहारात ज्वारीची भाकरी का हवी हे पटवून देणारे ८ फायदे! – InMarathi

तुमच्या रोजच्या आहारात ज्वारीची भाकरी का हवी हे पटवून देणारे ८ फायदे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवणं हे एक आव्हान झालं आहे. आपल्या सर्वांची बदललेली दिनचर्या, कामाचे वेगवेगळे स्वरूप आणि खाण्याची बदललेली आवड. फास्ट फुड आणि स्नॅक्स या गोष्टींची आवड इतकी वाढली की आपल्यापैकी काही लोक घरच्या खाण्यापेक्षा बाहेरच्या खाण्याला जास्त प्राधान्य देऊ लागलो.

बर्गर, पिझ्झा ने कधी आपल्या घरातील पोळी आणि भाकरीची जागा घेतली हे आपल्याला कळलं सुद्धा नाही. बदललेल्या खाण्याच्या सवयीमुळे तब्येतीवर विपरीत परिणाम होतांना आपण बघतच आहोत.

 

fast food inmarathi

 

भारतीय लोकांची रोग प्रतिकारक शक्ती ही चांगली आहे हे आपण आजही सांगतो. पण, जर का पुढच्या पिढीला सुद्धा आपल्याला ही देणगी द्यायची असेल तर त्यांना आपल्या पारंपारिक खाद्य पदार्थांची माहिती आणि फायदे सांगणं अत्यंत आवश्यक आहे.

ज्वारीची भाकरी ही एकेकाळी आपल्या जेवणाचा भाग होती. पण, आता ‘भाकरी’ म्हणजे फार दिवसांनी एकदा होणारा ‘पदार्थ’ सर्वांना वाटत आहे. भाकरी पेक्षा पोळी लवकर होते म्हणून आपण सरसकट पोळीच रोजच्या स्वयपाकात करायला लागलो.

टिफीन मध्ये नेलेल्या पोळीला दुपारपर्यंत येणाऱ्या कोरडेपणामुळे बरीच शाळेतील मुलं, नोकरदार वर्ग हे अर्धवटच जेवू लागले आणि त्यांना थकवा, कामात येणारा निरुत्साह यासारख्या परिस्थितीला वारंवार तोंड द्यावं लागत आहे.

शेतात काम करणारे लोक इतके काटक का असतात आणि ते इतक्या वेळ अंग मेहनत करू शकतात याचं कारण त्यांचा सकस आहार सुद्धा आहे.

आपण भाजी आणायला बाजारात गेल्यावर बघतो की, वयस्कर आजी बाई भली मोठी टोपली डोक्यावर ठेवून घेऊन येतात. कोणी मदतीला असेल तर ठीक नाही तर एकट्याच ती टोपली परत डोक्यावर ठेवतात आणि बाजाराची वेळ संपली की निघतात. त्यांचं कधी अंग दुखत नाही.

त्यांना कधी आपल्यासारखी सुट्टी नसते आणि त्यांना त्याची गरज सुद्धा नसते.

सकाळी लवकर उठून त्या ज्वारीची भाकरी, चटणी किंवा पिठलं सोबत घेऊन त्या कामावर निघालेल्या असतात आणि त्या खाण्यावरच त्या संध्याकाळ पर्यंत इतकं चालणं, बोलणं सहजपणे करत असतात.

 

jwari bhakri inmarathi

 

काय जादुई शक्ती असेल या ज्वारीच्या भाकरी मध्ये? जाणून घेऊयात.

१. पचनास हलकी :

ज्वारी ही फायबर युक्त असते. आपल्या शरीराला रोज ४८% फायबरची गरज असते. फायबर मुळे अन्न नलिकेचं कार्य सुरळीत होत असतं.

ज्वारी मध्ये फायबरचं प्रमाण अधिक असल्याने ज्वारी च्या भाकरीने गॅसेस, बद्धकोष्ठता, खाणं झाल्यावर जड वाटणे, पोट साफ न होणे अश्या तक्रारी अगदी कमी होतात.

२. कॅन्सर पासून बचाव करणे :

ज्वारी वर एक थर असतो जो कॅन्सर चा प्रतिकार करू शकत असतो. ज्वारी मध्ये असलेल्या काही घटकांमुळे अकाली वृद्धत्व सुद्धा येत नाही.

सध्या अँटी-एजिंग साठी लोक किती तरी केमिकल्स चा वापर करताना दिसतात. त्यापेक्षा हा खाण्यातला बदल केल्यास कोणत्या रिऍक्शन चा सुद्धा धोका नसेल.

३. रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे :

ज्वारी मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियमचं प्रमाण अधिक असल्याने ज्वारीची भाकरी खाल्ल्याने हाडं आणि शिरा मजबूत होतात. ज्वारी मध्ये असलेल्या आयर्न मुळे लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते.

ज्यामुळे शरीराची एकूणच रोग प्रतिकारक शक्ती वाढते. या गोष्टीची सध्या आपल्या सर्वांना फार गरज आहे.

 

immune system inmarathi

४. हृदयाची काळजी :

ज्वारी मध्ये असलेल्या फायबर मुळे बॅड कोलेस्ट्रॉल (LDL) चं प्रमाण कमी होतं ज्यामुळे हृदया संबंधित होणारे आजार जसं की स्ट्रोक, अटॅक येण्याची शक्यता कमी होते.

५. पोटदुखी होत नाही :

गव्हामध्ये ग्लुटेन नावाचं एक चिकट द्रव्य असतं. या द्रव्याची काही लोकांना त्यांच्याही नकळत एक ऍलर्जी असते. ज्यामुळे त्यांना पोटदुखीचा त्रास होत असतो.

शरीराला ग्लुटेन सहन होत नसल्याने हा त्रास होत असतो. ज्वारी मध्ये ग्लुटेन अजिबात नसल्याने पोटाचे कोणतेही विकार त्यामुळे होत नाहीत.

६. प्रोटीनचं अधिक प्रमाण :

ज्वारी च्या एक कप मध्ये २२ ग्रॅम इतकं प्रोटीन असतात. प्रोटीन हे शरीराला उर्जा देत असतात आणि शरीरातील पेशींसाठी उपयुक्त असतात.

हेच कारण आहे ज्यामुळे ज्वारीची भाकरी खाणारे लोक जास्त वेळ ताजेतवाने राहतात आणि पुढच्या कामासाठी कायम तयार असतात.

७. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणे :

ज्वारी हे एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा प्रकार असल्याने त्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण हे वाढत असतं.

वजन कमी करण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांनी पोळी, रोटी, चपाती पेक्षा ज्वारीची भाकरी खावी असं डॉक्टर सांगतात. डायबिटीसने त्रस्त असलेल्या लोकांनी सुद्धा ज्वारीची भाकरी खावी असं सांगितलं जातं.

 

pithla bhakri inmarathi

८. रक्ताभिसरणात मदत :

ज्वारी मध्ये असलेल्या कॉपर आणि आयर्न हे दोन मिनरल्स (खनिज) असल्याने रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. आयर्न (लोह) मुळे लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते.

त्यामुळे अनेमिया या रोगापासून सुद्धा बचाव होत असतो. दिवसातून एक वेळेस जरी ज्वारीची भाकरी खाल्ली तरी आपल्या शरीराला आवश्यक त्या ५८% कॉपर शरीराला मिळू शकते.

ग्लुटेनचं प्रमाण नसल्याने ज्वारी ही गव्हाच्या पोळीपेक्षा चांगली असं आहार तज्ञ सांगतात. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवण्यास ज्वारी ला थोडा जास्त वेळ लागतो. पण, त्यामुळे अचानक शुगर वाढण्याचा त्रास होत नाही.

आपल्या रोजच्या खाण्यात ज्वारीचे प्रमाण कसे वाढवावे यासाठी काही पर्याय आहेत:

१. पोळी :

आपल्या आहारात ज्वारीचा समावेश करण्यासाठी आपण मल्टी ग्रेन पीठ वापरू शकतो. यामध्ये ५० टक्के ज्वारी आणि ५० टक्के गव्हाच्या पिठाचं प्रमाण असतं.

त्यासोबतच बाजरी आणि सोया यांचा सुद्धा समावेश असल्याने ते प्रकृती साठी चांगलं असतं.

२. इडली / डोसा :

 

idli dosa inmarathi

 

दक्षिण भारतातून सुरू झालेले हे खाद्यप्रकार आज जगभरात लोकप्रिय आहेत. इडलीचं पीठ तयार करतांना दोनास एक (२:१) या प्रमाणात आपण ज्वारी आणि तांदूळ हे एकत्र करू शकतो.

या व्यतिरिक्त ज्वारी च्या पिठापासून पॅन केक सुद्धा केला जाऊ शकतो. याची रेसिपी आणि कृती आपल्याला युट्युबवर सापडेल.

ज्वारी चे इतके फायदे आहेत हे कळल्यावर आपण आपल्या आवडीच्या ‘झुणका भाकरी’ ला कमीत कमी विकेंड डिश म्हणून आपल्या आहारात आणायला पाहिजे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?