आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
वजन कमी करण्यासाठी आणि व्यायामासाठी चालणे हा सगळ्यात सोपा आणि सहज मार्ग आहे. चालण्याचे आरोग्यासाठी अन्य फायदेही आहेत.
अगदी सगळ्याच वयोगटातील लोक स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी चालणे हा उत्तम पर्याय आहे.
नियमितपणे चालणे यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते हाडे स्नायू अधिक सशक्त होतात असेच चालण्याचे बरेच फायदे आहे.
देशाविषयी विदेशातील कलेक्ट डायटीशियन आणि अभ्यासकांनी चालण्याचे वेगवेगळे फायदे सांगितलेले आहेत तर तुम्हीसुद्धा शक्य तेवढे वाहनांवरून जाणे टाळा आणि त्याऐवजी चालत जा जे तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
मनोवस्था :
आनंदी असलो की आपण स्वस्थ राहतो असे तुम्ही नेहमीच ऐकले असेल. मानसिक आरोग्य नीट असेल तर शारीरिक आरोग्यसुद्धा सुदृढ राहते. त्यामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य जपणे देखील गरजेचे आहे.
एका अभ्यासातून असे कळले आहे की, दररोज चालल्यामुळे आपली मानसिक स्थिति नीट राहते, चिडचिड आणि उदासीनता यांचे प्रमाण कमी होते.
कोवळ्या सूर्यप्रकाशात चालल्याने किंवा गवतावर चालल्याने मनालाही आनंद मिळतो आणि नैराश्य ही दूर होते. त्यामुळे डिप्रेशन आणि एनझायटीची समस्या असणाऱ्या लोकांनी दररोज अर्धा तास तरी चालायला हवे.
जर तुम्ही तुमचे मित्र अथवा शेजाऱ्या बरोबर चालायला गेलात तर, व्यायामाबरोबर तुमच्या गप्पाही होतील आणि या संवादांमुळे तुम्हाला आनंदही मिळेल.
–
हे ही वाचा – वय बदललं तरी व्यायाम तोच? सावधान, तुमची ही सवय सर्वात मोठी चूक ठरू शकते
कॅलरी आणि वजन कमी करण्यासाठी :
जर तुम्ही दररोज चालू लागलात तर तुमच्या निदर्शनास येईल की, तुम्ही वापरत असलेले कपडे आता ढगळे होऊ लागले आहेत. याचे कारण खूप सोपे आहे दररोज चालल्यामुळे आपल्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे पोटावरील चरबी कमी होते.
जर तुम्हालाही कॅलरी आणि वजन कमी करायचे असेल तर तुम्ही दररोज चालायला हवे. तुम्ही दिवसागणिक तुमच्या चालण्याचे अंतर वाढवायला हवे. तुम्ही चालण्यासाठी टेकडी किंवा पर्वत यांसारख्या चढ असलेल्या भागांची निवड केली पाहिजे.
जेणेकरून तुमच्या शरीराच्या स्नायूंची अधिक कसरत होईल आणि तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल. असे विविध ॲप्स आहेत ज्यांवर तुम्ही किती पावले चाललात आणि किती कॅलरीज कमी केली हे कळते.
त्यामुळे दिवसभराच्या चालण्याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी तुम्ही या ॲप्स चा वापर तुम्ही करु शकता. दररोज चालल्यामुळे शरीरातील पचन प्रक्रियेत सुद्धा सुधारणा होते जे वृद्ध काळात आपल्यासाठी फायदेशीर आहे असे लेझीम मुली म्हणतात.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ट्रेडमिल खरेदी करण्यासाठी किंवा जिम मध्ये पैसे घालवण्याऐवजी अगदी शून्य रुपयात तुम्हाला सुदृढ शरीर मिळू शकते.
हे ही वाचा – सकाळी उठून जॉगिंगला जाण्याचा कंटाळा येतो? ह्या ९ गोष्टी तुमचं जॉगिंग प्रचंड आनंददायी करतील!
कधीच न बऱ्या होणाऱ्या आजारांवर उपायकारक :
अमेरिकेच्या डायबिटीस असोशियनचे असे म्हणणे आहे की, दररोज चालल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते ज्यामुळे तुम्हाला डायबिटीसवर नियंत्रण मिळवता येते.
युनिव्हर्सिटी ऑफ बॉर्डर कोलोरॅडो आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेनेजी अभ्यासकांचे असे म्हणणे आहे, चालल्यामुळे ११ पॉईंटने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते आणि स्ट्रोक येण्याची शक्यता २० ते ४० टक्के कमी होते.
द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन मध्ये प्रकाशित झालेल्या एका आर्टिकलनुसार न चालणाऱ्याच्या तुलनेत जे लोक दररोज व्यायाम म्हणून काही मैल चालतात त्यांना रुदयासंबंधित आजार होण्याची शक्यता तीस टक्क्याने कमी झालेली दिसली.
सर्व आजारांपासून दूर राहण्यासाठी जास्तीत जास्त अंतर चालायला हवे साधारणपणे आठवड्यात एक किंवा दोन तास चालायला हवे असे मायामी मधील ग्रीटिंग लॉन्ग ऍक्टिव्हिटी सेंटर फिटनेस डिरेक्टर स्कॉट डनबर्ग म्हणतात.
पचन नीट होते :
कॅन्सरवरील फिजिकल थेरपिस्ट म्हणतात चालण्यामुळे पोटातील स्नायुंची हालचाल होते त्यामुळे शरीरातील अन्नाचे पचन होण्यासाठी मदत होते ते असेही म्हणतात की पोटाच्या कोणत्या ही शस्त्रक्रिया आधी रोग्याने थोडावेळ चालणे गरजेचे आहे कारण ज्यामुळे शरीरातील गॅस्ट्रोनल ट्रॅक मध्ये हालचाल होते.
त्यामुळे तुम्हाला सुद्धा अपचन होण्याचा त्रास भेडसावत असेल तर तुम्ही दररोज सकाळी चालायला हवे.
स्पर्धात्मकता वाढते :
–
हे ही वाचा – कुणीही करू शकेल इतके सोपे ८ व्यायामप्रकार मधूमेहापासून १००% दूर ठेवतात…
जर तुम्हाला दररोज चालण्याची सवय लागली आणि दिवसागणिक तुम्ही त्यात वाढ करू लागलात तर चालण्या प्रती तुमचा तुमची स्पर्धात्मकता वाढते आणि तुम्ही तुमच्या अन्य धेयांबाबतीत सुद्धा स्पर्धात्मक होता.
शरीराची जास्तीत जास्त काळजी घेण्याची सवय तुम्हाला आपोआप जडते. त्यामुळे शरीराच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त असणाऱ्या अनेक चांगल्या सवयी तुम्ही स्वतः मध्ये रुजू करता.
निर्मितीक्षमता :
जर तुम्ही कला अथवा लिखाण क्षेत्रात असाल आणि तुमच्या विषयाला अनुसरून तुम्हाला काही सुचेनासे झाले असेल तर चालणे हे उत्तम पर्याय आहे. २०१४ च्या एका अभ्यासानुसार चालण्यामुळे तुमच्यातील निर्मितीक्षमता वाढते असे दिसून आले आहे.
या अभ्यासामध्ये, अभ्यासकांनी क्रिएटिव्ह थिंकिंग च्या काही चाचण्या घेतल्या. यामध्ये त्यांना असे दिसून आले की बसून राहणार यापेक्षा चालणाऱ्या लोकांचे उपाय अधिक कलात्मक होते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते :
अभ्यासकांना असेही दिसून आले आहे की चालल्यामुळे तुमच्यामधील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मुळात चालणे हा एक उत्तम पर्याय आहे.
ज्यामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात, पचन व्यवस्था सुधारते परिणामी तुमचे शरीर अधिक सुदृढ होते आणि येणाऱ्या कोणत्याही आजाराशी अधिक प्रभावीपणे सामना करू शकते.
उत्तम झोप :
हे तुम्हालाही माहीत आहे की खूप चालल्यामुळे रात्री उत्तम झोप लागते कारण, चालल्यामुळे नैसर्गिक रित्या शरीरातील मेलॅटोनीन चे प्रमाण वाढते जो स्लीप हॉर्मोन म्हणून ओळखला जातो.
त्यामुळे काहींना तासनतास बेडवर लोळून सुद्धा झोप न लागण्याची समस्या असते त्यांनी दररोज चालायला हवे.
हे ही वाचा – आळशीपणावर मात करून फिट राहण्यासाठी या १० टिप्स नक्की फॉलो करा..
===
हे ही वाचा – दररोज १०,००० पावले चाललात तर छानच! पण निम्मे चाललात तरी पुरेसे आहे…
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.