Site icon InMarathi

दिवाळीत वाढलेलं वजन नियंत्रणात ठेवायचं असेल, तर या गोष्टी आजपासूनच फॉलो करा

diwali inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

दिवाळी जवळ आली, की वेध लागतात ते फराळाच्या पदार्थांचे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, बली प्रतिपदा (पाडवा), भाऊबीज असे प्रत्येक दिवस महत्त्वाचे असलेला हा जगातील एकमेव सण आहे.

कुटुंबातील सर्वांनी एकत्र येणे, खरेदी करणे, विविध संगीत कार्यक्रमांचा आस्वाद घेणे, किल्ला बनवणे, फिरणे असा मनसोक्त जगण्याचा काळ म्हणजे दिवाळी. कोरोनामुळे यावर्षी बऱ्याच गोष्टींवर बंधनं आलेली होती, पण त्यामुळे आपल्या आनंदात कोणतीही कमतरता आली नाही.

दिवाळी सरत आली, की वेध लागतात ते आपल्या कामावर परतण्याचे आणि या छोट्या ब्रेकमधून मिळालेल्या उर्जेला एक दिशा देण्याचे. हे साध्य करण्यासाठी सर्वात आवश्यक असतं ते आरोग्य.

मागच्या काही दिवसात आपलं जे अतिरिक्त खाणं, आराम झालेला असतो त्यामुळे नकळत आपल्या शरीरात खूप कॅलरीज् वाढलेल्या असतात, अपचन होत असतं, उष्णता वाढलेली असते. हे सगळे बदल नियंत्रणात आणण्यासाठी काही उपाय केले, तर सुदृढ आरोग्य मिळू शकते.

१. लिंबू पाणी पिणे:

 

 

शरीरातील उष्णता, अॅसिडिटीचं प्रमाण कमी करण्यासाठी दिवाळी नंतरचे काही दिवस आपल्या दिवसाची सुरुवात आपण लिंबू पाणी घेऊन केली पाहिजे.

पाणी थोडं कोमट असावं जेणेकरून पोट साफ होण्यास मदत होईल आणि पचनाचे त्रास कमी होतील. लिंबामध्ये असलेल्या व्हिटॅमिन C मुळे आपल्या शरीराचं वाढलेलं अतिरिक्त वजन सुद्धा कमी होतं.

 

२. योग्य नाश्ता करणे:

 

 

दिवाळीमध्ये आपल्याला मोठ्या फराळाच्या ताटाची सवय लागलेली असते. त्यावर आता नियंत्रण ठेवायला हवं. लिंबूपाणी घेतल्यानंतर गरज असते ती प्रोटिन असलेला हलका नाश्ता करण्याची.

प्रोटीन जास्त असलेला नाश्ता केल्याने तंदुरुस्त वाटेल आणि जास्त वेळासाठी तुम्ही काम करू शकाल. सफरचंद, द्राक्ष, टरबूज, अंडी या गोष्टींचा नाश्त्यात समावेश करावा. प्रोटीनमुळे तुमच्या दिवसाची सुरुवात खूप उत्साहात होईल.

 

३. कडधान्य आणि हिरव्या भाज्या खाणे:

 

 

सणासुदीचं जेवण हे नेहमीच मसालेदार आणि चमचमीत असतं. त्यामुळेच कमी वेळात आपलं वजन वाढतं. आता गरज असते ती फळं, पालेभाज्या यांना आहारात परत घेऊन येण्याची. तेल, साखर, मीठ यांचं प्रमाण कमी करण्याची आणि फायबर युक्त संत्री, गाजर, पेरू, ब्रोकोली सारखे फळभाज्या खाण्याची.

या फळभाज्यांमुळे पचन व्यवस्थित होतं. फायबरयुक्त खाण्याने वजन कमी करण्यास खूप मदत होते.

 

४. ग्रीन टी पिणे:

 

 

दुपारच्या जेवणानंतर ग्रीन टी घेण्याची सवय लावा. अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण अधिक असल्याने ग्रीन टी मुळे तुमच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

ग्रीन टी मुळे पचनक्रिया सुधारते आणि कॅलरीज् कमी होतात. वैद्यकीय अभ्यासात असं समोर आलं आहे, की ग्रीन टी च्या सेवनाने वजन कमी होणे आणि पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

 

५. संध्याकाळी नाश्ता करणे:

 

 

खाण्याच्या सवयींबद्दल बोलतांना नेहमी सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण याबद्दलच जास्त बोललं जातं. दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणातील अंतर कमी करण्यासाठी संध्याकाळी सकस आहाराचा नाश्ता करणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे.

संध्याकाळच्या नाश्त्यात आपण अवोकॅडो, फळं, मटकी सारख्या गोष्टी खाऊ शकतो. शेंगदाणे सुद्धा जर प्रमाणात खाल्ले तर त्यांचा फायदा होतो.

 

६. रात्री हलके जेवण करणे:

 

 

रात्रीचे शक्य तितक्या लवकर जेवा. रात्रीचं लवकर जेवल्याने पचन होण्यास मदत होते. तुमच्या रात्रीच्या जेवणात भाज्यांचं सूप असल्यास ते सुद्धा तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करते.

चरबी कमी करण्यासाठी सूप हे फार उपयुक्त असते. हलके सूप पचनास सुद्धा मदत करते आणि तुम्हाला जास्त काळासाठी ऊर्जा देते.

७. जास्त पाणी पिणे:

 

 

त्वचेला सतेज ठेवण्यासाठी पाणी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्वचेच्या आणि शरीराच्या स्वच्छतेसाठी जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे.

८. व्यायाम:

 

 

शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी इतर कितीही उपाय असले तरी व्यायाम हा आवश्यकच असतो. व्यायामाच्या वेळेपेक्षा नियमितता जास्त महत्त्वाची आहे हे सगळेच तज्ञ सांगतात.

व्यायाम म्हणजे जिम मध्ये जाऊन वजन उचलणे असंच नसतं. नियमित चालणं, सायकल चालवणं किंवा घरातल्या घरात दहा मिनिटांसाठी नियमित व्यायाम करणं देखील खूप उपयोगाचं आहे.

९. पुरेशी झोप:

 

 

दिवाळीची तयारी करतांना, खरेदी करताना आणि दिवाळी साजरी करताना आपल्या नेहमीच्या झोपेच्या वेळा बदललेल्या असतात.

प्रत्येकाला किमान ७ तासाच्या झोपेची आवश्यकता असते. पुरेशी झोप घेतल्याने शरीरातील अशुद्ध गोष्टींचा नाश होतो आणि आपण दिवसातील जास्तीत जास्त काळ ताजेतवाने राहतो. झोपेकडे झालेलं दुर्लक्ष यामुळे किती तरी नवीन आजारांची सुरुवात होऊ शकते.

दिवाळीनंतर ‘बॅक टू नॉर्मल’ येण्यासाठी या टिप्स आपल्या सर्वांच्याच उपयोगी पडतील अशी आशा आहे. करताय ना मग फॉलो?

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version