' फायटर जेट ते ऑटोमोबाईल क्षेत्र गाजवणाऱ्या BMW बद्दल आश्चर्यकारक पण अज्ञात गोष्टी  – InMarathi

फायटर जेट ते ऑटोमोबाईल क्षेत्र गाजवणाऱ्या BMW बद्दल आश्चर्यकारक पण अज्ञात गोष्टी 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बीएमडब्ल्यू म्हटलं की काय येत डोळ्यासमोर? लॅविश ब्रँडेड डिझायनर कार, मेड इन जर्मनी, आयडेंटिकल हेडक्वार्टर, आणि सचिन तेंडुलकर! (सचिन बीएमडब्ल्यू इंडियाचा ब्रँड अँबसिडर आहे.)

तर या कंपनीच्या कार कोणाला नाही माहीत? हाय परफॉरमिंग लक्झरी कार. गाडीत बसल्यावर स्पीड कितीही जास्त असली तरी फरक पडत नाही. जबरदस्त सस्पेंशन आणि त्याचं डिझाईन!

बीएमडब्ल्यूच्या गाड्यांबद्दल जितकं बोलू तितकं कमी आहे. तर आज बघूया बीएमडब्ल्यू या गाडी आणि तिच्या कंपनीबद्दल इंटरेस्टिंग असे काही फॅक्ट!

 

bmw inmarathi

१९१६ मध्ये स्थापना :

फ्रांझ पॉप, कार्ल रॅप, कॅमिलो कॅस्टीग्लिओनी या तिघांनी मिळून जर्मनीच्या म्युनिच शहरात या बायरीश मोटोरेन वर्क या नावाने स्थापन केली.

पुढे याच लांब लचक नावाच्या इनिशियलने बीएमडब्लू नाव प्रकाशात आले.

विमानाचे इंजिन बनवणारी कंपनी :

कंपनी स्थापनच मुळात पहिल्या महायुद्धाच्या काळात झाली. युद्धाच्या काळात विमान तयार होताना त्यासाठी इंजिन वेगळं तयार करून फटाफट विमानाचं उत्पादन घेता याव म्हणून स्थापन केली गेली.

कंपनीचे ‘रेड बॅरन’ हे पहिल्या महायुद्धातले सर्वश्रेष्ठ इंजिन होते. फ्युल एफिशियन्सी आणि हाय परफॉर्मन्स मुळे हे इंजिन जगप्रसिद्ध झाले.

युद्धा दरम्यान विमानांची वाढती मागणी बघता जर्मन आर्मीन बीएमडब्लू ला आपला विस्तार करायला लावला. युद्धानंतर मात्र लढाऊ विमान बनवणं त्यांनी बंद केले.

आणि दुसऱ्या महायुद्धात पुन्हा त्यांना जर्मन सैन्याने मागणी केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातले बीएमडब्लू १३२ आणि बीएमडब्लू ८०१ हे सर्वाधिक यशस्वी इंजिन डिझाईन होते.

१९४५ पर्यंत बीएमडब्लूने इंजिनची निर्मिती केली.

वर्सायचा करार आणि बीएमडब्लू :

वर्सायच्या कारारामुळेच बीएमडब्लूला पहिल्या महायुद्धानंतर इंजिन बनवायचे थांबवावे लागले होते.

मित्र देशांनी लादलेल्या अटींमुळे जर्मन कंपन्यांना फायटर जेट आणि त्याचे इंजिन या दोहोंच्या निर्मिती वर बंदी घालण्यात आली.

त्यामुळे व्यवसायात राहण्यासाठी बीएमडब्लू ला ऑटोमोबाईल क्षेत्रात जावं लागलं. आणि पूढे घडलेला इतिहास सर्वज्ञात आहे. १९२९ ला पहिली गाडी तयार करण्याच्या आधी बीएमडब्लू मोटर सायकलच्या निर्मितीकडे आकर्षित होती.

 

bmw 2 inmarathi

लोगो आणि त्याचा रंग :

एमडब्ल्यूचा लोगो एवढा साधा आणि आकर्षित आहे की त्याला कोणीही कुठून ही ओळखू शकतो.

बीएमडब्लूचा रंग हा बॅवरीया या जागेला रेप्रेझेंट करतो. हे तेच ठिकाण आहे जिथे कंपनीचे मुख्यालय आहे.

पांढरा आणि निळा रंग हे बॅवरीयाच्या झेंड्यावरचा रंग आहे तर गोल सिम्बल हा रॅप मोटर कंपनीचा लोगो आहे जो बीएमडब्लूचा फाउंडर होता.

इलेक्ट्रिक कारच्या मामल्यात जगाच्या पुढे :

पेट्रोल आणि डिझेलच्या कमतरतेमुळे इलेक्ट्रिक कार ही कन्सेप्ट जगापुढे आली. आज इलॉन मस्क याबाबतीत पुढे आहे.

पण बीएमडब्लू ने १९७२ सालीच आपली पहिली इलेक्ट्रिक कार तयार केली होती. बीएमडब्ल्यू १६०२ई ही ती कार. पण ही गाडी बाजारात कधी आलीच नाही.

या कारच्या मागे कंपनीची अर्धी ताकद लागत होती. ज्यामुळे इतर गाड्यांच्या प्रोडक्शनमध्ये डिले होत होता. आणि ही गाडी फक्त २० मिनीटच चार्ज होल्ड करत होती जे एक प्रकारे कमर्शियल फेल्युअर होते.

त्यामुळे अशी गाडी बाजारात आणणे मुळात धोक्याचे लक्षण होते. म्हणूनच बीएमडब्ल्यूने आपला तो प्रोजेक्ट बंद केला.

बीएमडब्लूकडे रोल्स रॉईस आणि मिनी या कंपनीचे अधिकार होते :

 

bmw mini rr inmarathi

 

१९९४ मध्ये बीएमडब्लू ने ब्रिटिश रॉईस कंपनी आपल्या पंखाखाली आणली.

त्यामुळे मिनी कूपर, एमजी रोअर, लँड रोअर या गाड्यांचे मॅन्युफॅक्चरिंग अधिकार बीएमडब्लूकडे आले. पुढे रोल्स रॉयसचे अधिकार घेत बीएमडब्लू ने २००३ साली आपली गाडी मार्केटमध्ये उतरवली, रोल्स रॉयस फॅन्टम.

जी आजही आपला दबदबा मार्केट मध्ये कायम ठेवून आहे.

बीएमडब्लू चे मुख्यालय :

बीएमडब्लू हे आपल्या फोर सिलिंडर इंजिन साठी प्रसिद्ध आहे. तेच त्यांनी आपल्या हेडक्वार्टर मध्ये रिफ्लेक्ट केले. ऑस्ट्रियन प्रोफेसरने या इमारतीचे डिझाईन केले आहे.

कालांतराने बीएमडब्लूचे सिक्स सिलिंडर इंजिन बेस गाड्या बाजारात आले आणि प्रचंड प्रसिद्ध झाले. त्यामुळे सिक्स सिलिंडरसारखे दिसणारे अजून टॉवर यामध्ये ऍड केले गेले. १९७२ च्या ऑलम्पिकच्या दरम्यान.

बीएमडब्लू आणि लँबोरगिनी :

एक इटालियन आणि एक जर्मन कंपनी. यांचा लांब लांब सुद्धा संबंध नाही. पण होय बीएमडब्लू ने लँबोरगिनी बनवली आहे.

 

bmw lamborghini inmarathi

 

१९७० मध्ये दोघा कंपन्यांच्या म्युचल ऍग्रीमेंटने एक रेस कार तयार करण्याचे ठरवले गेले. कारचे डिझाईन गिगीयारो करेल आणि पार्टस बीएमडब्लू देईल असा तो करार होता.

कालांतराने आर्थिक कारण देऊन लँबोरगिनी यातून मागे हटली. पुढे बोअर या कोचबिल्डरच्या मदतीने बीएमडब्लू ने आपली गाडी पुर्ण केली. हीच ती बीएमडब्लू एम१ सुपरकार!

बीएमडब्लू जवळपास मर्सिडीज झाली होती :

बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज या दोन प्रसिद्ध जर्मन कंपनी मधली रायवरी जगप्रसिद्ध आहे. १९५९ मध्ये बीएमडब्ल्यू  बुडायच्या मार्गावर होती.

डायमलर बेंझ ही मर्सिडीज बेंझची मूळ कंपनी बीएमडब्लूला टेक ओव्हर करण्याच्या इराद्यात होती.

बीएमडब्लूच्या शेअर होल्डर्सना हे मान्य नव्हतं आणि त्यांनी काउंटर बॅक करत बीएमडब्लूचे शेअर्स डबल किमतीने बाजारातून उचलले.

आणि बीएमडब्लूचा लिलाव त्यांनी रोखला. आणि डायमलर बेंझच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. हेच मूळ कारण आहे जे या दोन जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये आजही शत्रूता आहे.

बीएमडब्लूचे सिग्नेचर ग्रील अर्थात किडनी ग्रील :

 

bmw grill inmarathi

 

आपल्या लोगोच्या आधी आपल्या ग्रीलने ओळखली जाणारी गाडी म्हणजे बीएमडब्लू! लोगो नंतर येतो आणि येतो ते हे ग्रील.

या ग्रीलला किडनी ग्रील म्हणतात. ही ग्रील सर्वप्रथम १९३३ मध्ये इन्ट्रोड्युस झाली. बीएमडब्लू ३०३ या गाडी मध्ये सर्वप्रथम ती दिसली. तर असे हे अनोखे फॅक्ट बीएमडब्ल्यू संबंधित आहेत जे अनोखे तर आहेच शिवाय आश्चर्यकारक सुद्धा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?