आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कोरोना पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करत आहोत. मार्च महिना असा होता की, तेव्हा न्यूज चॅनल वरची प्रत्येक बातमी ही फक्त कोरोनाची होती.
‘लॉकडाऊन’ च्या काळात आपण बघितलं की न्यूज चॅनल वर सुद्धा बंद कुलुप असलेले ग्राफिक्स सारखे फ्लॅश होत होते. कोरोनाचं गांभीर्य प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार आणि मीडिया ने एकत्र येऊन बऱ्याच योजना राबवल्या.
आपण बघितलं की, कसं क्रिकेट खेळाडूंनी एकत्र येऊन ‘मास्क फोर्स’ म्हणजेच घर बसल्या मास्क बनवण्याची पद्धत लोकांना शिकवली. ‘आरोग्य सेतु’ app चं प्रमोशन हे सुद्धा लोकांपर्यंत माहिती त्वरित पोहोचावी या उद्देशानेच सुरू होतं.
आपण बघत होतो की इतक्या मार्गाने सांगूनही कोरोना पेशंटचे आकडे काही कमी होत नव्हते. तेव्हा सरकार ने सर्व फोन कंपन्यांना एक कॉलर ट्यून ठेवणं बंधनकारक केलं.
या कॅलर ट्यून मधली एक व्यक्ती सर्दी खोकल्याने त्रस्त असल्याचं आपल्याला ऐकू येतं. कोरोना बद्दल आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे असलेल्या काळजी बद्दल सांगितलं जातं आणि मग त्या व्यक्तीला आपला फोन लागतो.
आपल्याला असं वाटू शकतं की, हे फक्त भारतातच आहे. पण, तसं नाहीये. जगभरातील प्रमुख फोन कंपन्यांनी कोरोना बद्दल लोकजागृती वाढवण्यासाठी हे पाऊल उचललं होतं.
या कॅलर ट्यून चे प्रकार सगळीकडे वेगवेगळे असतील. पण, हा संदेश प्रत्येक कॉल मागे लोकांपर्यंत पोहोचतच होता.
काही वर्षांपूर्वी भारतात कॉल रेट्स खूप स्वस्त झाल्याने आजही भारतात मेसेज वर बोलण्यापेक्षा कॉल करणं जास्त सोयीस्कर मानलं जातं हे आपण मान्य कराल.
सतत फोन कॉल्स कराव्या लागणाऱ्या व्यक्तींना या ‘कोरोना कॉलर ट्यून’ चा काही दिवसांनी कंटाळा यायला लागला. कोणतीही गोष्ट सतत कानावर पडू लागली की त्याचा कंटाळा येणं सहाजिकच आहे.
असं ही म्हणता येईल की, सतत कोरोनाने त्रस्त व्यक्तीसारखा आवाज ऐकला तर एक तर मानसिक भीती या आजाराबद्दल तयार होऊ शकते जी की या आजारा इतकीच भयानक आहे.
‘कोरोना कॉलर ट्यून’ चा काही दिवसांपासून समाजातील जवळपास प्रत्येक घटकांकडून विरोध सुरू आहे हे आपण बघत आणि ऐकतच आहोत.
जियो, एअरटेल, Vi सारख्या भारतातील प्रमुख फोन कंपन्यांना याबाबतीत लोक आपला विरोध दर्शवत होते. काही दिवसांपूर्वी या ‘कोरोना कॉलर ट्यून’ च्या विरोधात एक हॅशटॅग ट्विटर वर चालवण्यात आला होता.
त्यानंतर त्यामधील काही भाग हा कमी करण्यात आला. पण, आजही तो त्रासदायक आवाज काही कॉलर ला ऐकू येतो हे बोललं जात आहे.
पण, या पूर्ण कॉलर ट्यून पासून आपली सुटका कशी होऊ शकते हे आपल्यापैकी काहींना आतापर्यंत कळलं असेल. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी या लेखातील माहिती महत्वाची आहे.
आपण जर का त्या ट्यून मध्ये सांगितल्याप्रमाणे योग्य काळजी घेत आहात आणि ही ट्यून आपण पूर्ण ऐकलेली असेल तरच ती बंद करावी असं आम्ही सुद्धा सांगत आहोत.
अँड्रॉईड फोन वरून जर तुम्ही फोन करत असताना कॉल कनेक्ट झाल्यावर कोणतंही एक बटन प्रेस कराव. असं केल्याने, ‘कोरोना कॉलर ट्यून’ वाजणार नाही आणि तुम्ही केलेल्या फोन वर तुम्हाला नॉर्मल ट्यून ऐकायला मिळेल.
आयफोन वरून जर तुम्ही फोन करत असाल तर फोन कनेक्ट झाल्यावर डायलर परत स्क्रीन वर आणावं आणि हॅश (#) प्रेस करावं. असं केल्याने वाजायला सुरू होणारी ‘कोरोना कॉलर ट्यून’ लगेच वाजयची थांबेल.
या दोन्ही प्रयत्ना नंतर सुद्धा जर का ‘कोरोना कॉलर ट्यून’ ही वाजतच असेल तर पुन्हा एकदा अँड्रॉईड फोनने नंबर आणि आयफोन ग्राहकांनी हॅश प्रेस करावं.
कदाचित, पहिल्या वेळेस तुमची विनंती फोन कंपनी पर्यंत पोहोचली नसावी.
फोन कंपन्यांनी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की या त्रासामुळे कित्येक लोक ‘कोरोना कॉलर ट्यून’ टाळण्या साठी आता whatsapp कॉल, फेसबुक मेसेंजर कॉल, गुगल Duo सारख्या पर्यायाचा वापर करत आहेत.
फोन कंपन्यांचा या माध्यमांमुळे किती तरी महसूल वाया जात असावा. कदाचित हेच लक्षात घेऊन ‘कोरोना कॉलर ट्यून’ कशी बंद करायच्या या स्टेप्स देण्यात आल्या आहे :
एअरटेल : डायल *646*224# आणि 1 प्रेस करा
BSNL : “UNSUB” हा मेसेज 56700 वर पाठवा.
Vi : “CANCT” हा मेसेज 144 वर पाठवा.
Jio : “STOP” असा मेसेज 155223 वर पाठवा.
‘कोरोना कॉलर ट्यून’ थांबवण्यासाठी हे उपाय सुचवण्यात येत आहेत. ह्यापैकी काही फोन सर्विस कंपन्या ही ट्यून फक्त २४ तासांसाठी काढत आहेत तर काही नेहमीसाठी.
हे नंबर्स सुद्धा सतत बदलले जात आहेत, जर आपल्यापैकी कोणाला या स्टेप्स नंतरही ‘कोरोना कॉलर ट्यून’ काढता आली नाही तर त्यासाठी आम्ही क्षमस्व आहोत कारण आम्ही फक्त उपलब्ध माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.
फोन कंपनी या त्यांना मिळालेल्या निर्दशानुसार काम करत असतात ज्याला आपण पूर्णपणे बदलू शकत नाहीत.
डिसेंबर मध्ये कोरोनाची लस येईल अशी बातमी मध्यंतरी जोर पकडत होती. रशिया, भारत, इंग्लंड मधील शास्त्रज्ञ यावर काम करत आहेत.
त्यांना लवकर यश मिळो आणि कोरोनाचा समूळ नाश होवो अशी आशा करूयात. असं झाल्यास “न रहेगा कोरोना, न रहेगी कॉलर ट्यून” ही म्हण खरी ठरेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.