' ८२ वर्षाच्या या आजींची कमाल पाहिलीत, तर तुम्हीही प्रेरित होऊन उद्यापासून ही गोष्ट कराल! – InMarathi

८२ वर्षाच्या या आजींची कमाल पाहिलीत, तर तुम्हीही प्रेरित होऊन उद्यापासून ही गोष्ट कराल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

दर वर्षी १ जानेवारीला, आपल्या वाढदिवसाला किंवा साडेतीन मुहूर्तांपैकी एका मुहूर्तावर आपण एक संकल्प हमखास करतो तो म्हणजे “नियमित व्यायाम करण्याचा”,  पण ते म्हणतात ना नियम हे मोडण्यासाठीच असतात, तसंच व्यायामाचा संकल्प सुद्धा कधीही पूर्ण न करण्यासाठीच असतो असं म्हणायला हरकत नाही.

“केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे” ही म्हण आपल्या सगळ्यांना अगदी लहानपणापासून ज्ञात आहे. तरीही सगळं कळतंय, पण वळत नाहीये अशातला आपला प्रकार झाला आहे.

व्यायामाची किती आवश्यकता आहे सगळ्यांना ठाऊक आहे, पण “रोज सकाळी साखर झोपेतून उठून तयार होऊन बाहेर फिरायला कोण जाईल? जिम मध्ये जाऊन इतकं कठीण वर्क आऊट कोण करेल? जाऊ दे आज उशीर झालाय, आता उद्या पासून करतो” असं म्हणता म्हणता, कारणं देता देता आपला उद्या काही उजाडात नाही.

 

sleep inmarathi

 

आपण तरणीताठी माणसं ही कारणं देत बसलो तेव्हा तिथे चेन्नईत एका ८२ वर्षांच्या आजीने मात्र एक वेगळीच कथा रचली. प्रसिद्ध उद्योगपती हर्ष मारीवाला आणि दि बेटर इंडिया या इंस्टाग्रामच्या पेजने आजीचा व्यायाम करतानाचा विडिओ शेअर केला आणि सोशल मीडियावर एकच आश्चर्याची, कौतुकाची लाट आली. पाहूया ८२ व्या वर्षी वेट ट्रेनिंग करणाऱ्या आजीची गोष्ट.

चेन्नई येथील चिराग चोरदिया याने आपल्या इन्स्टाग्राम पेज वर त्याच्या आजीचा एक विडिओ शेअर केला होता. त्यात त्याची ८२ वर्षांची आजी, तरुण माणसाला सुद्धा लाजवेल या स्फूर्तीने व्यायाम करत होती.

 

 

View this post on Instagram

 

Here’s my 82 year old granny lifting weights and being a total badass! She shows off her paused squat to every visitor, even if they’re just casually shocked by the idea that seniors can lift safely! A lot of myths surround senior training because well, it’s uncommon for them to lift weights. Just like it was uncommon for women to lift weights in the 90s. I designed her workouts based on: 1️⃣ The purpose of training – she wants to be physically independent and capable 2️⃣ Her training experience – she said ‘what’s a gym?’ 3️⃣ Her health history – let’s just say I’ve read entire books faster than her reports! 4️⃣ What she could do and actually enjoyed when we started. What about age, you ask? Age is like BMI. Both are perceived to be useful indicators but rarely, if ever, do they give us the entire context. Everyone CAN train. The kind of training they do differs based on factors more important than age! #GrannyTrains #womenwholift #senior #fitness #fitspo #fitspiration #indiafitness #india #chennaifitness #chennai #fitover40 #strongwomen #womenshealth #trainwithapurpose #train #strength #motivation

A post shared by Chirag Chordia (@chordia.chirag) on

“आजीला आपल्या दैनंदिन कामांकरीता कोणावरही अवलंबून राहायचे नाही, म्हणून आजीने व्यायामाला सुरुवात केली. “मी स्वतःपण भरपूर व्यायाम करतो, त्यामुळे तिच्यासाठी व्यायाम लिहून देताना तिचा व्यायामाबद्दलचा दृष्टिकोन, तिचे आरोग्य आणि तिला असलेलं व्यायामाचं ज्ञान या गोष्टी मी लक्षात ठेवल्या.” असं तो म्हणाला.

त्याच्या आजीला पूर्वी बऱ्याच रोगांचा सामना करावा लागला होता म्हणूनच,  या वयात सुद्धा व्यायाम करण्याचा तिने निर्णय घेतला. चिराग म्हणतो, “माझी अभ्यासाची पुस्तकं तिच्या मेडिकल रिपोर्ट्स पेक्षा लवकर वाचून होतील, इतके रिपोर्ट्स आहेत.”

चिरागने पहिल्यांदा आजीला जिमबद्दल विचारता, “जिम काय असतं?” हाच उलट प्रश्न आजीने केला. आजीला व्यायामाबद्दल माहित नसणं हे साहजिकच होतं, आजीला हे सगळेच प्रकार अपरिचित होते, पण आजीने जिद्द काही सोडली नाही.

म्हातारपण एक असा टप्पा असतो जिथे माणूस आपलं सगळं आयुष्य जगून, अनुभव घेऊन पोहोचलेला असतो. या वयात कोणतीही नवीन गोष्ट शिकणं, कोणताही बदल आत्मसात करणं हे माणसाला फार कठीण जातं, पण आरोग्य आहे तर तुम्ही आहात या धोरणाला मनाशी घट्ट करून आजीने व्यायामाला सुरुवात केली.

 

chennai grandmother exercise inmarath

 

ज्याकाळी समाजाचे विचार हे स्त्रियांच्या भूमिकेबद्दल “स्त्रिया या फक्त स्वयंपाक घरातच शोभून दिसतात” या मतावर ठाम होते, आजी त्या काळात वाढलेल्या. मनात तीच शिकवण ठासलेली, तरीही आपल्या आरोग्यापुढे आजीने कोणत्याही अडथळ्याला मोठे हाऊ दिले नाही आणि शिकण्यासाठी वयाची कोणतीच मर्यादा नसते हे आजीने पुन्हा दाखवून दिलं.

व्यायामाची आवश्यकता चिरागच्या आजीने बरोबर हेरली आणि स्वतःला फिट, निरोगी बनवण्याचा ध्यासाच घेतला. आजी वेट ट्रेनिंग, ऐरोबिक एक्सरसाईज, स्क्वाट्स, सगळे व्यायाम प्रकार करतात.

आज्जीच्या घरी कोणतीही पाहुणे मंडळी आली, कि आजी त्यांना आपल्या फिटनेसने हमखास चकित करून सोडतात. त्या घरीच व्ययम करतात.

 

chennai grandmother exercise inmarathi

 

आजीच्या ह्या व्यायाम करण्याच्या निर्णयाने आणि तो यशस्वी करून दाखवण्याच्या जिद्दीने, “म्हातारपण म्हणजे दुबळेपण, अशक्तपणा आणि लाचारी” ह्या समाजात रूढ असलेल्या म्हातारपणाच्या व्याख्येला बदलून ठेवलंय.

आजी एक असे उदाहरण आहेत, जे आपल्याला पटवून देते, की थोडीशी मेहनत करून तुम्ही आजीवन आपलं शरीर निरोगी आणि सुदृढ ठेऊन संपूर्णपणे स्वावलंबी राहू शकता.

या उदाहरणामुळे इतर व्यायाम करू पाहणाऱ्यांना नक्कीच एक आत्मविश्वास मिळेल.

आपल्याकडे फार कमी लोक व्यायामाबद्दल जागरूक आहेत. गृहिणी आणि चाळीशी ओलांडलेली पुरुष मंडळी तर व्यायामापासून कायम एक अंतर बनवून ठेवतात. आपल्या दिनचर्येत व्यायामाला प्राधान्य दिल्याच जात नाही, पण सुपर आजीचे उदाहरण डोळ्यांपुढे ठेऊन, रोगांवर मात करण्यासाठी व्यायामाला प्राधान्य द्यायला शिकलं पाहिजे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?