महिन्यातील ‘त्या’ दिवसांच्या वेदना कमी करणारे हे उपाय घरातील सगळ्यांनाच माहिती हवेत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मुलींनो, मासिक पाळीच्या वेदनांचा त्रास कमी करतील हे सहज सोप्पे घरगुती उपाय!
“पाळी” प्रत्येक मुलीला दर महिन्याला भेटणारी मैत्रीण. पाळी आली की मुलींचं जीवनच बदलतं. अचानक त्यांना आपण कोणत्या तरी मोठ्या बदलाला सामोरे जातोय असं वाटू लागतं.
आपण अचानक मोठे झालो ही भावना येते. मैदानी खेळ, इतर शारीरिक हालचाली जवळ जवळ बंदच होतात, ज्यामुळे व्यायाम होत नाही आणि व्यायामाच्या अभावापायी या नाजूक काळात काही मुलींना तीव्र वेदनांचा सामना सुद्धा करावा लागतो.
ओटी पोटात सतत कळ येणे, कंबर दुखणे, थकवा येणे, मळमळणे, मुड स्विंग्ज, ताप, अशा वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. हा त्रास इतका तीव्र असतो, की काही स्त्रियांना कुस बदलण्याचे अतिशय साधे काम सुद्धा गिर्यारोहण केल्यासारखे कठीण भासते.
मासिक पाळीचा हा त्रास कोणतीही महागडी औषधं न घेता आपण घरच्या घरीच कमी करू शकतो, कसा ते जाणून घेऊया.
१) शेक देणे –
गरम पाण्याच्या पिशवीने पोटाला व कमरेला शेकून काढा. शेकल्यामुळे गर्भाशयाचे स्नायू थोडे शिथिल होतात व त्यांना आपले कार्य करणे थोडे सोपे जाते, यामुळे आपल्याला वेदनाही कमी होतात.
संशोधनानुसार, शेकून काढणे हा पेन किलर गोळ्यांपेक्षा जास्त प्रभावी व सुरक्षित पर्याय आहे. यामुळे मुड स्विंग्ज सुद्धा नियंत्रणात राहण्यासाठी मदत मिळते.
२) ‘इसेंशियल ऑइल’ने मालिश करणे –
कधी कधी पोटापर्यंत व्यवस्थित रक्ताभिसरण न झाल्याने सुद्धा पोटदुखी होते. इसेंशियल ऑइलमध्ये रक्ताभिसरण सुरळीत होऊ देण्याचे गुणधर्म असतात.
या तेलांना “बेस ऑइल” जसे खोबरेल तेल, बदाम तेल, आवळ्याचे तेल यामध्ये मिसळून, या मिश्रणाने हलकी मालिश केल्याने वेदना कमी होतात.
काही अत्यंत गुणकारी इसेंशियल ऑईल्स खालील प्रमाणे आहेत –
लॅव्हेंडर
गुलाब
दालचिनी
लवंग
हे इसेंशियल ऑइल्स आपल्याला ऑनलाईन किंवा आपल्या नजीकच्या मेडिकल मध्ये, कमी किमतीत मिळू शकतात.
३) व्यायाम –
पाळीच्या वेळी थोडी हालचालही करणे शक्य नसते, तर व्यायाम कसा करणार? हा प्रश्न आता बहुतेकांना पडला असेल.
एका संशोधनानुसार, पाळीच्या वेळी आणि पाळी येण्याआधी सुद्धा नियमित व्यायाम केल्याने शरीर लवचिक होते, रक्ताभिसरण सुरळीत होते, ज्यामुळे मळमळ होणे, अशक्तपणा येणे, जीव घाबरणे या सारख्या त्रासांपासून आपली सुटका होऊ शकते.
पाळीच्या वेळी थोडी हालचाल केल्याने, एरोबिक एक्सरसाईज किंवा योग केल्याने भरपूर आराम मिळतो. पोटाचे, गर्भाशयाचे स्नायू रिलॅक्स होतात. यामुळे वेदना कमी होतात, रक्ताभिसरण योग्य होऊन रक्तस्राव सुरळीत होतो.
व्यायामात आपण १०- १५ मिनिटे चालणे, आपल्या आवडत्या गाण्यांवर नाचणे, वज्रासन, शवासन, प्राणायाम, अशी विविध आसने करू शकता.
४) व्हिटॅमिन सप्लीमेंट –
कधी कधी पाळीमुळे काही काळापुरती शरीरातील व्हिटॅमिन आणि मिनरल्सची मात्रा कमी होते. यामुळे सुद्धा अशक्तपणा जाणवतो आणि वेदना होतात.
अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेणे उपायकारक ठरते. गोळ्या घ्यायच्या नसतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही तुमच्या आहारात थोडा बदल करू शकता.
शक्यतो, ताजी फळे, मोड आलेली कडधान्ये अशा पौष्टिक गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करा.
५) कॅफिन, तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा –
आराम हवा असेल, तर पथ्य पाळावीच लागतात. पाळीच्या दरम्यान आपल्याला चटपटीत काही खाण्याची इच्छा होतेच. पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, कॉफी, चहा यांचे भरपूर प्रमाणात सेवन आपण करतो, पण या पदार्थांमुळे बद्धकोष्ठता, अॅसिडीटी असे त्रास होऊ लागतात.
यासाठी कॅफिनयुक्त पदार्थ, अत्याधिक तेलकट आणि मसालेदार, तिखट, अल्कोहोलिक पदार्थ आणि कार्बोनेटड प्येय यांचे सेवन टाळा. साधे घरचे, पौष्टिक पदार्थ खाण्याला प्राधान्य द्या.
६) भरपूर पाणी प्या –
आपले शरीर हे ७०% पाण्याने बनलेले असते आणि पाण्याचा अभाव झाला, की त्वचा आणि स्नायू कोरडे होतात, शुष्क होतात. याचा शरीराला त्रास होऊ शकतो.
कधीही दिवसाचे ८-१० ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. पाळीत सतत लघवीला जावे लागू नये, म्हणून आपण कधी कधी पाणी प्यायचे टाळतो, पण असे न करता भरपूर पाणी प्यावे, याने सुद्धा पोट दुखणे कमी होते.
८) संतुलित आहार घेणे –
नियमितरित्या पौष्टिक, संतुलित आहार घेणे कधीही चांगलेच. आवश्यक असलेले सगळे व्हिटॅमिन, मिनरल्स अनैसर्गिक पद्धतीने घेण्यापेक्षा आहारातून घेणे जास्त फायद्याचे ठरते. त्यामुळे पौष्टीक आहाराला प्राधान्य दिल्यास उत्तम.
याशिवाय ताजी फळं, अळीवाची खीर किंवा लाडू, अशोकारिष्ट हे सगळे घरगुती आणि पारंपरिक उपायही तुम्ही करून पाहू शकता.
९) औषधी वनस्पतींचा उपयोग –
मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास कमी करण्यासाठी सगळ्यात गुणकारी पद्धत, म्हणजे आहारात औषधी वनस्पतींचा समावेश करून घेणे.
बडी शेप, केमोमाईल टी याशिवाय आलं, पुदिना यांचा वापर तुम्ही करू शकता.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.