Site icon InMarathi

उपवास असो किंवा नसो, शरीर सुदृढ ठेवण्यासाठी हा पदार्थ सर्वांनी खायलाच हवा!

rajgira featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

उपवास म्हंटलं की आपसुकच आपण साबुदाण्याची खिचडी, भगर (ज्याला वरीचा भात म्हणूनही ओळखतात), फळं, फळांचे रस, शिंगाड्याचा शिरा, बटाट्याची भाजी या सगळ्यांकडे वळतो.

पण उपवासाला एक अत्यंत पोष्टीक पदार्थ सुद्धा मोठ्या आवडीने खाल्ला जातो तो म्हणजे “राजगिरा”. राजगिऱ्याला ग्रीक भाषेत “अॅमरँथ” म्हणतात, ज्याचा अर्थ “अमर” असा होतो.

 

 

राजगिऱ्याच्या पोश्टिक गुणांमध्ये माणसाचे शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आवश्यक असणारे बरेच घटक असल्यामुळे हे एक उत्तम अन्नपदार्थ आहे ज्यामुळे त्याला हे नाव दिलेले आहे.

जाणून घेऊया राजगिऱ्याचे फायदे. हे वाचून तुम्ही आवडीने राजगिऱ्याचा आपल्या आहारात समावेश करून घ्याल.

१) कॅल्शिअम –

राजगिरा कॅल्शिअम चे एक अतिउत्तम स्त्रोत आहे. दुधाहून तीन पट अधिक प्रमाणात कॅल्शियम हे राजगिऱ्यात आढळते. ज्यामुळे ऑस्टीओपोरोसिस म्हणजेच चाळिशी नंतर हाडं झिजण्याचा हा रोग आपल्याला होण्यापासून टाळता येतो.

कॅल्शिअम च्या गोळ्या जरी पर्याय वाटत असल्या तरी त्या अनैसर्गिक आहेत व त्यांचे किडनी स्टोन सारखे दुष्परिणाम सुद्धा आहेत. त्यामुळे राजगिऱ्याचा वापर आहारात केल्यास ही उणीव भरून निघेल.

 

२) अँटी ऑक्सीडंट्स –

राजगिऱ्यात अँटीऑक्सीडंट्स भरपूर असल्याने हृदय विकार, फ्री रॅडीकल्स वाढून होणारा कॅन्सर, दृष्टी कमजोर होणे, त्वचा उन्हामुळे काळवणणे या सगळ्यांशी आपला बचाव करण्यासाठी अत्यंत उपयोगाचे असतात.

त्यामुळे राजगिऱ्याचे नियमित सेवन करायलाच हवे.

३) व्हिटॅमिन सी –

रोगप्रतकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी ची शरीराला अत्यंत आवश्यकता असते. लिंबू, संत्री, आवळा यांसारख्या आंबट फळांतून आपल्याला ते मिळू शकते पण काही लोकांना आंबट फळांचे सेवन केल्यास घशाचे आजार होतात.

तेव्हा मदतीला येतो राजगिरा. राजगिऱ्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. धांन्यांमध्ये मुगाच्या डाळी नंतर राजगिऱ्यातच व्हिटॅमिन सी आढळते.

४) अमिनो अॅसीड्स –

अमिनो अॅसिड हे गट हेल्थ, न्यूट्रीएंट्स अब्सोर्ब करणे, टिश्यू रिपेअर करणे यांसारखे महत्त्वाचे कार्य करत असतात. राजगिऱ्यात अमिनो अॅसिड सुद्धा योग्य प्रमाणात आढळतात.

ज्याचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीराला नक्कीच फायदा होऊ शकतो.

५) रक्त शर्करा नियंत्रणात ठेवणे –

 

 

ज्यांना डायबीटीसचा त्रास आहे त्यांनी आपल्या शुगर क्रेविंग्ज भागवण्यासाठी राजगिरा नक्की खावा. यात प्रोटीन सुद्धा भरपूर असते. ज्यामुळे इन्सुलिन व्यवस्थित सिक्रिट होऊन, रक्तातील शुगर नियंत्रणात राहते.

६) आयर्न –

राजगिऱ्यात आयर्न चे प्रमाण इतर खाद्य पदार्थांपेक्षा पाच पट असते. ज्यामुळे लाल रक्त पेशींचे प्रोडक्शन अगदी कंट्रोल मध्ये राहते व आपल्याला अॅनिमिया होत नाही.

७) इतर मीनरल्स –

राजगिरा एक “ऑल इन वन” असा अन्न प्रकार आहे. यात मॅग्नेशियम, मॅग्नीज, फॉस्फरस, आयरन, सेलेनीयम, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, कॉपर हे सगळे अतिशय संतुलित प्रमाणात वापरते.

त्यामुळे याला पूर्णान्न म्हणायला हरकत नाही. इतका पोषक राजगिरा आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.

८) इन्सुलिन रेझिस्टन्सवर अत्यंत गुणकारी उपाय –

प्रोटीन व कार्बोहायड्रेट्स योग्य प्रमाणात असल्यामुळे नुसता राजगिरा किंवा राजगिऱ्यापासून बनलेला कुठलाही पदार्थ खाल्ला की भरपूर वेळे पर्यंत आपले पोट भरलेले वाटते व भूक लागत नाही.

ज्यांना इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास आहे त्यांना नेमकं दिवसातून दोन वेळाच खाण्याची गरज असते. अशा लोकांनी तर राजगिरा रोज खायला हवा.

जेणेकरून पोट भरपूर वेळ पर्यंत भरलेले राहील व सारखी भूक लागून, सारखे खाणे होणार नाही आणि इन्सुलिन सीक्रीशन कमी होईल.

याच कारणामुळे उपावसात राजगिरा खाण्याला प्राधान्य देतात. ज्यामुळे सारखी भूक लागत नाही.

९) वजन कमी करण्यासाठी –

 

 

राजगिऱ्यात प्रोटीन्सची मात्रा अधिक असते व फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स हे अत्यंत संतुलित प्रमाणात असतात.

याने इन्सुलिन चे सीक्रीशन नियंत्रणात असून, भूक कमी लागून, आपले वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी राजगिरा रोज खावा.

राजगिरा वापरण्याचे पर्याय –

१) लाडू – राजगिरा आणि गुळाचा पाक यांचे लाडू करून घेऊ शकता. सकाळ संध्याकळ भूक लागते तेव्हा एक लाडू खाल्ला की भूकही भागेल व हेल्दी फूड खाल्ल्याचे समाधानही मिळेल.

२) राजगिरा वडी – काही ड्राय फ्रूट्स घालुन, गुळाच्याच पाकात राजगिऱ्याची वडी केली तर मुलांनाही काही नवीन खाल्ल्या सारखे वाटेल. व हा पौष्टिक पदार्थ त्यांना आवडू लागेल ज्यामुळे त्यांच्या आहाराची फारशी चिंता तुम्हाला करावी लागणार नाही.

३) राजगिरा थालिपिट – राजगिऱ्याचे पीठ दळून आणू शकता किंवा आजकाल ते बाजारातही उपलब्ध असते त्यामुळे सहजच मिळते.

 

 

राजगिरा पिठात, इतर थालीपीटा प्रमाणेच मिरचीचे काप, मीठ, तिखट, जिरे घालून थालिपिठ करून घेऊ शकता.

४) दूध लाह्या – राजगिऱ्याच्या लाह्या सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. ज्या मुलांना दूध पिण्याचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत फायद्याचा ठरेल.

आपल्या मुलांना राजगिऱ्याच्या लाह्या, दूध व चवी पुरती साखर घालून द्या. क्षणात फस्त केल्या जातील. नास्ता, चार वाजताची भूक भागवण्यासाठी हा एक सोपा पर्याय आहे.

याशिवाय राजगिऱ्याचा शिरा, खीर, कढी, यात राजगिऱ्यात दुधी भोपळ्याचा किंवा कशाचाही किस घालून हलवा, राजगिरा आणि गव्हाचे बिस्कीट, पुरी, खांडवी, सलाद असे अनेक अनेक पदार्थ करून खाऊ शकता.

आणि राजगिऱ्याचे नियमित सेवन करून सुदृढ राहून, दवाखान्यात वाया जाणारा पैसा वाचवू शकता.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version