आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सोशल मीडिया आणि ट्रोलिंग हे काही सध्या आपल्याला नवीन नाही. कोरोना महामारी मुळे तर लोकांनी ह्या सोशल मीडियाचा पुरेपूर फायदा करून घेतला आणि वेगवेगळे मीम्स फॉरवर्ड करून धमाल आणली!
सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि त्यात परवडणार इंटरनेट असल्याने ह्या मीम्स बनवणाऱ्या लोकांना एक वेगळंच उधाण आल्याच दिसत आहे!
सामान्य माणूस असो किंवा सेलिब्रिटी. ट्रोलिंग करायचं म्हंटल की ते कसंही होत असतं. आणि राजकारणी लोकांच्या बाबतीत ट्रोलिंगला तर काही मर्यादा नसतातच बहुतेक!
शरद पवार, ठाकरे परिवार, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, राहुल गांधी आणि परिवार ही मंडळी तर ह्या ट्रोलकऱ्यांच्या रडारवरच असतात.
सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणात झालेली उलथापालथ, कोरोना महामारी मुळे समोर आलेली सरकारची असमर्थता, शिवाय बलिवूड ड्रग कनेक्शन, सुशांत सिंग केस यामुळे सध्या राजकीय वर्तुळात होणारं ट्रोलिंग हे सोशल मीडिया वर खूप अनुभवायला मिळतंय!
काही विवादीत वक्तव्य केल्याने संजय राऊत तर इतके ट्रोल झाले की गेले काही दिवस त्याबद्दल सोशल मीडिया वर भरभरून बोललं जात होतं!
नुकतंच राहुल गांधीच्या पडण्यामुळे झालेलं ट्रोलिंग असो वा पंतप्रधान मोदींनी कॅमेरा ला हात दाखवल्यामुळे होणारं ट्रोलिंग असो. हे ट्रोलिंग प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं याचे दाखले आपण गेल्या काळात बघितले आहेत!
हे सगळे राजकीय नेतेच नव्हे तर या नेत्यांच्या घरच्या मंडळींना सुद्धा ह्या ट्रोलिंगचा त्रास सहन करावा लागतो. कारण पब्लिक फिगर असल्या कारणाने त्यांची पर्सनल लाईफ सुद्धा लोकांसमोर येते आणि मग त्यांच्या घरची लोकं सुद्धा ह्या अशा ट्रोलिंगचा हिस्सा बनतात!
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस ह्यांना सुद्धा सोशल मीडियावर सतत ह्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो!
त्यांच्या पत्नी ह्या फॅशन इंडस्ट्री मध्ये कार्यरत असल्याने त्यांच्यावर कित्येक वैयक्तिक शेरे मारले जातात. त्यांनी केलेल्या कविता, त्यांनी म्हंटलेली गाणी तसेच त्यांनी केलेल्या पोस्ट वरुन सुद्धा त्यांना या आधीही बऱ्याचदा ट्रोल केलं आहे!
पण नुकतंच अमृता फडणवीस ह्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेज वर एका ग्लॅमरस ड्रेसच्या लुकमध्ये फोटो शेयर केला. त्यावरून सुद्धा कित्येक लोकांच्या विचित्र कमेंट्सना त्यांना सामोरं जावं लागलं आहे!
ही आहे अमृता फडणवीस यांची पोस्ट :
अमृताजी ह्यांची ही ट्रोल व्हायची पहिली वेळ नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना याबाबत विचारणा देखील होत असेल. अर्थात, फडणवीसांनी नेहेमीच हा प्रकार हसण्यावरच नेला होता.
यावेळी देखील, अमृता फडणवीस अश्याच ट्रोल होताना दिसत आहेत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.