जाणून घ्या इमारतींबाहेर ‘असे’ रस्ते असण्यामागचं कारण!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
काही वेळा आपण अनेक गोष्टी पाहतो, त्याबाबत आपल्या मनात शंकाही निर्माण होतात, पण त्या शंका मोकळेपणाने न विचारल्यानं आपल्याला अनेक गोष्टींचं ज्ञान होत नाही.
आपलं घऱ, इमारतंं आणि आजुबाजुच्या अनेक गोष्टींबाबत आपल्या अनेक प्रश्न पडतात.
जरा आठवून बघा.
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की बहुतांश इमारतींबाहेर लोखंडी पाईप लावलेले असतात.
खासकरून ही गोष्ट तुम्हाला सरकारी कार्यालये, इस्पितळे, शाळा, महाविद्यालये यांच्या इमारतींजवळ आढळून येईल.
या लोखंडी पाईपांमध्ये अगदी छोटीशी फट असते. म्हणजे एक प्रकारे लोखंडी पाईपांचा रस्ताच तयार केलेला असतो म्हणा ना, म्हणजे त्यावरून गाडी जाऊ शकेल.
पण तुमच्या मनात कधी असा विचार आलंय का की हे लोखंडी पाईप असे भर गेटवर लावायचे कारण काय? त्यांच्या नेमका उद्देश काय असेल?
या लोखंडी पाईपच्या सिस्टमला cattle grids किंवा cattle guards असं म्हटलं जातं.
यांचा उपयोग जनावरे आत येऊन नये यासाठी केला जातो.
सोसायटी किंवा कार्यालयांच्या गेटमधून आत येणारी जनावरं तुम्ही पाहिली आहेत का?
तुमच्या इमारतीतही अनेकदा भटकी कुत्री, गाई, म्हैस येत असतील.
अशा जनावरांना अनेकदा हाकलूनही त्यांच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही.
या प्राण्यांना वारंवार हाकलवून लावलं तरी हे प्राणी येतातचं.
मग अशावेळी करायचं काय? ही चिंता अनेकांना लागलेली असते. मात्र अशावेळी सोसायटीबाहेर उभारण्यात आलेल्या लोखंडी पट्ट्या हा सर्वाधिक चांगला उपाय आहे.
कारण लोखंडी पट्ट्यांवरून चालणं जनावरांना अशक्य आहे, ही बाब लक्षात आली, आणि या लोखंडी पट्ट्यांचा वापर सुरु झाला.
जनावरांचे पाय अगदी सरळ असतात, त्यामुळे यांवरून जर त्यांनी चालायचा प्रयत्न केला तर चालताना त्यांचे पाय लोखंडी पाईपांच्या फटीमध्ये अडकतात.
त्यामुळे जनावरे हा लोखंडी पाईपचा रस्ता पार करू शकत नाही.
याउलट मनुष्याच्या पायाची ठेवण ही वेगळी आहे, ज्यामुळे तो सहज हा लोखंडी पाईपचा रस्ता पार करू शकतो.
गाड्यांना देखील गोल चाकांमुळे यावरून जाताना त्रास होत नाही.
त्यामुळे आपल्यासाठी सोपा असलेला हा रस्ता जनावरांसाठी मात्र अवघ़ड आहे.
त्यामुळे हा उपाय तुम्हा जर तुमची सोसायटी, कार्यालय वा अन्य कोणत्याही ठिकाणी अवलंबविलात, तर तुमच्या अंगणात येणा-या प्राण्यांची भिती उरणारच नाही.
भारतात आपल्याला सगळीकडे जनावरे भटकताना पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांनी इमारतीच्या आवारात सहज प्रवेश करू नये म्हणून ही युक्ती लढवण्यात येते.
परदेशात अनेक ठिकाणी एका वेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो. ज्या रस्त्यावर असे लोखंडी पाईप लावणे शक्य नाही, तेथे जनावरांना भ्रमित करणाऱ्या पट्ट्या आखल्या जातात. त्यामुळे ते स्वत:च त्यापासून दूर राहतात.
आता तुमच्या लक्षात आलं असेल की, हे लोखंडी पाईप एकप्रकारे लक्ष्मणरेषेचं काम करतात.
ही नामी शक्कल लढविल्यास तुमच्या नकळत, इमारतीच्या आवारात शिरणा-या प्राण्यांचा धोका तुम्हाला कधीही जाणविणार नाही.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.