वातावरणाचा अंदाज लावतानाच्या ‘या’ अंधश्रद्धा चक्क वैज्ञानिक दृष्टीने योग्य आहेत !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

हवामानाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न मानव फार पूर्वीपासूनच करत आहे. अर्थात ते स्वाभाविकही आहे कारण हवामान हे मानवाच्या जगण्यावर परिणाम करत असते.

शेतीपासून पर्यावरणातील इतर अनेक घटकांमुळे हवामानाच्या आधारे संपूर्ण गोष्टींचा निर्णय घ्यावा लागत होता.

जेव्हा हवामान तज्ञ नव्हते, हवामान शास्त्र म्हणूनही काही अस्तित्वात नव्हते तेव्हापासूनच मानवाने आपल्या परीने हवामानाचा अंदाज घेण्याचा सतत प्रयत्न केला आहे.

काळानुरूप हवामानाभोवती अनेक अंधश्रद्धा आणि धार्मिक श्रद्धा देखील बनविल्या गेल्या आहेत.

 

Why sky is Blue.Inmarathi1
wallpapertag.com

जरी आजच्या हवामान शास्त्राने जुन्या काळातील हवामान विषयीची अनेक मते कालबाह्य ठरले आहेत तरी त्यापैकी काही मते खरोखरच वैज्ञानिकदृष्ट्या सत्य असल्याचे सिद्ध झाले आहेत.

प्राचीन काळी मानवाने अनुभवातून, तर्कानुसार हवामानाविषयी आपली काही मते बनवली. जस-जशी विज्ञानाची प्रगती होत गेली तेव्हा हवामानाचा विज्ञानाच्या कसोटीवर अभ्यास करून आपण हवामान शास्त्र निर्माण केले.

तेव्हा काही जुनी मते कालबाह्य ठरली तर काही मते वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाली आहेत.

त्यापैकीच प्राचीन काळी मानवाला ज्ञात असलेली आणि आता वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेली हवामानाविषयी काही मते आपणास माहीत असायला हवीत.

  • सकाळी आकाश लाल असेल तर तो नाविकांना धोक्याचा इशारा असतो.

 

Sunset colours.Inmarathi
static.rootsrated.com

सकाळी आकाश लाल असेल तर तो नाविकांना धोक्याचा इशारा असतो, तेच आकाश जर तिन्हीसांजेला लाल दिसले तर नाविक सुखावतो.

आकाशातील लाल घटकामुळे वातावरणातील लहान कणांद्वारे प्रकाशाचे विखुरलेले किरण दिसून येतात.

तथापि, जेव्हा सूर्योदय लाल असतो तेव्हा ते अधिक दबावाकडून कमी दबाव होत असल्याचे निर्देशित करते. याचा संभाव्य परिणाम म्हणजे वादळांसाठी मार्ग दर्शवितात. म्हणजे या भागात वादळ येण्याची शक्यता आहे.

अशावेळी धोक्याचा इशारा समजून नाविक समुद्रात जाण्याचे  टाळतात.

जेव्हा तिन्हीसांजेला आकाश लाल होते तेव्हा ते दर्शवते की प्रदेश शुष्क आहे. आपण पाहत असलेल्या ठिकाणापासून ते सूर्यांदरम्यान उच्च वातावरणीय दबाव आहे, असा त्याचा अर्थ आहे.

मध्य-अक्षांश क्षेत्रात हवामान दिशा पश्चिमेपासून पूर्वेकडे जात असल्याने, हवामानाच्या स्थितीनुसार नौकाविहारासाठी तसेच नाविकांना समुद्रात नाव पुढे नेण्यासाठी वातावरण स्वच्छ असल्याने पुढे जाण्याचा संदेश आहे.

आधीच नमूद केल्याप्रमाणे, हा सल्ला केवळ मध्य-अक्षांशांमध्ये कार्य करतो. जे युरोप, उत्तर अमेरिका, आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेकडील भागांसाठी उपयुक्त आहे.

हा सल्ला ध्रुव प्रदेश किंवा उष्ण कटिबंधांवर लागू होत नाही कारण हवामान तेथे विपरीत दिशेने प्रगती करत  असते. त्या क्षेत्रातील नाविकांनी या सल्ल्याच्या उलट  इशारे असल्याचे समजावे.

  • वाईट हवामानाचा हाडांवर परिणाम होणे.

 

health.clevelandclinic.org

हवामान बदलले की अनेकांना हाडांचा त्रास सुरू होतो. विशिष्ट हवामानाच्या परिस्थितीत काही आजार अधिक बळावण्याची लक्षणे दिसून आली आहेत.

लोक आजही असा दावा करतात की त्यांना त्यांच्या शारीरिक व्याधी वरून हवामानाचा अंदाज येत असतो. त्यांच्या सांधेदुखी, साइनस, डोकेदुखी आणि अगदी दात यांमध्ये हवामान बदलल्याने त्रास होतो.

कारण आपले शारीरिक द्रव सतत स्थिर राहतात आणि सभोवतालचे वायु दाब आपल्यावर परिणाम करत असतात.

म्हणूनच, आपल्या सभोवतालच्या वातावरणात काही प्रमाणात बदल झाला तेव्हा आपल्या शरीरातील उती हवामान बदलाला प्रतिसाद देतात. यातूनच आपल्याला हवामान बदलामुळे निरनिराळ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

  • रातकिडे थर्मामीटरचे देखील काम करतात.

रातकिड्यांचे हे ओळखण्याजोगे आवाज म्हणजे आपण झोपण्याच्या प्रयत्नात असताना आपण सर्वांनी, उद्यानात, आपल्या बेडरूमच्या खिडकीच्या बाहेर, कधी आपल्या शेतात ऐकले आहेत.

तथापि, विशिष्ट तापमानातील बदलांनुसार रातकिड्यांचे हे आवाज आपणास वेगवेगळ्या प्रकारे ऐकू आले आहेत का?

रातकिड्यांचे हे आवाज कधी आपल्या साथीदारांना धोक्याचा इशारा देणारे असतात तर विशिष्ट ऋतूत रातकिडे प्रणय करण्यासाठी मादीला आमंत्रित करत असतात.

 

firefly_inmarathi
amnh.org

यावरूनही वैज्ञानिकांनी निष्कर्ष काढले आहेत की, रातकिड्यांच्या  आवाजातील लयीवरून बाहेरच्या तापमानाचा आपणास अंदाज येऊ शकतो.

वैज्ञानिकांना असे दिसून आले आहे की उष्ण वातावरणात रात किडे वेगाने वाढतात आणि थंडी वाढली की त्यांची वाढ कमी वेगाने होते.

ओसेंथस फुल्टन ही रातकिड्यांची एक प्रजाती आहे, त्यांचा एका लयीत असणारा आवाज आणि तापमान यांच्यात थेट संबंध आहे.

काही विशिष्ट प्रजातींमध्ये हा लयबद्ध आवाज आणि तापमान यांचा संबंध १८ ते ३२अंश सेल्सियस या रेंजमध्ये  असतो.

या संबंधांवरून वातावरणीय तापमानाशी संबंधित संख्येसाठी देखील एक सूत्र तयार  केले गेले आहे. खालीलप्रमाणे सूत्र आहे:

टी = (५० + एन -४०) / ४

येथे, टी फारेनहाइट मधील तापमान दर्शवितो आणि एन प्रति मिनिट रातकिड्यांच्या लयबद्ध आवाजाची संख्या दर्शवितो.

१४ सेकंदांमध्ये होणाऱ्या रातकिड्यांच्या लयबद्ध आवाजाची संख्या मोजली पाहिजे आणि त्यात फारेनहाइट तापमान  मोजण्यासाठी ४० ने जोडावे.

सेल्सियस तापमानात गणना करण्यासाठी, एखाद्याने २५ सेकंदात लयबद्ध आवाजाची संख्या मोजली पाहिजे, येणाऱ्या क्रमांकाला ३ ने विभाजित करा आणि नंतर परिणामी मूल्यामध्ये ४ जोडा.

म्हणून, पुढच्या वेळी जेव्हा रातकिड्यांचा आवाज ऐकू येईल तेव्हा त्या  आवाजाची तीव्रता, संख्या मोजा आणि बाहेरच्या तापमानाची मोजणी करण्याचा प्रयत्न करा!

  • सूर्य किंवा चंद्राच्या भोवती असणारे मंडल पावसाची सूचना करतात

सूर्य किंवा चंद्राच्या भोवतालची प्रभामंडळ एका विशिष्ट स्वरुपाच्या ढगांद्वारे तयार केले जाते. या ढगांचे निसर्गाचे स्वरूप म्हणजे ते स्फटिकीय आणि बर्फ़ाच्या स्फटिकाने बनलेले असतात.

कधी कधी दिवसाच्या वेळी, प्रकाशाच्या सानिध्यात सूर्याच्या भोवती हे वर्तुळ दिसते.

 

sun-inmarathi
photo.com

हे बर्फ़ाचे स्फटिक सामान्यत: ढगांच्या समान पातळीत असतात तेव्हा होतात. सहसा, जेव्हा ढग एकत्र होतात तेव्हा ते निम्न-पातळीचे, कमी-दाबाचे क्षेत्र तयार करतात, जे आसपासच्या वातावरणातून हवेला ओढतात.

एकत्रित हवा वाढते म्हणून वाफ तयार करण्यासाठी पाणी थंड होते. हे पाणी वातावरणाच्या उच्च, थंड क्षेत्रांवर जात राहिल्यास तिथे बर्फ़ाचे स्फटिक तयार होण्यास सुरुवात होते.

ढगांमुळे उंचावर हवा असल्याने ही सूर्य अथवा चंद्राभोवती वर्तुळाकार तयार होण्याची घटना आणि पावसाचा संबंध निर्माण करते.

आपल्याला जाणवणारे असे काही अंदाज असतील तर त्यांची वैज्ञानिकदृष्टया सिद्धांताशी सांगड घालण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून जुनं ते सर्व काही टाकाऊ नाही आणि जुनं तेच सोनं असंही नाही हे आपल्याला लक्षात येईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?