सरळ वाचली तर ‘रामकथा’ आणि उलट वाचली तर ‘कृष्णकथा’-“हा” ग्रंथ म्हणजे प्रतिभेचा उत्कृष्ट नमुनाच!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रामायण आणि महाभारत हे हिंदूंचे पवित्र ग्रंथ तर तुम्हाला माहित आहेतच. वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणामध्ये रामाच्या संपूर्ण जीवनाचे वर्णन केलेले आहे. त्यांनी ही रामाची कथा सुरेख पद्धतीने मांडली आहे.
तसेच महाभारताच्या पहिल्या अध्यायामध्ये व्यासांनी श्रीकृष्णाच्या अपार लीलांची ओळख करून दिली आहे.
श्रीकृष्णाचे राधेवरचं प्रेम, कंसाचा वध आणि त्यांचा मथुरा ते द्वारका प्रवास याबद्दल सर्वकाही त्यात समाविष्ट आहे.
पण तुम्हाला माहित आहे की, असा ही एक ग्रंथ आहे जो सरळ वाचला तर रामाची कथा उलगडतो आणि उलटा वाचला तर श्रीकृष्णाची कथा सांगतो. या ग्रंथाचे नाव राघवयादवीयम् असे आहे.
१७ व्या शतकामध्ये कांचीपुरमच्या वेंकटाध्वरी यांनी राघवयादवीयम् हा अद्भुत ग्रंथ रचला होता.
या ग्रंथाचे नाव राघवयादवीयम् यामुळे पडले कारण हा ग्रंथ राघव म्हणजे रघु-वंशामध्ये जन्मलेल्या प्रभू रामाच्या रामायणाशी निगडीत आहे आणि यादव म्हणजे यदु-वंशामध्ये जन्मलेल्या श्रीकृष्णाच्या महाभारताशी निगडीत आहे.
या ग्रंथामध्ये ३० श्लोक आहेत, जे सरळ वाचले तर रामाची कथा सांगतात आणि उलटे वाचले तर कृष्णाची कथा सांगतात. याप्रमाणे या ग्रंथाचे उलट आणि सुलट असे दोन्ही श्लोक पकडले तर एकूण या ग्रंथामध्ये ६० श्लोक आहेत.
ग्रंथाचा पहिला श्लोक खाली दिल्याप्रमाणे आहे.
वन्देऽहं देवं तं श्रीतं रन्तारं कालं भासा यः ।
रामो रामाधीराप्यागो लीलामारायोध्ये वासे ।। १ ।।
या श्लोकाचा अर्थ असा आहे की,
मी भगवान रामांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांना प्रणाम करतो, ज्यांच्या हृदयामध्ये सीता देवीचा वास होता.
त्यांनी सह्याद्रीच्या डोंगरांकडे प्रस्थान केले, ते लंकेला पोहचले, त्यांनी रावणाचा वध केला आणि वनवास पूर्ण करून ते अयोध्येला परत आले.
ग्रंथाचा पहिला उलटा श्लोक खाली दिल्याप्रमाणे आहे.
सेवाध्येयो रामालाली गोप्याराधी मारामोरा ।
यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वन्देहं देवं ।। १ ।।
या श्लोकाचा अर्थ असा आहे की,
मी भगवान श्रीकृष्णांना प्रणाम करतो, ज्यांना रुक्मिणी आणि गोपिका पूजत होत्या. लक्ष्मी देवी त्यांच्या हृदयामध्ये वास करते.
प्रत्येकवेळी त्यांच्याबरोबर विराजमान असते. तसेच त्यांचे सौंदर्य हे सर्व दागिन्यांच्या सौंदर्यापेक्षा सुरेख आहे.
—
ग्रंथाचा दुसरा श्लोक खाली दिल्याप्रमाणे आहे.
साकेताख्या ज्यायामासीद्याविप्रादीप्तार्याधारा ।
पूराजीतादेवाद्याविश्वासाग्र्यासावाशारावा ।। २ ।।
या श्लोकाचा अर्थ असा आहे की,
पृथ्वीवर अयोध्या नावाचे शहर आहे, जेथे ब्राम्हण राहतात, ज्यांन वेदांची जाण आहे. येथे व्यापारी सुद्धा येथे राहतात.
अजाचा पुत्र दशरथ याचे हे निवासस्थान आहे, येथे देव यज्ञामध्ये भाग घेण्यासाठी येतात आणि पृथ्वीवरील हे महत्त्वाचे शहर आहे.
ग्रंथाचा दुसरा उलटा श्लोक खाली दिल्याप्रमाणे आहे.
वाराशावासाग्र्या साश्वाविद्यावादेताजीरापूः ।
राधार्यप्ता दीप्राविद्यासीमायाज्याख्याताकेसा ।। २ ।।
या श्लोकाचा अर्थ असा आहे की,
द्वारका शहर पृथ्वीवरील सर्व शहरांमध्ये सर्वात प्रसिद्ध शहर आहे. घोडे आणि हत्ती यांच्या विपुल मात्रेमुळे हे शहर उल्लेखनीय आहे. हे स्थान म्हणजे विद्वानांची नगरी, श्री कृष्णाचे निवासस्थान आणि अध्यात्मिक ज्ञानाचे मंदिर आहे, जे समुद्राच्या मध्यभागी वसलेले आहे.
—
ग्रंथाचा तिसरा श्लोक खाली दिल्याप्रमाणे आहे.
कामभारस्स्थलसारश्रीसौधासौघनवापिका ।
सारसारवपीनासरागाकारसुभूरुभूः ।। ३ ।।
या श्लोकाचा अर्थ असा आहे की,
अयोध्या शहरामध्ये विपुल मात्रेमध्ये घरे आहेत, संपत्ती आणि गौरवासाठी ही नगरी प्रसिद्ध आहे. येथे राहणाऱ्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

ग्रंथाचा तिसरा उलटा श्लोक खाली दिल्याप्रमाणे आहे.
भूरिभूसुरकागारासनापीवरसारसा ।
कापिवानघसौधासौ श्रीरसालस्थभामका ।। ३ ।।
या श्लोकाचा अर्थ असा आहे की,
द्वारकेमधील घरांमध्ये पूजा करण्यासाठी विशिष्ट जागा आहे आणि या नगरात मोठ्या प्रमाणात ब्राम्हणांची वस्ती आहे. येथे कमळाची फुले सर्वत्र नजरेस पडतात.
या नगरामध्ये सारं काही आलबेल असून सकाळच्या प्रहरी हे शहर सोन्यासारखे चमकते.
अश्या प्रकारे या ग्रंथातील कोणताही श्लोक घ्या, तुम्हाला श्री कृष्ण आणि श्री राम यांची कथा वाचण्यास मिळेल, खाली ग्रंथातील अधिक काही श्लोक देत आहोत, ज्यावरून आपणास अधिक कल्पना येईल.
ग्रंथाचा चौथा श्लोक खाली दिल्याप्रमाणे आहे.
रामधामसमानेनमागोरोधनमासताम् ।
नामहामक्षररसं ताराभास्तु न वेद या ।। ४ ।।
ग्रंथाचा चौथा उलटा श्लोक खाली दिल्याप्रमाणे आहे.
यादवेनस्तुभारातासंररक्षमहामनाः ।
तां समानधरोगोमाननेमासमधामराः ।। ४ ।।
ग्रंथाचा पाचवा श्लोक खाली दिल्याप्रमाणे आहे.
यन् गाधेयो योगी रागी वैताने सौम्ये सौख्येसौ ।
तं ख्यातं शीतं स्फीतं भीमानामाश्रीहाता त्रातम् ।। ५ ।।
ग्रंथाचा पाचवा उलटा श्लोक खाली दिल्याप्रमाणे आहे.
तं त्राताहाश्रीमानामाभीतं स्फीत्तं शीतं ख्यातं ।
सौख्ये सौम्येसौ नेता वै गीरागीयो योधेगायन् ।। ५ ।।
वानगी दाखल फक्त ५ श्लोक दिले आहेत. संपूर्ण ६० श्लोकांचा हा ग्रंथ असाच अद्भुत प्रतिभेचा नमुना आहे.
तर मंडळी संधी मिळाल्यास एक जिज्ञासा म्हणून या ग्रंथाचे नक्की वाचन करा.
हा ग्रंथ मोफत डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : ॥ राघव यादवीयं (कवि वेंकटाध्वरि ) ॥
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Nice article with Marathi meanings of shlokas
Very nice information.all send to story’s.and best work for you.
Superb !