' १०० वर्षांपासून चालत आलेला ऑलिम्पिकचा लोगो, वाचा त्याची रंजक कहाणी – InMarathi

१०० वर्षांपासून चालत आलेला ऑलिम्पिकचा लोगो, वाचा त्याची रंजक कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सध्या जगात कोरोना व्यतिरिक्त कशाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे टोकीयो ऑलिम्पिक २०२० ची. ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशीच वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने देशाला पहिल पदक मिळवून दिल्यानंतर ऑलिम्पिकची चर्चा भारतभर होऊ लागली.

 

mirabai-chanu-1 InMarathi

 

गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे अख्खं जग संकटात सापडले होते, तेव्हा अनेक शहरांमध्ये लॉकडाउन करण्यात आले होते, त्यामुळे अनेक व्यवसाय व इतर क्षेत्रांवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. महामारीचा फटका हा क्रीडा क्षेत्रालाही बसला, अनेक छोट्या-मोठ्या स्पर्धा एकतर रद्द कराव्या लागल्या किंवा पुढे ठकल्याव्या लागल्या होत्या. त्याचप्रमाणे २०२० मध्ये पूर्व नियोजित ऑलिम्पिक स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली होती आणि ती या वर्षी जपानच्या टोकीयो शहरात खेळवण्यात येत आहे.

 

olympics 2020 inmarathi

 

काहीश्या अनिश्चित वातावरणात, अनेक निर्बंधासह आणि प्रेक्षकांशिवाय टोकीयो ऑलिम्पिक ही स्पर्धा २३ जुलैपासून सुरु झाली. जगातील २०५ देशांचे खेळाडू आपले कौशल्य दाखवण्यासाठी टोकीयोच्या मैदानात उतरले आहेत.

 

olympic inmarathi

हे ही वाचा – ११ खेळाडूंचा बळी घेणारी ती ऑलिम्पिकची रात्र आजही अंगावर काटा आणते!

ऑलिम्पिक म्हटलं की पहिले आपल्या डोळ्यासमोर येतात ते त्याची पदके, प्रत्येक खंडातुन जाणारी मशाल आणि ते परस्पर जोडलेले पाच वेगवेगळ्या रंगाच्या रिंग्ज म्हणजेच ऑलिम्पिकचा लोगो. पण त्या लोगोचा इतिहास आपल्याला माहिती आहे का? तो ऑलिम्पिकचा लोगो कधी व कसा तयार झाला, त्यात किती बदल करण्यात आले, त्याचा अर्थ काय, त्याचे महत्त्व काय, त्या पाच वेगवेगळ्या रंगाच्या रिंग्जचा नेमका अर्थ काय, अशी त्या लोगोमागची सगळी कहाणी आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

स्पर्धेचा जन्म

आताच्या आधुनिक काळातील ऑलिम्पिक स्पर्धेची मुळ संकल्पना प्राचीन काळातील इ.स.पुर्व ८व्या शतकातील ग्रीसमधल्या ऑलिंपिया या स्पर्धेपासून घेण्यात आलेली आहे. ऑलिंपिया या स्पर्धेत इतर अनेक राज्यातील खेळाडू सहभागी होत असे.

 

bareen inmarathi

 

बॅरन पियरे डी कौबर्टिन आणि डेमेट्रिओस विकेलस यांनी १८९४ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) या गैर-सरकारी क्रीडा संस्थेची स्थापना केली आणि १८९६ मध्ये ग्रीस देशाच्या अथेन्स या शहरात ज्या ठिकाणी प्राचीन काळात ऑलिंपिया स्पर्धा होत असे तेथे पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन झाले व तेव्हा पासून ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात झाली.

ऑलिम्पिक स्पर्धा ही दर ४ वर्षानी आयोजित केली जाते. आयओसी ही संस्था ऑलिम्पिक स्पर्धेचे नियामक मंडळ आहे, तेच स्पर्धेच्या आयोजनाचे सर्व नियम, लोगो व इतर अनेक गोष्टी ठरवतात.

सर्व परिचित पारंपरीक ऑलिम्पिकचा लोगोची म्हणजे परस्पर जोडलेले पाच वेगवेगळ्या रंगाच्या रिंग्ज याची निर्मिती आयओसीचे संस्थापक बॅरन पियरे डी कौबर्टिन यांनी १९१३ मध्ये केली. ऑलिम्पिकच्या लोगोची पांढरी पार्श्वभूमी आहे ज्यामध्ये पहिल्यांदा निळ्या, काळा आणि लाल रंगांच्या रिंग असतात आणि दुसऱ्या रांगेत पिवळा आणि हिरवा.

हे रंग सहभागी प्रत्येक देशाच्या ध्वजामधून घेतेलेले आहेत. हे रंग ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेणार्‍या प्रत्येक देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले गेले होते जे आंतरराष्ट्रीय प्रतीक बनले.

लोगोमध्ये असलेल्या त्या परस्पर जोडलेल्या पाच कड्या जगातील पाच खंडाचे प्रतिक आहेत; आशिया, आफ्रिका, अमेरिका, युरोप आणि ओशिनिया. तो पहिला महायुद्धाचा काळ असल्याने बॅरन पियरे डी कुबर्टीन यांना एखादे जागतिक मान्यता मिळणारे आणि राष्ट्रांमध्ये शांती आणि एकता दर्शविणारे चिन्ह हवे होते.

 

olympics inmarathi

 

त्यांच्या मते ही डिझाइन ऑलिम्पिक संघटनेत जगातील पाच खंडांचे प्रतिनिधित्व करते तर सहा रंग सध्याच्या काळात जगातील सर्व राष्ट्रीय ध्वजांवर दिसतात. १९२० मध्ये या लोगोला आयओसीची अधिकृत मान्यता मिळाली आणि १९२० च्या बेल्जियम समर ऑलिम्पिक स्पर्धेत तो पहिल्यांदा झळकला व तेव्हापासून हा लोगो ऑलिम्पिक स्पर्धेची विशेष ओळख बनुन गेला.

१९२० पासूनच्या या लोगोमध्ये रंगाच्या छ्टा आणि रिंग्जचे आकार सोडून कुठला ही फारसा मोठा बदल करण्यात आलेला नाही. आता प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत या पारंपारीक लोगो सोबतच त्या स्पर्धेचा विशिष्ट लोगो ही प्रकाशित केला जातो.

 

olympic 1 inmarathi

 

सध्या चालू असलेल्या टोकीयो ऑलिम्पिकचा लोगो जपानच्या आसाओ टोकलो यांनी तयार केला आहे. त्यात आयताकृती आकारांच्या तीन प्रकारांनी बनवलेले डिझाइन आहेत, ते विविध देश, संस्कृती आणि विचार करण्याच्या पद्धतींचे प्रतिनिधित्व करते. त्यात “विविधतेत एकता” असा संदेश देण्यात आला आहे.

इंडिगो निळ्याच्या पारंपारिक जपानी रंगातील हे आयताकृती डिझाइन जपानचा सुरेखपणा आणि सुसंस्कृतपणा यांचे दर्शन घडवते. ऑलिम्पिक आणि पॅरालंपिक खेळ जगाला जोडण्यासाठी व्यासपीठ म्हणून विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करतात ही वस्तुस्थिती देखील यात व्यक्त होते.

ऑलिंपिक हा क्रीडा स्पर्धेचे सर्वोच्च व्यासपीठ आहे जिथे जगभरातील खेळाडू सहभागी होतात. खंडातील एकतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या रिंग्ज एकमेकांशी संवाद साधून तयार केल्या गेल्या. ऑलिंपिकचा हा लोगो जगभरात आपल्या साधेपणाने आणि आकर्षकतेने जगभर प्रभावित करत आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply