विचारी मोदी समर्थकाने इंदिरा गांधींवर लिहिलेली ही पोस्ट प्रत्येकाने वाचायला हवी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : सुजीत भोगले
===
भक्त मंडळीना एक विनामूल्य सल्ला. प्रत्येक व्यक्ती हा गुण आणि दोषांनी भरलेला असतो. आपण मेलेल्या माणसाचे गुण पाहावे. त्याने केलेली देशाची सेवा पहावी त्या पासून प्रेरणा घ्यावी आणि आपण त्याच्यापेक्षा अधिक काही करून दाखवावे हा पुरुषार्थ असतो.
कोणताही व्यक्ती संपूर्ण चांगला किंवा संपूर्ण वाईट नसतो. जगाला दोन रंगात रंगवण्याचे उद्योग थांबवा.
कोट्यवधी सुर्यमालांच्यात आपली सूर्यमाला त्यातील पृथ्वी ग्रह त्यातील भारत देश त्यातील ५ वर्षाचे पंतप्रधान पद ही खिजगणतीत नसणारी गोष्ट आहे. त्यामुळे वृथा अहंकार बाळगू नका.
काळाच्या मापनात हे ५ वर्ष म्हणजे एका क्षणाच्या पेक्षा मोठे नाहीत. आपल्या सगळ्यांचे अस्तित्व हे किडा मुंगी सारखे आहे.
आपण ज्याच्या चरणीचे दास बनून जगात आहात. त्यांच्या पूर्वी हा देश काही लाख वर्षे अस्तित्वात होता आणि यापुढे सुद्धा राहील. सत्य सनातन धर्म तेव्हापासून होता आणि यापुढे सुद्धा राहील. एखाद्या व्यक्तीचे आपण किती उदात्तीकरण करावे याला सुद्धा एक मर्यादा असते.

या देशात राम श्रीकृष्ण यांनी सुद्धा जन्म घेतला आहे आणि ते मृत सुद्धा पावले आहेत. त्यांच्या नसण्याने सुद्धा जगाला फरक पडला नाही तुमचा अहंकारी परिव्राजक फार काही फरक पाडेल या भ्रमात राहू नका.
नम्र व्हा. अहं ब्रह्मास्मि हे शब्द सर्व संग परित्याग झाल्यावर उच्चारायचे असतात. स्वतःच्या नावाचा २० लाखाचा सूट घालून नाही.
===
हे ही वाचा – सूट-बूट-जॅकेट…! “नरेंद्र मोदींच्या कपड्यांवर सरकार किती खर्च करतं?” RTI द्वारे मिळालंय उत्तर…
===
पूर्वसुरींनी केलेल्या कार्याचे कौतुक आणि त्याला केलेले अभिवादन हे तुमचे पाय जमिनीवर असल्याचे निदर्शक असते. हे संत ज्ञानेश्वर यांनी केले म्हणून ते जगाची माउली झाले.
असो. पालथ्या घड्यावर पाणी आहे कल्पना आहे तरी पण राहवत नाही म्हणून सांगतो.. कनक आणि कांता यांच्या पेक्षाही तुमचा आत्मा मूल्यवान आहे. तो कुणाच्याही चरणी गहाण टाकू नका…
तुमचे ज्ञानचक्षु उघडावे म्हणून इंदिरा गांधी आणि तुमचे महापुरुष नमो यांनी केलेली कामे आणि त्याचे तुलनात्मक फळ अशी पोस्ट मुद्दामून खरडणार आहे… सहन करा…

इंदिरा गांधी यांनी केलेली कामे. भरपूर मोठी यादी आहे मुद्दामून एक एक देणार आहे.
१) बँकांचे राष्ट्रीयीकरण:
ज्यामुळे बॅंकातील रक्कम कर्जाच्या स्वरूपात ग्रामीण भागात वितरीत करणे शक्य झाले. आणि ग्रामीण भारतातील लोकांची क्रय शक्ती सुधारली.

आपल्याकडे इंदिरा युग येण्याच्या पूर्वी बहुसंख्य व्यवहार barter पद्धतीनेच होत होते. करन्सीचा वापर राष्ट्रीयकरण केल्यामुळे वाढला.
२) २० कलमी योजनेत विना तारण कर्ज योजना आणि तिचे फलित :
ज्या काळात तितकीशी किराणामालाची दुकाने नसत. मग डोक्यावर मीठ, मोहरी, मिरची अश्या वस्तू घेऊन विक्रय करणारे लोक खेडोपाडी जात असत आणि ते धान्याच्या मोबदल्यात शेतकऱ्याला या गोष्टी विकत असत.
खेड्यातील लोकांना आठवडी बाजार हेच वस्तूच्या खरेदीविक्रीसाठी असणारे मुख्य ठिकाण होते. माझे वडील जिंतूर या गावात एका राष्ट्रीयकृत बॅंकेत manager म्हणून होते.
त्यांना सरकारीकरण झाले की विनातारण ५००० रुपयांचे कर्ज वितरण करा असा आदेश आला. त्यांचा फिल्ड ऑफिसर म्हणजे उत्तर प्रदेशातील एक ब्राह्मण होता.
सिल्कचा नेहरू शर्ट आणि खाली पांढरे शुभ्र धोतर हा त्याचा पोशाख. तो माणूस सायकलवर फिरायचा. तोंडात सतत पान. त्याने हे ५००० रुपयेचे कर्ज वितरीत करण्याची जबाबदारी उचलली.

मग बुढ्ढीका बाल विकणारे मुस्लीम, गावागावात मीठ मोहरी विकणारे हे छोटे व्यापारी, धनगर, जत्रेत आणि आठवडी बाजारात दुकान लावणारी मंडळी यांना तो माणूस आठवडी बाजारात गाठून कर्ज वाटू लागला. ७ दिवस ७ बाजार आणि चक्क जमिनीवर मांडी घालून कर्जाचे वितरण.
आठवडी बाजारात ही व्यापारी मंडळी माल भरण्यासाठी येणार त्यावेळी फिल्ड ऑफिसरकडे हफ्ता जमा करणार. त्या माणसाने विक्रमी कर्ज वाटप केले आणि त्या शाखेचा संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक आला.
त्याचे एकही कर्ज बुडाले नाही. त्या काळातील ५००० रुपये म्हणजे आजचे पाच लाख होतात. पण या पद्धतीचे कर्जवाटप प्रामाणिकपणे केले आणि प्रामाणिक वसुली केली तर ग्रामीण भागात लोकांच्या जीवनात प्रचंड फरक पडतो याचे ते दृश्य उदाहरण आहे.
मोदी सरकारने सुद्धा मुद्रा कर्ज योजना आणली परंतु तिच्यात जुनी कर्जे नवीन दाखवून फसवणूक केली गेली आहे. त्याकाळी सरकारी कर्मचारी जितके जीव तोडून काम करत त्याच्या १० % सुद्धा आज करत नाहीत.
===
हे ही वाचा – “आयर्न लेडी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधींच्या ‘ह्या’ चुका त्यांना प्रचंड महागात पडल्या!
===
आणि कागदी घोडे नाचवून सरकार ची फसवणूक झाली आहे. पण सरकार तरी सुद्धा मुद्राचे खोटे आकडे दाखवून फसवणूक करत आहे. त्या वेळी शब्दशः कोणतेही तारण न घेता एक सही अथवा एक अंगठा घेऊन कर्जे वाटली गेली आणि त्याची परतफेड पण झाली आज सगळी कागदपत्रे घेतात आणि कर्ज वाटत नाहीत.

हे मला आजूबाजूला दिसते आहे. खरे चांगले उद्योजक यांना अर्थ सहाय्य करणारी कोणतीही योजना सरकार राबवत नाही. या सरकारकडे एक सुद्धा असा अर्थ तज्ञ नाही जो अश्या सोप्या सुटसुटीत कर्ज वितरणाची व्यावहारिक योजना आणून तिची अंमलबजावणी करण्याची मानसिकता नाही.
३) मकबूल भट्टची फाशी :
फाशी टाळण्यासाठी लंडन मधील भारतीय उच्चायुक्तातील कर्मचारी श्री रवींद्र म्हात्रे यांचे अपहरण JKLF ने केले. रवींद्र म्हात्रे हे कनिष्ठ कर्मचारी होते.
त्यांना ओलीस धरून मकबूल भट्ट च्या मुक्तीची मागणी करण्यात आली. इंदिरा गांधी यांनी तत्काळ राष्ट्रपतींना विनंती करून त्याचा दया अर्ज फेटाळून मकबूल भट्ट ला फासावर लटकावले.
अतिरेकी संतप्त झाले आणि त्यांनी म्हात्रे यांची निर्घुण हत्या केली. इंदिरा गांधी तत्काळ म्हात्रे यांच्या वृद्ध पित्याला भेटण्यास मुंबई ला आल्या त्यांचे हात हातात घेऊन त्यांची माफी मागितली.
मी तुमच्या मुलाला वाचवू शकले नाही, मी तुमची वैयक्तिक गुन्हेगार आहे. परंतु माझ्याकडे दुसरा मार्ग उपलब्ध नव्हता. तुमच्या मुलाच्या या बलिदानाबद्दल हा देश त्याचा कायमचा ऋणी राहील.

याच रवींद्र म्हात्रे यांचे नाव पुण्यातील म्हात्रे पुलाला दिले गेले आहे. एक नेता म्हणून कठोर निर्णय घेणे आणि संबंधित कुटुंबाची स्वतः भेटून माफी मागणे याला सहृदयी काळीज लागते..
४) पूर्व पाकिस्तानात मुक्ती वाहिनीला सर्व मदत करून शक्तिशाली करणे :
हा कट ( होय कट ) त्यांच्याच काळात रचला आणि पूर्णत्वाला नेला गेला. पाकिस्तानचे विभाजन करणारे हे युद्ध घडवताना इंदिरा गांधी यांनी फिल्ड मार्शलना पूर्ण मोकळीक दिली.
दुसरीकडे संपूर्ण जगाचे दडपण सहन करत अमेरिकेचे सातवे आरमार हिंदी महासागरात पोचण्यापूर्वी बांगलादेश मुक्त केला.
मी मध्यंतरी पाकिस्तानी न्यूज चॅनलवर एक चर्चा ऐकली होती. त्यातील एक मौलाना म्हणत होता. फाळणीच्या वेळी भारतात भारतात ३० कोटी हिंदू होते आणि ११ कोटी मुस्लीम.
भारताने फाळणी घडवली आणि मुस्लिमांची ताकद खच्ची झाली. भारतात ३.५ कोटी मुस्लीम राहिले आणि बाकीचे ७.५ कोटी पाकिस्तानात गेले. त्या ७.५ कोटी चे १२.५ कोटी झाले होते १९७१ मध्ये परत त्यांचे भारताने विभाजन केले ६.५ कोटी बांगलादेशमध्ये गेले आणि ६ कोटी पाकिस्तानात उरले. त्यावेळी भारतीय मुस्लीम सुद्धा ६ कोटी झाले होते.
आज भारतात साधारण १८ कोटी मुसलमान आहेत बांगलादेशमध्ये आणि पाकिस्तानात पण तितकेच आहेत.. आणि हिंदू आहेत १०३ कोटी.

तर तो मौलाना म्हणत होता की ही हिंदू लोकांची चाल आहे. त्यांनी त्यावेळी फाळणी लादली नसती तर आपल्याला अधिक अधिकार मिळून भारतात राहता आले असते.
आज सुद्धा जर हे देश एक असते तर आपण भारतात ५७ कोटी असतो आणि हिंदू १०३ कोटी आपल्याला किती अधिक चांगले जगता आले असते.
त्यांनी १९४७ ला फाळणी लादली, नंतर १९७१ ला अजून तुकडा पाडला आता ते अजून एक तुकडा पाडायचा म्हणून बलुचिस्तानला उचाकावून देत आहेत.. मुस्लिमांना खंडित करून हिंदू सुखात राहत आहेत.
मला हा तर्क पटला अर्थात हे जर एक धोरण असेल तर उत्तम धोरण आहे. मग आपल्याला या साठी नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे आभारच मानले पाहिजेत..
खालीस्तान्चे भूत सुद्धा पंजाबचा तुकडा पाडण्यासाठी तिनेच उभे केले होते. भिंद्रनवाले तिचाच कार्यकर्ता होता पण तो डबल क्रॉस करतो आहे लक्षात आले की तिने त्याला क्रूरपणे संपवला. या फसलेल्या राजकारणाची किंमत स्वतःचे बलिदान देऊन पूर्ण केली.
===
हे ही वाचा – “त्या”दिवशी इंदिरा गांधींनी बुलेटप्रूफ जॅकेट घातलं नव्हतं, कारण….
===
आज नरेंद्र मोदी सुद्धा बलुचिस्तान त्याच धोरणातून सक्षम करत आहेत. राजकारण असेच असते. देशाची एक व्हिजन असते आणि सगळे नेते ती चालवत असतात. त्यामुळे ज्या अश्लाघ्य भाषेत भक्त नेहरू आणि इंदिरा गांधी यांची नालस्ती करत असतात ते पाहून त्यांच्या बुद्धीची कीव येते.

मोदी जे बोलतात ते मते मिळवण्यासाठी आणि काँग्रेसला हीन दाखवण्यासाठी असते पण भक्त वैयक्तिक चारित्र्याची सुद्धा अश्लाघ्य चिरफाड करतात हे असंस्कृत आणि क्लेशजनक आहे.
आता मुख्य मुद्दा ९३००० युद्ध कैदी का सोडले ? त्यांना दोन वेळेला खायला घालणे सुद्धा काय भावात गेले असते याचा विचार करा.. आणि उद्दिष्ट साध्य झाले होते. पाकिस्तान चे तुकडे झाले होते मग उदार पणा दाखवला तर काय फरक पडतो ?
सिमला करारात सुद्धा भारताची भूमिका उदार होती. फक्त एक पाचर इंदिरा गांधी यांनी उत्तम मारली आहे.
जो देश एखादी भूमी बळकावेल त्यांनी ती ताब्यात ठेवली तर राहू शकते. याच मुद्द्याचा लाभ घेत आपण अक्साई चीन आणि सियाचीन भाग १९८३-८४ मध्ये जिंकला आहे. कारगिल हा पाकिस्तान कडून तसाच प्रयत्न होता तो आपण विफल केला.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

bank che rastriyakaran karnyachya khali tyancha hetu bankanna aaplya dabawakhali thewane hach hota..pratyek institute la cong ni dabun thewale hote
अभ्यास
nice
आता काँग्रेस मध्ये दमच नाहीय कोण देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या लायकीचा आहे काँग्रेसमध्ये एकही नाही.
ही वस्तुसित्ती आहे
good
बकवास
हेतू काय होता हे सर्व महत्वाचे नाही, त्याचा देशाला किती फायदा झाला हे महत्वाचे आहे।
खेड्यातील लोकांना २०१२ पर्यंत कधी कर्ज मिळत नव्हत. ते २०१४ नंतर शक्य झालं. उगाच काही फेकू नका.
अतिशय
Faltu post
In Congress there is also a scenior leaderd but in 2009-2014 they done lot of corruption, they couldn’t concentrate on nation, like defence, info. Broad., foreign, see they work on these ministry
Second point paration of INDOPAK
Decision tekan by gandhi jee is not fulley successful bcoz ,as modi jee done demonetisation every day implement the rules, they on 08/11/16 done last date31/12/16 they have given time to people, that type of time limit given to people o INDOPAK partition
Thanks
बॅंक राषट्रीयकरण हे शुद्ध राजकीय लाभासाठी व आपल्या मनात येईल त्याप्रमाणे कर्ज देण्यास त्यावेळचं बॅंकव्यवस्थाफन वागण्यास विरोध करत होते; त्यामुळे त्यांचा इगो दुखावला गेला.त्याचे पर्यवसन बॅंक राषट्रीयकरणात झाले.सुदैवाने सुरवातीला त्याचा सकारात्मक परिणाम झाला;पण नंतर केवळ राजकीय लाभासाठी राष्ट्रीयकृत बँकाचा उपयोग करून घेतला गेला. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी घेतलेला तो निर्णय उच्च नितीमुल्यातून घेतला होता,यात मुळीच तथ्य नाही.
दुसरी गोष्ट विनातारण कर्ज
ही गोष्ट people amesementसाठी होती तेंव्हा त्यांच्या डोळ्यासमोर लोकसभा निवडणूका होत्या.
नंतर राजकीय रोग राष्ट्रीय बॅंकातसुद्धा घुसला.
त्याने हळू हळू बॅंक मध्ये चांगलाच जम बसवला.आणि आता मुद्राकर्ज संबंधात लेखामध्ये जे सांगितले आहे,तो याच रोगाचा दृष्य परिणाम आहे.
तिसरी बांगलादेश निर्मिती ही आंतरराष्ट्रीय राजकारणाची अपरिहार्यता होती.कारण स्वत:ला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी नेता म्हणून सिद्ध करण्याची सुवर्णसंधी होती.व अशी सुवर्णसंधीचा लाभ उठविण्याचा चाणाक्षपणा त्यांच्या कडे नक्कीच होता.
तेंव्हा आपसुक चांगले घडत गेल्याच श्रेय त्यांना द्यावे लागेल.
बाकी नमो भारताप्रमाणे तुम्ही इंदिरा भक्त होऊ शकता हे तुमचे स्वातंत्र्य कोणी ही नाकारू शकत नाही.
आज काय सुरू आहे मित्रा…. आता तर बॅका जवळपास खाजगी स्वरूपात आहेत…. सर्व प्रकारचे खर्च सर्रास कसायासारखे वसुल करतात आणि ते ही मोदी आणि फडणविसाचा फोटो दर्शनी भागात लावून… अर्थातच मुद्रा कर्जाची जाहीरात म्हणून…. बरे तर बरे ह्या मुर्दा कर्जाला योग्य नाव दिल्या गेलय… “मुर्दा” कधीच परत न येणारे पैसे…. कोणत्याही कामाची सुरवात सकारात्मकच होते… नंतर त्यात स्वार्थी तत्व शिरतात आणि मग नकारात्मकते कडे ते वळत… कर्जमेळा हा प्रकार नक्कीच काँग्रेसनी सुरू केला होता…. ही नकारात्मकतेची सुरवात होती…… आता त्याच रुपांतर बँकाच्या लुटीत झालय…. म्हणून सुरवात करणा-याला दोष देणे म्हणजे आपण केलेल्या गुन्ह्यासाठी आपल्या आईबापाला दोष देणे होय….
तुम्हाला वाटते का आताची काँग्रेस आणि इंदिरा गांधी जी ची काँग्रेस एक आहे म्हणून?
तुम्ही स्वतः आजच्या काँग्रेस नेत्याची ‘बयानबाजी’ बघा आणि फरक बघा.
तुम्हालाच समजेल कि आताची काँग्रेस किती देशद्रोही झाली आहे. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी जी ने पाकिस्तान चे टुकडे पाडल्यावर इंदिरा गांधी जी ना देवी चे रूप म्हटले होते, आताची काँग्रेस तसे झाले तर ‘सबुत’
मागते.
पटलं तर विचार करा…
वडील बँकेत मॅनेजर होते म्हणजे आपल्याला सगळे काही कळते अशा जाणिवेतून लिहिलेला लेख वाटतोय. इंदिरा गांधी नसत्या तर देश बुडाला असता किंवा अजून वाईट स्थिती आली असती असं वाटणे हीच मुळी गुलामगिरीची मानसिकता आहे. भारतातील संस्थाने खालसा केली पण देशभर नेहरू घराण्याने स्वतः चे संस्थान लादले त्यातूनच इंदिरा गांधींनी पंतप्रधान पद मिळवले हे लक्षात घ्या. अन्यथा त्या तिथपर्यंत पोहोचल्या सुद्धा नसत्या. याशिवाय त्यांनी लादलेली आणीबाणी आणि त्यामागील त्यांची सत्तेसाठीची धडपड आठवा. गरिबी हटाव सारख्या घोषणा किती पोकळ होत्या त्याबद्दल लिहा. त्यांच्याच मुलाने नसबंदी सक्तीची करून गरिबांना वठणीवर आणायला सुरुवात केली होती ते सुद्धा काही वाईट नव्हते. एक गरीब जेव्हा अजून एका निरपराध जीवाला गरिबीत जन्म देतो हे देशासाठी आणि माणुसकीच्या कुठल्या हिशोबात बसतंय? त्यावर सुरुवातीपासूनच कंट्रोल ठेवायला हवा होता पण निव्वळ वोटबँकेसाठी केवळ घोषणाच दिल्या आणि देशात गरीब वाढवले.
इंदिरा गांधी या आजपर्यंत च्या सर्वोऊत्कृष्ट पंतप्रधान हे द्वेषाचे राजकारण करणाऱ्या व देशाला दिवाळखोरीकडे नेणार्या मोदीला आणी मोदी भक्तांना नाही कळणार हे पिसाळलेले कुत्र्यासारखे गुरगूरत राहणार