पिंक चित्रपटामध्ये बिग बी नी चेहऱ्यावर घातलेल्या विशिष्ट मास्कचं रहस्य!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पिंक चित्रपटाची चर्चा तर सगळीकडेच सुरु आहे. कथानक, अभिनय, छायाचित्रण, दिग्दर्शन या सर्वच बाबतीत हा चित्रपट उजवा ठरला आहे. भारतीय समाजातील ‘ती’च्या वास्तविक परिस्थितीचे अत्यंत समर्पक दर्शन हा चित्रपट घडवतो. अमिताभ बच्चन यांची देखील चित्रपटामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका असून त्यांनी त्यांच्या स्तरावर व्यक्तिरेखेला योग्य तो न्याय दिला आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
–
जर तुम्ही देखील हा चित्रपट पाहिला आहे तर तुमच्या लक्षात आले असेल की चित्रपटाच्या पूर्वार्धात बिग बी चेहऱ्यावर एक खास प्रकारचा मास्क घालून आहेत. आणि सातत्याने तो मास्क त्यांच्या चेहऱ्यावर असल्याची जाणीव आपल्याला होते. मग मनात प्रश्न येतो की सतत हा मास्क घालून फिरण्याचे कारण काय?

या मास्कला ‘Elevation Training Mask’ असे म्हटले जाते. या मास्कची विशेषता ही आहे की हा मास्क चढवल्यावर तुम्हाला हवेच्या कमी दाबाचा त्रास होत नाही.
अजून सोप्प करून सांगतो. तुम्ही एखाद्या उंच ठिकाणी गेलात की तुम्हाला श्वासोच्छवासामध्ये अडथळा येतो, तुम्हाला धाप लागते. तेव्हा जे feeling येतं, अगदी तसंच काहीसं हवेचा दाब कमी असल्यास काही लोकांना होतं.
त्यांना सामान्य परिस्थितीमध्ये देखील श्वासोच्छवासामध्ये अडथळा होतो.

हा मास्क मुख्यत: सामान्य परिस्थितीच्या तुलनेत वेगाने श्वास घेण्याच्या त्रासापासून लोकांना आराम देतो.
हा मास्क चढवल्यावर हवेचा दबाव आहे तसाच राहतो, त्यात काही बदल होत नाही. पण हा मास्क फुफ्फुस आणि डायमार्फ यांना मजबूत करण्यास मदत करतो. ज्यामुळे फुफ्फुसांची क्षमता देखील वाढते आणि ऑक्सिजनची आवश्यक ती मात्रा शरीरात घेतली जाते.
या मास्क बद्दल असा देखील दावा केला जातो की मेंदूवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कसरतीच्या वेळी लवकर दम लागू नये म्हणून या मास्क जरूर वापरावा.
खुद्द विराट कोहली देखील या मास्कचा वापर करतो.

(विराट कोहलीच्या वरील फोटोबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर हे आर्टिकल नक्की वाचा : लिंक)
‘Elevation Training Mask’ मास्कच्या या वैशिष्ट्यांमुळेच फिटनेस जगतात या मास्कचा बोलबाला आहे.
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

He mahiti chukichi ahe. Ha mask jast unchivar jya prakare hava viral aste ti paristhiti nirman karato. Asha havet laukar dhaap lagate ani tya mulech vyayam karatana stamina vadhvanya sathi ha mask lavala jato. Pan ikde purna pane ulat artha lavala gelay..