' नाण्यांवरील चिन्हांमागे दडलेला असतो मोठ्ठा अर्थ! – InMarathi

नाण्यांवरील चिन्हांमागे दडलेला असतो मोठ्ठा अर्थ!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या नाण्यांचा जमाना राहिलेला नाही. पूर्वी कसा सगळीकडे नाण्यांचा सुळसुळाट असायचा. पण बदलत्या काळाबरोबर महागाई वाढली आणि लोकांच्या खिशातील नाण्यांची जागा नोटांनी घेतली आणि आता लोक पैसे नाही रुपये वापरतात.

असो, सध्या या मुद्द्यावर जास्त मेहनत घेण्यात वेळ न घालवता मुळ मुद्द्याकडे येऊया.

ही नाणी आपण सगळ्यांनीच पाहिलेली, वापरलेली आहेत. सध्या नव्या नाण्यांची देखील चलती आहे. तर अश्या या नाण्यांना कधी तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं आहे का?

ज्यांनी पाहिलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक नाण्यावर विशिष्ट प्रकारचे चिन्ह आढळून येते.

कधी स्टार, कधी डायमंड तर कधी फुलस्टॉप! आज या चिन्हांमागचा सहसा कोणालाही माहित नसलेला अर्थ आपण जाणून घेऊया.

भारतामध्ये एकूण ४ टाकसाल आहेत, जेथे नाणी बनवली जातात आणि तेथूनच ती मार्केट मध्ये येतात. हे नाणी कारखाने मुंबई, हैद्राबाद, नोएडा आणि कोलकत्ता येथे आहेत.

हेच नाणी कारखाने आपआपल्या कारखान्यात तयार होणाऱ्या नाण्यांवर विशिष्ट चिन्ह सोडतात. मुंबई, हैद्राबाद, नोएडा येथे तयार होणाऱ्या नाण्यांवर ठराविक चिन्हाची छपाई केली जाते. तर कोलकात्या मधील नाण्यांवर कोणत्याही प्रकारचे चिन्ह छापले जात नाही.

 

नोएडा नाणी कारखाना

नोएडाच्या कारखान्यात तयार होणाऱ्या नाण्यांवर फुलस्टॉप अर्थात टिंब आढळून येतो. या येथे नाण्यांचे उत्पादन १९८८ सालापासून सुरु झाले.

मुंबई नाणी कारखाना

 

मुंबईच्या कारखान्यात तयार होणाऱ्या नाण्यांवर डायमंड हे चिन्ह असते.

हैद्राबाद नाणी कारखाना

indian-coins-marathipizz03

 

हैद्राबादच्या नाणी कारखान्यात तयार होणाऱ्या नाण्यांवर स्टार आढळून येतो.

 

कोलकाता नाणी कारखाना

indian-coins-marathipizz04a

ज्या नाण्यावर कोणतेही चिन्ह नाही ते नाणे कोलकाता नाणी कारखान्यात तयार झाल्याचे समजावे.

काय? इनमराठीने अजून एक मौल्यवान माहिती दिली की नाही? अहो मग शेअर करा आणि इतरांनाही सांगा की!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?