हौसेला मोल नसतं, “बस” ने १८ देशातून, लंडनपर्यंतच्या प्रवासाची किंमत जाणून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
अँडव्हेंचर ट्रिप करणारे हौशी बघायला गेलो तर ते आपल्या इथे कमी नाहीत. बाईकवरून लडाख ट्रिप, काश्मीर ते कन्याकुमारी, चार धाम सारखी धार्मिक स्थळे करून मोकळे झालेले अनेक हौशी ट्रॅव्हलर्स आपल्याला भेटतील.
सोलो ट्रिप करणारे तर भरपूर नग पहायला मिळतील. त्याच सोलो ट्रिप करणाऱ्यांचे व्लॉग जर बघितले तर ते सामान्यपणे रेल्वे,बस सारख्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करताना दिसतात.
तर, सफर करण्याचे चाहते असाल, वर्ल्ड टूर करण्याचे स्वप्न पाहणारे असाल, रोड ट्रिपचे प्रेमी असाल तर हा लेख तुमच्या साठी आहे.
बघायला गेलो तर आंतरराष्ट्रीय ट्रिप साठी सामान्यपणे विमानाचा मार्ग हा सोयीस्कर असतो. वेळ, पैसा दोन्ही बाबतीत ते परवडणारे ठरते. पण हौसेला किंमत नसते.
उदाहरण घ्यायचं म्हणजे तर मुंबई गोवाचं घेऊया, बाय रेल्वे जायचं ठरलं तर सगळ्यात महागडी गाडी आहे तेजस. त्याच एकझेक्युटीव्ह तिकीट जात ३००० च्या आसपास. आणि वेळ घेते ८ तास. (जनशताब्दी एक्स्प्रेस सिटिंगने ३००/- मध्ये सोडते)
विमानाने ४००० रुपयात २ तासात गोवा. पण, मुंबई – गोवा जहाजाने प्रवास असेल तर? होय जहाजाने गेलो तर आंगरिया नावाचं जहाज १७ तासात मुंबई वरून गोव्याला सोडेल. तेही सात हजारच्या माफक दरात. (दिल्या जाणाऱ्या सुविधा पाहता माफकचं म्हणू शकतो.)
(यांची प्रत्येक ट्रिप ही हाऊसफुल असते.)
असंच जर दिल्ली ते लंडन विमानाऐवजी बसने प्रवास असेल तर? होय बसने! आता विमाना ऐवजी बाय बस देखील लंडन गाठू शकतो.जर वेळ आणि पैसा तेवढा मोजला तर!
१५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर गुरुग्राम स्थित एका खाजगी टूर अँड ट्रॅव्हल कंपनीने एक बस लॉन्च केली. जीचं नाव आहे ‘बस टू लंडन.’
या बसच्या माध्यमातून तुम्ही दिल्लीहून लंडनला ७० दिवसात पोहोचाल. मात्र ही वन वे सर्व्हिस असणार आहे.तर कसा असेल हा प्रवास?
७० दिवसाच्या या प्रवासात आशिया आणि युरोपातील मिळून सुमारे १८ देशांच्या बॉर्डर क्रॉस करावे लागणार आहे.
ज्यात भारतापासून सुरवात करून म्यानमान, थायलँड, लाओस, चीन, किर्गीजस्थान, उझबेकिस्तान, कझाकस्तान, रशिया, पोलंड, चेकरिपब्लिक, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, फ्रांसआणि ब्रिटन हे मुख्य देश आहेत.
या ट्रिपची कल्पना नक्की कशी सुचली?
दिल्ली निवासी तुषार अगरवाल आणि संजय मदन हे बाय रोड दिल्लीवरून लंडनला गेले आहेत. फक्त एकदाच नव्हे तर तीन – तीन वेळा. २०१७, २०१८ आणि २०१९ अशी सलग तीन वर्षे.
त्याच रोड ट्रिपच्या अनुभवाच्या जोरावर हे दोघे वीस जणांच्या चमुला घेऊन ही दिल्ली – लंडन यात्रा बसच्या माध्यमातून करणार आहेत. ‘बस टू लंडन’ या मध्ये प्रवाशांना सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत आणि त्या सुद्धा लक्झरीयस
या जवळपास वीस हजार किलो मीटरच्या प्रवासासाठी एक विशेष बस तयार केली गेली आहे.ज्यामध्ये २० प्रवाशांची प्रवासाची सोय केली जाणार आहे. बिझनेस क्लास सारखी या बस मध्ये सीट असणार आहे.
२० प्रवाशांसोबत एक ड्रायव्हर, एक सहायक ड्रायव्हर, एक गाईड आणि एक ऑर्गनायझर असे इतर चार जण असणार आहेत.
गाईड हा १८ देशांच्या हिशोबाने बदलणार आहे. ज्याणे करून त्या त्या देशाच्या हिशोबाने गाईड प्रवाशांना गाईड करू शकेल.
आता एवढा मोठा प्रवास आणि दिल्या जाणाऱ्या सुविधा पाहून या सगळ्याचा खर्च किती असेल?
तर, या दिल्ली ते लंडन प्रवासात एकूण दहा देशांचे व्हिसा लागणार आहेत.(रशियन व्हिसा असेल तर पूर्वीच्या सोव्हिएत रशिया मध्ये असलेल्या देशात व्हिसाची गरज नसते.आणि भारतीय पासपोर्टवर काही देशांमध्ये बिना व्हिसाचा प्रवास करता येतो.)
या दहाही व्हिसाची व्यवस्था ही टूर कंपनी करणार आहे. दिल्ली ते लंडन या प्रवासासाठी एकूण चार कॅटेगरी ठेवण्यात आलेले आहेत.
कोणाकडे वेळ कमी असेल आणि त्या वेळेत त्याला लंडन गाठायचं असेल तर तसा प्लॅन किंवा लंडन व्यतिरिक्त इतर देश फिरायचा मानस असेल तर वेगळा प्लॅन अशा विविध कॅटेगरी आहेत.
आणि दिल्ली ते लंडन या प्रवासा साठी एकूण १५ लाख एवढी किंमत मोजावी लागणार आहे. या टूरसाठी इएमआयची सुद्धा सोय केली गेली आहे.
बस टू लंडनची संकल्पना ज्या टूर कंपनीची आहे,अँडव्हेंचर ओव्हरलँड ट्रॅव्हलर या कंपनीचे संस्थापक तुषार अगरवाल म्हणतात,
ते आणि त्यांचा मित्र संजय मदन यांनी २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये कारने दिल्ली वरून लंडनला गेले होते.त्यांच्या सोबत इतर साथीदार सुद्धा होते. दर वर्षी ते अशा ट्रिपचे आयोजन करतात.
या ट्रिप मध्ये अनेक जणांनी सामील व्हायची इच्छा दर्शवली होती. पण त्यावेळेस एकच गाडी असल्या कारणाने ते त्यांना घेऊन जाऊ शकत नव्हते.
याच अडचणी वर मात करण्यासाठी त्यांनी ही बसची संकल्पना प्रत्यक्षात आणली.
१५ ऑगस्टला याच त्यांनी यशस्वी लॉचिंग केलं. २०२१ च्या मे मध्ये त्यांची पहिली ट्रिप सुरू होईल अशी आशा ते बाळगून आहेत. कोरोनाच्या साथीमुळे त्यांनी या टूर साठी अजून रजिस्ट्रेशन सुरू केलेल नाही.
भारतासोबत इतर देशात असलेली परिस्थिती पाहता यावर निर्णय घेण्यात येईल असं अगरवाल म्हणाले.
अवाढव्य असलेली किंमत पाहता मिळणाऱ्या सर्व्हिस बद्दल विचारले असता अगरवाल म्हणतात,
७० दिवसांच्या या प्रवासात आम्ही प्रवाशांना सगळ्या सुविधा देणार आहोत. ज्या हॉटेल मध्ये त्यांचा थांबा असेल ते फोर किंवा फाईव्ह स्टार हॉटेल असतील.
प्रवासी जर भारतीय जेवणाचा आनंद घ्यायचे इच्छुक असतील तर त्यांना ते देण्यात येईल,जरी ते इतर कोणत्याही देशात असले तरी.विमानाच्या बिझनेस क्लास सारखी बसची रचना असणार आहे.
हौसेला किंमत नसते. त्यामुळे या प्रवासातही तुम्हाला पॅशनेट असणं गरजेचं आहे. जग फिरायची इच्छा असेल तर त्या इच्छे समोर प्रवासाची किंमत ही नगण्य असेल.
तर, एका लॉंग ट्रिपचं प्लॅनिंग करत असाल, त्यासाठी तेवढाच पैसा गुंतवण्याची तयारी असेल तर बस टू लंडन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.